Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १३ जानेवारी, २०२४

राम काज किन्हे बिनु मोही कहा विश्राम...



अमळगाव प्रतिनिधी :- येत्या 22 जानेवारीला अयोध्या नगरीत प्रभु श्रीरामांच्या मुर्ती चा प्राण प्रतिष्ठाण सोहळा होणार असुन त्या अनुषंगाने संपुर्ण भारतभर मंगलमय आणि उत्साही वातावरण निर्माण झालेले दिसत आहे.या महानमंगल पर्वाची मोठ्या आतुरतेने समस्त  रामभक्त  वाट पाहत आहेत तो प्रसंग 11 दिवसांवर येऊन ठेपला आहे.. मा पंतप्रधान मोदीजींनी प्रभु श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने सर्व भारतभर मंदिरांची साफ सफाई करण्याचे आव्हान केले आहे.

अशा मंगलमय वातावरणात अमळगावातील श्रीराम भक्तांचा उत्साह अगदी ओसांडुन वाहत आहे... प्रभु श्रीरामांचा प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यासाठी अमळगावातील समस्त तरुणाईने श्रीराम प्राण प्रतिष्ठाण नियोजन  समिती स्थापन केली असुन हा सोहळा मंगलमय व उत्साही वातावरणात पार पडावा या दृष्टीने 22 तारखेसाठीचे नियोजन करण्यात समस्त अमळगाव कर व्यस्त झाले  आहे...तरुणांनी गावातील सर्व चौक, मंदिरे यांची साफसफाई सुरु केली आहे..संपुर्ण गावात भक्तीमय वातावरण तयार झाले असुन विशेषतः तरुणाईने या कामी पुढाकार घेतलेला दिसुन येत आहे...


देवेंद्र संजय घिसाडी प्रतिनिधी 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध