Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
बुधवार, ३ जानेवारी, २०२४
Home
/
Unlabelled
/
भारतीय जनता पार्टीच्या वतीने धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सौ. धरती निखिल देवरे
भारतीय जनता पार्टीच्या वतीने धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सौ. धरती निखिल देवरे
शिरपूर / धुळे : भारतीय जनता पार्टीच्या वतीने धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सौ. धरती निखिल देवरे यांची निवड जाहिर करण्यात आली.
धुळे येथील श्री विलेपार्ले केळवणी मंडळ कॅम्पस मध्ये 3 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टी तर्फे निरीक्षक म्हणून आमदार राजूमामा भोळे व भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी निरीक्षक म्हणून सर्व जिल्हा परिषद सदस्यांशी चर्चा केली.
भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे तसेच उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, पालकमंत्री ना. गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली दोन निरीक्षक बैठकीला येऊन सर्व सदस्यांशी चर्चा करून धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदासाठी धरती निखिल देवरे यांचे नाव जाहिर करत आहोत. प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या पत्रात भाजपा जिल्हाध्यक्ष निवड करतील असे सुचवले होते, यानुसार ही निवड जाहीर करत आहोत.
भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या उत्तम कारभारासाठी तसेच शासनाकडून भरघोस निधी मिळण्याच्या दृष्टीने जि.प. समन्वय समिती जाहीर करीत आहे. यामध्ये ना. गिरीषभाऊ महाजन, आमदार जयकुमारभाऊ रावल, आमदार अमरिशभाई पटेल, खा. डॉ. सुभाष भामरे, खा. डॉ. हिनाताई गावीत, आमदार काशिराम पावरा, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी या 7 जणांची समन्वय समिती जाहिर करण्यात आली.
यावेळी आमदार राजूमामा भोळे, भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी, खा. डॉ. हिनाताई गावित, खा. डॉ. सुभाष भामरे, माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, माजी मंत्री आमदार जयकुमार रावल, धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, प्रभारी जिल्हा परिषद अध्यक्ष देवेंद्र पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तुषार रंधे, माजी अध्यक्ष सुभाष देवरे, माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते, माजी जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, प्रा. अरविंद जाधव व अनेक मान्यवर उपस्थित होते.
सर्व मान्यवरांनी नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरकरांच्या भावनांशी खेळणारे चौधरी बंधूंनो, भर चौकात द्या उत्तर मंत्री अनिल पाटील यांनी गौप्यस्फोट करीत दिले आव्हान *अमळनेर* (प्रतिनिधी) ...
-
शिरीष चौधरींच्या प्रचारात सुज्ञ व जेष्ठ नागरिक दाखवा आणि लाख रुपये मिळवा- विनोद लांबोळे अमळनेर- माजी आमदार शिरीष चौधरी यांचा या निवडणुकीत ना...
-
साक्री श्रमिक,शेतकरी, कष्टकऱ्यांचे लढावू नेते, शेतमजूर,कामगार व आदिवासी जनतेचे पाठीराखे,लाल निशाण पक्षाचे राज्य अध्यक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट...
-
डॉ. अनिल शिंदे निवडून आल्यास अनेक स्थानिक प्रश्न लागणार मार्गी:- मगन भाऊसाहेब, अमळनेर:- मागील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे निम-कळमसरे परि...
-
अमळनेर : समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर ने धडक दिल्याने पारोळ्याच्या एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अमळनेर पारोळा रस्त्यावर जिनिंग जवळ ९ रो...
-
अमळनेर- विधानसभा मतदारसंघात असलेल्या पारोळा तालुक्यातील सुमारे 42 गावात भरगच्च विकास कामांमुळे मंत्री अनिल पाटील यांनाच साथ मिळणार असा दावा ...
-
घरमालक कुटुंबाच्या चारही जणाविरुद्ध गुन्हा दाखल अमळनेर : घर खाली करण्यावरून वाद होऊन घरमालकाच्या कुटुंबाने भाडेकरूंच्या कुटुंबाल...
-
अमळनेर : तालुक्यातील चोपडाई कोंढावळ येथील एसएसटी पथकाने गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कार मधून सुमारे ४५ हजाराचा गुटखा आणि तंबाखू जप्त...
-
खरा भूमिपुत्र कोण 2009 ला अनिल दादा विधानसभेला पराभूत झाले, परंतु पराभव विसरून अनिल दादा परत सक्रिय झाले. 2014 ला विधानसभेला परत एकदा पराभव ...
-
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील एकाच कुटुंबातील काका ,पुतण्या चुलत भाऊ, बहीण असे चार जण राज्य सेवा स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा