Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २१ जानेवारी, २०२४

दाेंडाईचा शहरात स्वामी विवेकानंद स्कूलच्या वतीने शाेभायात्रा!



दाेंडाईचा (प्रतिनिधी) :- शहरात आज सकाळी १० वाजता स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कुलच्या वतीने प्रभु श्रीराम, माता सिता, श्री लक्ष्मण, शबरी माता, श्री हनुमान यांच्यासह रामायणातील विविध पात्रांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थींसह भव्य शाेभायात्रा काढण्यात आली. अयाेध्या येथील श्रीराम जन्मभूमीच्या जागेवर प्रत्येक हिंदूधर्मियांसह श्रीराम भक्तांच्या स्वप्नातील प्रभू श्रीरामांचे भव्य आणि आकर्षक मंदिर साकारले जात आहे. 


या मंदिरात प्रभू श्रीराम, माता सीता, श्री लक्ष्मण आणि श्री हनुमान यांच्या मूर्तीची येत्या २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होत आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वामी विवेकानंद स्कुलच्या वतीने आज सकाळी शाळेत प्रभु श्रीराम यांची प्रतिमा पुजन, दीपप्रज्वलन शाळेच्या मुख्याध्यापिका साै. सुरेखा राजपूत, ज्याेत्सना मेहता, श्री. मुमताज बाेहरी सर यांच्या वतीने करण्यात आले. यानंतर शाळेतून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, राम मंदिर मार्गाने शाेभायात्रा काढण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थी यांनी शहरातील राम मंदिरात प्रभु रामचंद्रांचे दर्शन घेतले. यावेळी राम मंदीर संस्थानाच्या वतीने विद्यार्थी मित्रांना प्रसाद देण्यात आला. तर विद्यार्थी मित्रांनी सोमवार २२ रोजी दीपोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. शाळेच्या प्रायमरी व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी श्रीराम सीता लक्ष्मण व हनुमान यांची उत्तमोत्तम वेशभूषा साकारली तसेच विद्यार्थिनींनी सुंदर नृत्य सादर केल्याने संस्थेचे चेअरमन वृक्षमित्र माजी आमदार बापूसाहेब रावल, सचिव शिप्राताई रावल यांनी यांनी काैतुक केले. 

याप्रसंगी संस्थेच्या सचिव शिप्राताई रावल यांनी व्हिडिओ काॅन्सफर्रन्स द्वारे विद्यार्थी मित्रांशी संवाद साधुन अयाेध्या येथे साकारलेल्या राम मंदिर बाबत माहिती दिली. तसेच रामायण आपल्याला जीवनाचा याेग्य दिशा देते. विद्यार्थी मित्रांनी प्रभु रामचंद्राची शिकवण आचरणात आणावी. जीवनात गुणवत्ता पुर्ण शिक्षण आणि अभ्यासासह उत्तम संस्कार आणि आचरण देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. तेव्हाच तुम्ही सुज्ञ नागरिक घडू शकतात. तर पालकांनी उद्या घराेघरी दीपाेताेत्सव साजरा करावा असे आवाहन देखील शिप्राताई रावल यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री खारकर यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वितेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध