Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ११ जानेवारी, २०२४

मराठा आंदोलकांना जनसुविधा, अत्यावश्यक सेवा पुरवण्यात याव्यात.-डॉ.पाटील अधिवक्ता सर्वच्च न्यायालय.


धाराशिव (राहूल शिंदे ) दि.११ सकल मराठा समाज आपल्या आरक्षणाच्या व विविध मागण्यासाठी दि.२०जानेवारी २०२४ पासून आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत मुंबई येथे मोठ्या संख्येने, आमरण उपोषणासाठी येत आहे. तरी आपणास आग्रहाची विनंती की, मराठा समाजासाठी आमरण उपोषण ठिकाण व मराठा मार्ग येथे वैद्यकीय सेवा, अग्निशमन तथा रुग्ण - वाहिका व तत्सम आत्यावश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. विविध स्तरातील ग्रामीण भागातील मराठा समाज बांधव, भगिनी, युवा, कष्टकरी, शेतकरी, जेष्ठ नागरिक, लहान थोर यांच्यासाठी आत्यावश्यक सेवा यामध्ये शौचालय, आरोग्य व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, रुग्णवाहिका, प्रथमोपचार, औषधोपचार, औषधे, फिरते दवाखाने, हॉस्पिटल, पोलीस संरक्षण तसेच अन्न व पाणी, निवांऱ्याची जस की, मंडप, ऊन, वारा व पाऊस, थंडी यापासून संरक्षण मिळण्याची सुविधा करण्यात याव्यात.
संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी, आमरण उपोषण करण्यास मुंबईकडे येत असणाऱ्या, मराठा समाजासाठी जनसुविधा, आत्यावश्यक सेवा पुरवण्यात याव्यात.- डॉ. राजसाहेब पाटील (अधिवक्ता, सर्वेच्च न्यायालय, नवी दिल्ली )
तसेच मराठा समाज बांधवाचे संरक्षण आणि मराठा मार्गांवरील व मुंबई मधील उपोषण स्थळी वाहतूक व्यवस्थेचे वाहतूक यंत्रने मार्फत येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था याचे योग्य नियोजन करण्यात यावे. महाराष्ट्र शासनाने वरील सर्व बाबींचा विचार करावा व जनसुविधा, आत्यावश्यक सेवा, अन्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात. असे पत्र दि.१०जानेवारी रोजी मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना डॉ. राजसाहेब पाटील(अधिवक्ता, सर्वेच्च न्यायालय, नवी दिल्ली) यांनी दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध