Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २९ जानेवारी, २०२४

प्रांताधिकारी यांचा निरोप समारंभ दिमाखात संपन्न....



शिरपूर प्रतिनिधी :- येथील उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे यांची नंदुरबार येथे निवडणूक उपजिल्हाधिकारी पदी बदली झाली त्यामुळे प्रमोद भामरे यांना आज ऐतिहासीक निरोप दिला. त्यांच्यावर पुष्पवर्षाव करून त्यांनी सुमारे अडीच वर्षे केलेल्या कामगिरीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

शिरपूर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे यांची अलीकडेच नंदुरबार येथे निवडणूक उपजिल्हाधिकारी पदी बदली झाली असून ते उद्या अर्थात सोमवारी आपल्या पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. दरम्यान, शनिवारी प्रमोद भामरे यांना अतिशय शानदार असा निरोप देण्यात आला. याप्रसंगी आर.सी पटेल प्रांगणातील एस.एम पटेल या हॉलमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला या दरम्यान विविध पदाधिकारी यांनी आपल्या भाषणात प्रमोद भामरे यांच्या उल्लेखनीय कार्याचा भावलेख व्यक्त करीत भावमय अश्रूंनी आपल्या अधिकाऱ्याला निरोप दिला.शिंदखेडा तहसील व शिरपूर तहसील व दोंडाईचा अप्पर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह उपविभागीय कार्यालयातील सहकार्‍यांनी प्रमोद भामरे यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.नंतर त्यांना निरोप देण्यात आला.

बदली हा शासकीय अधिकार्‍यांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असतो. बदलीनंतर शब्दसुमनाने अनेकांना निरोप मिळतो पण सर्व कर्मचाऱ्यांनी आपापल्या हातात फुले घेऊन श्री. भामरे यांच्यावर फुलांचा वर्षाव करत त्यांना निरोप देण्याचा ऐतिहासिक क्षण आज शिरपूरकरांनी अनुभवला,प्रमोद भामरे यांच्यावर होणार्‍या या फुलांच्या वर्षावात शिरपूर व शिंदखेडा तहसीलयातील अधिकारी व कर्मचारी,व उपविभागीय कार्यालयातील अधिकारी यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा सुगंध दरवळत होता. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व समाजाच्या विविध स्तरांमधील नागरिकांनी आपल्या मनोगतातून त्यांच्याविषयी आपले अनुभव सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या.

या निरोपाचे उत्तर देतांना प्रमोद भामरे यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचे आभार मानताना त्यांचे प्रेम आणि जिव्हाळा मिळाल्याने काम करू शकलो. गेली अडीच वर्ष कशी गेली हे कळलेच नाही असे नमूद करत सर्वांचे आभार मानले.याप्रसंगी शिरपूर उपविभागाचे शिरपूर तहसील व शिंदखेडा तहसील व दोंडाईचा अप्पर तहसील कार्यालयातील तहसीलदार,नायब तहसीलदार,अव्वल कारकून,मंडळ अधिकारी,तलाठी,
महसूल सहायक,यांच्यासह बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध