Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ४ जानेवारी, २०२४

धुळे जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदी भाजपाच्या सौ.धरती निखिल देवरे याची सर्वांनुमते निवड



धुळे : धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदी
भारतीय जनता पार्टीच्या सौ. धरती निखिल देवरे यांची निवड झाली आहे. धुळे येथील श्री विलेपार्ले केळवणी मंडळ कॅम्पस मध्ये 3 जानेवारी रोजी सकाळी धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी बैठक घेण्यात आली.भारतीय जनता पार्टी तर्फे निरीक्षक म्हणून आमदार राजूमामा भोळे व भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी निरीक्षक म्हणून जिल्हा परिषद सदस्यांशी चर्चा केली.भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की,भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे,उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली दोन निरीक्षक बैठकीला येऊन सर्व सदस्यांशी चर्चा करून धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी धरती निखिल देवरे यांचे नाव जाहिर करत आहोत.प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या पत्रात भाजपा जिल्हाध्यक्ष निवड करतील असे सुचवले होते,यानुसार ही निवड जाहीर करत आहोत.भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या उत्तम कारभारासाठी तसेच शासनाकडून भरघोस निधी मिळण्याच्या दृष्टीने जि.प.समन्वय समिती जाहीर करीत आहे.यामध्ये ना. गिरीष महाजन,आ.जयकुमार रावल,आमदार अमरिशभाई पटेल,खा.डॉ. सुभाष भामरे, खा. डॉ.हिनाताई गावीत,आ.काशिराम पावरा, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी या 7 जणांची समन्वय समिती जाहिर करण्यात आली.यावेळी आमदार राजूमामा भोळे,भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी,खा.डॉ.हिनाताई गावित, खा.डॉ.सुभाष भामरे,माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल, माजीमंत्री आ.जयकुमार रावल,धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे,प्रभारी जिल्हा परिषद अध्यक्ष देवेंद्र पाटील,जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तुषार रंधे,माजी अध्यक्ष सुभाष देवरे, माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते,माजी जिल्हाध्यक्ष नारायण पाटील,जिल्हा सरचिटणीस किशोर सिंगवी,डि. एस.गिरासे उपस्थित होते.मान्यवरांनी नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध