Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १७ जानेवारी, २०२४

शिरपूर तालुका मनसे कडून तहसिलदार यांना निवेदन...! करवंद येथिल स्ट्रॅ|र्च फ़ॅक्टरीतून येणा-या दुर्गधीयुक्त हावेचा कायमचा बंदोबस्ताची मागणी....!



शिरपूर (प्रतिनिधी) ; आपले शिरपूर शहर व तालुका अतिशय स्वच्छ व सुंदर आणि शांत शहर व तालुका म्हणून पंचकोशीत खाती प्राप्त असलेले आहे. मात्र काही वर्षापासून तालुक्यातील करवंद गावाच्या परिसरात सुरु झालेली स्ट्रॅ|र्च फ़ॅक्टरीतून येणारा दुगंधीयुक्त हवेचा त्रास 20-25 कि.मी. परिसरातील जनतेला होत आहे. नेमके संध्याकाळी फ़िरण्यासाठी निघणारे युवकापासून ते वयोवृध्द माता-भघीणीं व नवजात बालकापासून ते शाळेत जाणारे व शाळेतून संध्याकाळी खेळण्यासाठी बाहेर पडणारी विद्यार्थी यांना होत आहे. यामुळे युवा व वृध्दांना छातीत दमा सारखा श्वसनाचा त्रास होणे, जेवण न जाणे, मळमळ होणे, अस्वस्थ वाटणे असे कितीतरी प्रकारच्या व्याधी लागण्याचा मार्गावर आहेत.

                       या फ़ॅक्टरीबाबत वेळॊवेळी ब-याच संघटना, पक्ष व पत्रकारबंधूनी तक्रारी केलेल्या असून देखील आजपावतो या बाबत शासन प्रतिनिधी व खास करुन प्रदुषण नियामक मंडळ यांनी कोणतेच ठोस पाऊल उचलेले नाही. व याच विभागाच्या अधिका-यांच्या अशिर्वादानेच तालुक्यात ही फ़ॅक्टरी सुरु असून त्यांच्यामुळे होण-या हवा प्रदुषणास व त्यामुळे पर्यावरणाच्या अतोनात हानीस  कोठेतरी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष तेच जबाबदार आहेत. “साहाबजी यह पब्लीक है! सब जानती है!” त्यावेळेस ही फ़ॅक्टरी सुरु होते कितीतरी मोठ्या प्रमाणात पर्यावरणात मानवि जिवनास घातक असे घटक हे दुर्गंधीयुक्त हवेबरोबर वातावरणात सोडले जातात. प्रदुषण नियामक मंडळाचे अधिकारी यांवर नेमकी कार्यवाही का करत नाही ?    हे असे किती दिवस चालणार ? तरी जिल्ह्यातील प्रदुषण नियामक मंडळाचे अधिका-यानी याकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा जनतेचा आपल्यावरील विश्वास एकदा का उडाला तर त्याचे परिवसन विद्रोहाकडे जाईल, व पर्यावरणप्रेमीचाम जनतेचा व मनसे पदाधिका-यां संताप त्यावेळेस अंगावर घेण्याची शक्ती या अधिका-याकडे नसेल. याबाबत यापुर्वी देखील काही पत्रकार बंधून हा सर्वसामान्य जनतेच्या जिवनाच्या आरोग्याचा प्रश्न घेऊन तक्रारी व निवेदन केलेली होती. मात्र याकडे कोणतीही दखल घेतलेली दिसून आलेली नसल्याने परिसराती अबाल वृध्दांच्या आरोग्यासाठी मनसेने हा झेंडा आपल्या हाती  घेतला आहे.

                      नेमका काही दिवसापुर्वीच कोरोना सारखी एक महामारी येऊन शिरपूरकराचेच नव्हे तर संपुर्ण जगाचे हाल-बेहाल करुन गेलेली आहे. व अश्या आजारातून बरा झालेल्या रुग्णाना या दुर्गधीचा लवकरच त्रास जाणवू लागलेले आहेत. म्हणून वेळीच या कंपनीवर दुर्गंधीयुक्त हवा पसरवण्यास चाप बसवला नाहीतर परिसरात अनेक विविध आजारांचे रुग्ण निर्माण होऊन महामारी सारखी परिस्थीती निर्माण होईल. तरी यावर तात्काळ उपाय योजना करण्यात यावी. अन्यथा मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या खळखट्याळ पध्दतीने तिव्र अंदोलन करेल. याबाबत शिरपूर तहसिलदार व शिरपूर शहर पोलिस स्टेशन यांना या फ़ॅक्टरीतून विसंर्ग होणा-या दुर्गंधीयुक्त हवेचा कायमचा बदोबस्त करण्याबाबत निवेदन सादर केलेले आहे. सदर निवेदन देते वेळीस खुद्द वाघाडी ग्रामपंचायत सदस्य विक्की जिवन मोरे व  राकेश नवनित चौधरी (जिल्हा अध्यक्ष मनसे)  पुनमचंद आनंदा मोरे ( तालुका अध्यक्ष मनसे)  छोटू राजपूत (जिल्हा संघटक मनवासे)  सोनू राजपूत (जिल्हा अध्यक्ष मनविसे) पंकज मराठे (शहर अध्यक्ष मनसे) राकेश पाटील (तालुका उपाध्यक्ष मनसे) अमोल गुजर (उपाध्यक्ष) किरण माळी (संघटक), इमरान पिंजारी, आकाश भोई, मयुर कोळी व जितेंद्र कोळी आदी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  या निवेदनामुळे स्थानिक अबाल वृध्दांनी मनसे कार्यकर्त्यांचे अभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध