Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १३ जानेवारी, २०२४

पिंपळनेर वनपरिक्षेत्रात अवैद्य वृक्षतोड व वाहतूक करणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची म्हणजेच वनपाल यांच्यावर कारवाईची मागणी



वन विभागाकडून वृक्षांचा कत्लेआम
लाकडांचीही विल्हेवाट,कुंपणच शेत खातंय
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर वनक्षेत्रात कुंपणच शेत स्वतं:खात असल्याचा धक्कादायक आणि स्वळवळजनक प्रकार समोर आला आहे. ज्यांच्यावर जंगल
वाचविण्याची वृक्षसंवर्धनाची जबाबदारी आहे ते रक्षकच भक्षक बनलेत कि काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.झाडांची कत्लेआम करून त्या
झाडांच्या लाकडांची देखील परस्पर विल्हेवाट लावण्यात आली आहे. विशेष म्हणजे या धक्कादायक प्रकारा बाबत वनविभागाच्या संबंधितांना
बोलते करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलणे टाळले. त्या मुळे या प्रकरणातील गूढ आणखीनच वाढत आहे.पिंपळनेर वनक्षेत्राच्या हद्दीतील
संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वतः भोवती संशयाची जाळे विणले असल्याचे दिसून येते
पिंपळनेर वनपरिक्षेत्रातील वनपाल व कर्मचाऱ्यानी रात्री दि‌.२/१/२०२४ रोजी दरीपाडा येथे आंबा ईमारती लाकुडची गाडी पकडु तोडी पाडी करुन सोडुन दीली दि.०३/०१/२०२४ रोजी वरीष्ठ अधिकारी श्री नितीन कुमार सिंग उपवनसंरक्षक धुळे वनविभाग धुळे,श्री आर.आर.सदगीर विभागीय वनाधिकारी दक्षता विभाग धुळे तसेच आ.र.बच्छाव वनक्षेत्रपाल संवरक्षन गस्तिफथक धुळे यांना दि.०३/०१/२०२४ रोजी त्याच्या मोबाईल फोनवर पिंपळनेर वन क्षेत्रात आंबा इमारती लाकडांची गाडी कळमबारी बारी मध्ये अडकून ठेवून खंडणीच्या पैशांसाठी रात्रभर ओलीस ठेवून लाखभर रुपये घेऊन तोडी पाणी करून गाडी सोडली गाडी ड्रायव्हर कडे एवढी मोठी रक्कम सोबत नसल्यामुळे गाडी मालका ची संपर्क साधून त्याच्या फोन पे ने त्यांनी त्यांच्या साथीदाराच्या ओळखीच्या मोबाईल क्रमांकावर फोन पे ने ५५००० रुपये पंचावन्न हजार रुपये टाकले बाकी पैसे रोखीने दिले तसेच लाकुड पिंपळनेर येथे स्वामींमध्ये विक्री केली असता सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांनी तक्रार दिली असता महाशयांनी तुमच्याकडे काय पुरावे आहेत ते अगोदर मला सादर करा बघू काय ते असे सांगितले यावर त्यांनी त्यांच्या व्हाट्सअप नंबर वर गाडी नंबर सहित पुरावे दिलेत व शेतकऱ्याचं नाव दिले व शेतकऱ्याचे नाव दिले तरीदेखील आज मीतीस संबंधित चोरीचा ट्रक व खंडणी वसुली करणाऱ्या वनपालांवर श्री संदीप मंडलिक यांच्या वर काहीही एक कारवाई करण्यात आलेली नाही. म्हणून शेतकरी सोनिबाई झऱ्या भिल रा.दरीपाडा .पो.उमरपाटा यांनी ०८/०१/२०४ रोजी रुषीकेश रंजन वनसंरक्षक धुळे वनविभाग धुळे (प्रा) यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली याचाच अर्थ असा होतो की संबंधित वनपाल यास वरील सर्व वनधिकारी पाठीशी घालून कायदेशीर संरक्षण देत आहेत. अशा संशयाला वाव आहे. प्रस्तुत प्रकरणी चौकशी केली असता ज्याचा आंबा झाड होते गरीब आदिवासी अडाणी माणसाला आंबा झाडाचे पैसे मिळाले नाहीत.तरी संबंधित खंडणीखोर वनपाल श्री संदीप मंडलिक त्याचे सकारी व अवैद्य व विक्री करणाऱ्या व्यापारी अवैद्य लाकूड घेणाऱ्या सामील धारकाला कारवाई कधी होईल अशी जनतेमधून मागनी होत आहे.
पिंपळनेर वनक्षेत्र गेल्या वर्ष भरापासुन
वादग्रस्त घटनांमुळे चर्चेत आले आहे.मागील एक वर्षा पासून अतिक्रमण होत आहे विशेष म्हणजे शासनाची ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत मळगाव कं.पा क्र ३७७,३७८,३७९ शासनाने लाखो रुपये खर्च करुन चार ते पाच वर्ष संरक्षण मंजुर ठेउन लाखों रुपये खर्च केले असताना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले असून संबंधित वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पिंपळनेर वन परिक्षेत्रातील घडलेला प्रकार लक्षात आणून दिले असता व तक्रार प्रविण काकुस्ते, कैलास मोरे , चंद्रशेखर अहिरराव यांनी केली केली असताना श्री नितीन कुमार सिंग उपवनसंरक्षक धुळे वनविभाग धुळे श्री आ..र.बच्छाव वनक्षेत्रपाल संरक्षण गस्तिफथक धुळे चौकशीला आले असता.चौकशीवेळी पुरावा वेळी लेखी स्वरुपात 64 G.B चा पेनड्राईव दिला असता.64 G.B चा पेनड्राईव पुरावा देउन 95 दिवस उलटुन सुध्धा अहवाल दिला नाही अधिकाऱ्यांनी कुठलेही कारवाई केली नाही. म्हणून तक्रारदारानी मुख्यमंत्री सचिवालय येथे तक्रार केली.
विशेष म्हणजे वराती मागून घोडे या
न्यायाने वनविभाग
हे प्रकरण संशयास्पद असल्याने त्याची चौकशी सुरु असतांनाच
पिंपळनेर वनविभागाचा आणखी एक काळा कारनामा समोर आला
आहे.शासनातर्फे पर्यावरणाचा हास रोखण्यासाठी झाडे लावा झाडे
जगवा ही मोहीम राबविली जाते. वनविभागाच्या माध्यमातून झाडे
लावण्याच्या मोहिमेला गती मिळणे अपेक्षित असते.पिंपळनेरला
मात्र उफराटा कारभार सुरु असल्याचे दिसून येते. लोकसांगे
ब्रम्हज्ञान,स्वता कोरडे पाषाण या सुभाषितालाही लाजवेल अश्या
पद्धतीने पिंपळनेर वनविभागाचा कारभार सुरु असल्याचे दिसून येते.
वृक्षसंवर्धनाची जबाबदारी वनविभागावर असतांना त्यांच्या कडूनच
वृक्षांची कत्लेआम होत असल्याने जनतेत संतापाची लाट निर्माण
झाली आहे. आपल्या वर कोणाचाच धाक नाही, वचक नाही अश्याच
मनमानी पद्धतीने पिंपळनेर वनविभागाचा "कार्यक्रम सुरु आहे.
पिंपळनेर वनविभागाने त्यांच्या कार्यालयाच्या आवारातील अनमोल
अश्या वृक्षांची कत्तल केली आहे.त्यामध्ये खैर, सिसम,करंज,
निम आणि अन्य प्रजातींचा समावेश आहे. पूर्ण वाढलेले आणि
कैकवर्ष वयाच्या या झाडांवर वनविभागाच्या आशीर्वादाने कुन्हऱ्हाड चालवली जात आहे.
वनविभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच बुंध्या पासूनच छाटले जात आहेत. झाडांचा
जीव का घेतला जाते याचे स्पष्टीकरणही वनविभाग द्यायला तयार नाही.
कहर म्हणजे कापलेल्या झाडांच्या लाकडांची ते बिनदिक्कत पणे वाट
लावत आहेत.ट्रकांमध्ये भरून या लाकडांची विल्हेवाट लावली
जात असतांना नियम कायदे सर्व वनविभागाने धाब्यावर बसविल्याचे
दिसते.
भ्रमणध्वनी आणि दुरध्वनी वरून वनविभागाशी संपर्क साधण्याचा
प्रयत्न केला जातो त्यांच्या कडून प्रतिसाद मिळत नाही.कसा आहे याला फोटो कुठे आहे अशी जनतेतून मागणी होत आहे वृक्षांची
कत्तल आणि विल्हेवाट प्रकरणी वनविभागाची बाजू समोर यावी
या साठी आमचे प्रतिनिधी घटनास्थळी पोहचले मात्र संबधितांनी
तोंडावर बोट ठेवत प्रतिक्रिया,स्पष्टीकरण देण्यास नकार दिला.
वृक्षतोडीची आणि लाकडांच्या विल्हेवाट प्रकरणाची सखोल चौकशी
वरिष्ठ अधिकार्यांनी करून संबंधित संशयितां विरुद्ध गुन्हा दाखल आजही पिंपळनेर पश्चिम पट्ट्यात अवैध वृक्षतोड व वाहतूक सुरू आहे यात दोषी असणाऱ्यांना सर्व अधिकारी यांना वरिष्ठांनी निलंबित करावे अशी
जनतेतून मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध