Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २७ जानेवारी, २०२४

शिरपूर तालुक्यात व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे कार्यालयाचे उद्घाटन व फलक अनावरण सोहळा संपन्न...!



शिरपूर प्रतिनिधी - देशभरात नावावर उपास आलेली व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी देशातील सर्वात मोठी पत्रकार संघटना व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेच्या शिरपूर तालुका कार्यालयाच्या उद्घाटन सोहळा व फलक अनावरण आज दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता शिरपूर तालुक्याचे आमदार काशीरामजी पावरा यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे, पोलीस निरीक्षक शिरपूर अंसाराम आगरकर, तहसीलदार शिरपूर महेंद्र माळी, शिरपूर नगर परिषदेचे सीईओ तुषार नेरकर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी, डॉक्टर तुषार रंधे, मर्चंट बँकेचे नवनियुक्त चेअरमन मनोज महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे एडवोकेट आशिष अहिरे, शिवसेनेचे बाळासाहेब राजपूत, रज्जाक कुरेशी, पिंटू शिरसाट, मर्चंट बँकेचे व्हाईस चेअरमन रामदास पुरी, मर्चंट बँकेचे संचालक संदीप देवरे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सर्वप्रथम पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पी आय आगरकर यांनी शिरपूर तालुक्यातील पत्रकारांची जागरूकता व समय सूचकता ही उल्लेखनीय असून शांतता व कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी मोलाची मदत पत्रकारांकडून मिळत असते. म्हणून त्यांनी तालुक्यातील सकारात्मक पत्रकारितेच्या दाखला देत सर्वांचे अभिनंदन केले. उपविभागीय अधिकारी यांनी पत्रकारांच्या या कार्यालयास शुभेच्छा देऊन प्रशासकीय स्तरावरील सर्व अडचणी सोडवण्याबाबत आश्वासित केले. नगरपरिषदेचे सीईओ तुषार नेरकर यांनी पत्रकारांकडून आलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शिरपूर तालुक्यातील पत्रकारांसाठी एक पत्रकार कार्यालय असावे यासाठी शिरपूर नगर परिषदेमार्फत प्रस्ताव सादर करून प्रयत्न केले जातील अशी आश्वासन दिले. जिल्हाध्यक्ष बबन चौधरी यांनी शिरपूर तालुक्यात सर्वाधिक पत्रकारांची संख्या असली तरी पत्रकारितेच्या स्तर हा आजही टिकून राहून पत्रकार करत असलेल्या कार्याबद्दल त्यांनी आदर व्यक्त केला.
तर डॉक्टर तुषार रंधे यांनी तालुक्यातील सामाजिक राजकीय परिस्थितीला अनुसरून चांगले व वाईट याच्या बोध ठेवत तालुक्यातील पत्रकार सकारात्मक पत्रकारिता करतात याबाबत कौतुक करून पत्रकार संघटना पुढील येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी सर्व स्तरावरून आवश्यक मदत करण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाची प्रस्तावना संघटनेचे धुळे जिल्हा प्रवक्ता महेंद्र माळी यांनी केली. पत्रकारांची संघटना व्हाईस ऑफ मीडिया ही देशभरात कशा पद्धतीने पथकरांसाठी कार्यकर्ते व कोणकोणत्या पत्रकारांच्या समस्यांसाठी आम्ही शासन दरबारी लढा देत आहोत याबाबतची रूपरेषा त्यांनी मांडली. यानंतर कार्यालयाचे उद्घाटन व फलक अनावरण संपन्न होऊन आलेल्या सर्व मान्यवरांच्या शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. आभार प्रदर्शन महेंद्र माळी व एडवोकेट ज्ञानेश्वर थोरात यांनी व्यक्त केले. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे तालुका अध्यक्ष भिका चव्हाण व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध