Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, १४ जानेवारी, २०२४

वाळू उत्खनन व वाहतूक बंद केली म्हणून ठेकेदाराने शुक्रवारी रात्री उशिरा शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल....!



शिंदखेडा प्रतिनिधी:- शिंदखेडा तालुक्यातील अक्कडसे येथील तापी नदीपात्रातून मंजूर झालेल्या वाळू घाटातून शुक्रवारी (ता.१२) जेसीबी मशिनने उत्खनन करून डम्परने डेपोपर्यंत वाहतूक करीत असताना दुपारी चारच्या सुमारास अक्कडसे गावातील आठ तरुणांनी वाळू उत्खनन व वाहतूक बंद केली म्हणून ठेकेदाराने शुक्रवारी रात्री उशिरा शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.

अक्कडसे येथील तापी नदीवरील वाळू घाट हा परभणी येथील मे अक्षद एजन्सीला देण्यात आला आहे. ठेकेदाराने तापी नदीपात्रातून वाळूचे उत्खनन करणे, डेपोपर्यंत वाहतूक करणे व डेपोचे व्यवस्थापन करणे या अटी-शर्तींवर शासनाने वाळू घाट दिला आहे. मे अक्षदा कंपनीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शिंदखेडा तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी बुधवारी (ता. १०) वाळू घाटाचा ताबा दिला आहे.

शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास तापी नदीपात्रातून बाळू उत्खनन करण्याच्या कामास कंपनीने सुरवात केली. त्याप्रमाणे मजूर नदीपात्रात काम करीत असताना दुपारी चारच्या सुमारास अक्कडसे येथील तरुण आनंदा कोळी, विकी कोळी, राजेश कोळी, दादू कोळी, मच्छिंद्र कोळी, सागर कोळी, गटल्या कोळी व मुकेश कोळी यांनी वाळू घाटावर हातात लाठ्याकाठ्या घेऊन दमदाटी केली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध