Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १२ जानेवारी, २०२४

वाटेफळ येथे शैक्षणिक क्रीडास्पर्धा संपन्न...

परंडा (राहूल शिंदे) दि.११ तालुक्यातील वाटेफळ येथील जय हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात चौदा वर्षा खालील विद्यार्थ्यांच्या सांघिक "तांदुळवाडी बीट स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा" खेळी-मेळीच्या वातावरणात शिक्षण विस्तार अधिकारी दादासाहेब घोगरे यांच्या अध्यक्षतेखाली सपन्न झाल्या.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले.स्पर्धा प्रास्ताविक डोंजा केंद्राचे केंद्रप्रमुख भागवत घोगरे यांनी केले.तर आभार तांदुळवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख आनंद गायकवाड यांनी मानले.
ग्रामीण भागातील गोर गरीब, शेतकरी व शेतमजुरांची मुले जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेतात, त्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण सादर करण्याची संधी या क्रीडा महोत्सवातून मिळाली आहे.

- दादासाहेब घोगरे, शिक्षण विस्तार अधिकारी तांदुळवाडी बीट.
या सोर्धेचा निकाल :- कबड्डी मुले विजेता कौडगाव, उपविजेता धोत्री. कबड्डी मुली विजेता कौडगाव, उपविजेता हिंगणगाव. खो -खो मुले विजेता कौडगाव, उपविजेता हिंगणगाव. खो-खो मुली विजेता कौडगाव, उपविजेता देऊळगाव. थ्रो बॉल - मुले विजेता कौडगाव, उपविजेता आलेश्वर. मुली विजेता कौडगाव, उपविजेता हिंगणगाव. हॉलि्बॉल मुली - विजेता देऊळगाव, उवविजेता आलेश्वर एकंदरीत संपूर्ण स्पर्धेत प्रा.शा कौडगावचे वर्चस्व दिसून आले.
यावेळी जय हनुमान विद्यालय वाटेफळचे प्राचार्य गटकळ,अमोल लांडे,विक्रम लांडगे, तांदुळवाडी केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक तुळशीराम भोसले, वैजीनाथ सावंत,लक्ष्मण हजारे, सचिन सूर्यवंशी , धोंडीराम कांबळे, गोविंद पवार,बालाजी वाघमोडे, शिवाजी शिंदे, बालाजी शिंदे, इ. मुख्यध्यापक व शिक्षक बांधव उपस्थित होते.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जय हनुमान विद्यालयाचे शिक्षक खुरुंगे, माळी, तानाजी हजारे, सचिन भांडवलकर, हनुमंत भांडवलकर,लहू घोगरे यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध