Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १२ डिसेंबर, २०२३

शेतकऱ्यांचे कैवारी युवात्मा स्व.शरद जोशी साहेब यांची ९ जयंती शेणपूर येथे उत्साहात साजरा



आज साक्री तालुक्यातील शेण पूर येथे सालाबाधा प्रमाणे स्वर्गवासी शेतकऱ्यांचे युगात्मा माननीय शरद जोशी साहेब यांची नववी जयंती शेणपूर गावातील शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे संघटन करून या माणसाने भारतीय राजकारणात आपली ताकद दाखवून दिली होती व सरकारला भीक नको हवे घामाचे धाम अशी घोषणा करून जेरीस आणणारे शेतकरी नेते खा.स्वर्गीय शरद जोशी साहेब यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी दरवर्षी शेणपूर गावात यांची जयंती साजरा होत असते यावेळी शेणपुर ग्रामपंचायत कार्यालय आवारात त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचे वाचन करून भविष्यात शेतकरी कसा सदन होईल यावर त्यांनी दिलेल्या काही ठळक मुद्दे शेतकऱ्यांना सांगण्यात आले व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी शेणपुर गावातील ज्येष्ठ नागरिक श्री धोंडू लाला काकुस्ते श्री.हरी राजाराम काकुस्ते श्री.अरविंद धोंडू काकुस्ते यांच्या हस्ते जोशी साहेबनचा फोटोला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक शेतकरी तरुण महिला व प्रमुख पाहुणे म्हणून श्री.शशिकांत भदाणे सर पिंपळनेर यांचे मार्गदर्शन लाभले या पूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शेणपूर गावचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री गंगाधर राजाराम काळे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते श्री गणेश काकुस्ते यांनी केले.


तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध