विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण तणाव दूर करुन विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा या उद्देशाने आनंद मेळाव्याचे आयोजन केले आहे. - नागनाथ देशमुख, मुख्याध्यापक
Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, १३ जानेवारी, २०२४
अरणगाव जि.प शाळेत, बाल आनंद मेळावा उत्सहात संपन्न...
परंडा (राहूल शिंदे )दि.१३रोजी तालुक्यातील आरणगाव येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या आनंद सोहळ्याचा विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांनी आनंद घेतला.
आनंद मेळाव्यात विद्यार्थी- विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने खूप छान छान चविष्ट व चटकदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते. स्टॉलची मांडणी, विविध पदार्थांची विक्री, खरेदी व विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी लुटला.
मान्यवरांच्या हस्ते बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच युसूफ पठाण, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी तौर, जवळा केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीम.अंकुलवार, केंद्रीय मुख्याध्यापक कोल्हे, अनिल पिंगळे, ग्रा. प सदस्य प्रमोद तौर इ.मान्यवरांनी केले. मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक नागनाथ देशमुख व शिक्षक वृंदांनी केले.
या बाल आंनद मेळाव्यासाठी धनंजय कारकर,नितीन गायकवाड, यशवंत कानगुडे, धनंजय ढगे, उपरे आदी.बहुसंख्य शिक्षकांनी उपस्थितीत राहून विध्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. प्रमोद तौर,रामहरी पिंगळे, धनंजय आदलिंगे, बाळासाहेब कसपटे, अंकुश पाटील,लहू गवळी, दादा पठाण,धनाजी तौर, तात्या पिंगळे,वसंत कांबळे, सरफराज पठाण,शरद पिंगळे, मोहन कासपटे, तात्या कुलकर्णी, तात्यासाहेब पिंगळे, कृष्णा पिंगळे, बशीर पठाण,हुसेन पठाण आदि बहुसंख्य पालक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षकवृंद श्रीम. लैला मुलानी, श्रीम.सुवर्णा खटाळ, श्रीम.माधुरी शिंदे,श्रीम.माधुरी पवार मोहन कापुरे यांनी परिश्रम घेतले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
धुळे देवपूरमधील प्रमोद नगरमध्ये प्लॉट नं.८ येथे राहणाऱ्या एका कृषि खत विक्रेत्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह आज सकाळी बंद घरात आढ...
-
शिरपूर प्रतिनिधी:- श्री हनुमान व्यायाम मंदिर ट्रस्ट शिरपूर या संस्थेला महाराष्ट्र शासन क्रिडा विभाग धुळे जिल्ह्याच्या माध्यमातून सात लाख रुप...
-
साक्री तालुक्याची राजधानी सबोधल्या जाणाऱ्या धाडणे गावात छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान तर्फे सलग चौथ्या वर्षी सामाजिक एकोपा, बंधुभाव, आपुल...
-
अमळनेर प्रतिनिधी:- मुलीला फुस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत एकाच्या घरात घुसून महिलेला मारहाण व तरुणाला देखील मारहाण करून त्याच्या मो...
-
भारताच्या स्वातंत्र्यानंतर साक्री तालुक्याची रचना झाली त्यावेळी पासून तर आजपर्यंत माजी आमदार स्वर्गीय गोजरताई भामरे या महिला आमदार सोडल्या...
-
अमळनेर प्रतिनिधी:- छत्तीसगड राज्यातील बिलासपूर जिल्ह्यातील पाचपेडी, मल्हार येथून प्रियकरासह पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीला अमळनेर रेल्वे संर...
-
मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने साकारणार नगरपरिषदेची दररोज पाणी देणारी योजना अमळनेर प्रतिनिधी - शहरवासीयांना संपूर्ण सात दिवस 24 तास म्...
-
आधुनिक शेतीत बदल घडतोय आणि बदल घडवूया शोध नाविन्याचा विश्वास क्वालिटीचा वचन तत्पर सेवेचे महत्व पटत्तय आणि गरज ही बोलून दाखवली जात आहे.जे पिक...
-
धुळे प्रतिनिधी - राज्यात सर्वत्र गणेश विसर्जन सुरू असताना धुळे जिल्ह्यातून मात्र अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटना समोर आली आहे. धुळे शहरापासू...
-
प्रति. श्री. युगकर्ता देवा मु. पोस्ट. देवनगरी समस्त आकाश, पृथ्वी, पाताळ युगपुरुष. पिन. शून्य शून्य ooo विषय :- कलियुगात जनतेस होतं असलेल्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा