Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ४ डिसेंबर, २०२३

ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणार्‍यांचा डाव हाणून पाडु....तानाजी धोत्रे.



भरणेवाडी : आमची लेकरे,आमची लेकरे म्हणणारे आपल्या ओबीसींच्या लेकरांच्या ताटातील घास जबरदस्तीने हिसकावुन घेवु पहात आहेत.शासनावर दबावगट निर्माण व्हावा आणि ओबीसींच्या कोठ्यातील आरक्षणात घुसखोरी करता यावी यासाठी राज्यभरात आंदोलणे,मोर्चे व प्रसंगी जाळपोळी सारख्या घटणा घडवुन राज्यभरात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.यांचा आरक्षणातील घूसखोरीचा डाव महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधव एकजटीने प्रतिकार करत हाणुन पाडल्या शिवाय गप्प बसणार नसल्याचे मत भटक्या विमुक्त जाती जमातीचे प्रदेश सचिव तानाजी धोत्रे यांनी भरणेवाडी (ता.इंदापूर) येथे बोलताना व्यक्त केले.


मौजे भरणेवाडी येथे रविवारी सायंकाळी ओबीसी आरक्षण बचाव जनजागृती सभेचे आयोजन फुले प्रहारचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत बोराटे व स्थानिक ओबीसी बांधव यांचे वतीने करण्यात आले होते.त्यावेळी तानाजीराव धोत्रे बोलत होते.याप्रसंगी मोहळकर उद्योग समुहाचे प्रमुख वसंतराव मोहळकर,एड.नितीन राजगुरू, सुधाकर बोराटे हे प्रमुख मान्यवर म्हणुन उपस्थित होते.ओबीसींच्या गोरगरीब लेकरांच्या ताटीतील आरक्षणाचा घास प्रगत प्रस्थिपितांनी ओढून घेतल्यास ओबीसींचा हक्क हिरावला जाणार असुन आपल्याला पुन्हा गुलामगीरीत जावे लागेल.म्हणुन येशीच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या संकटाला वेळीच रोखण्यासाठी नऊ डिसेंबर रोजी इंदापूर येथे मंत्री छगन भुजबळ यांचे नेतृत्वाखाली होत असलेल्या ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळाव्यास सर्व ओबीसी बांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन ओबीसी नेते तानाजी धोत्रे यांनी केले.

पिढ्यानपिढ्या सत्ता भोगणार्‍यांनी ओबीसींच्या आरक्षणात घुसखोरी करण्याचा सुरू असलेला प्रयत्न वेळीच रोखण्यासाठी मंत्री छगनराव भुजबळ यांचे नेतृत्वाखाली इंदापूरात ओबीसी,भटके विमुक्त जाती-जमाती व सर्व मागासवर्गीय आरक्षण बचाव एल्गार मेळावा आयोजित केलेला आहे.शासनाने कुणाला आरक्षण देण्यास आमचा कसलाच विरोध नाही.परंतु ओबीसींच्या कोठ्यातुन जर कुणाला आरक्षण देण्याचा शासनाचा प्रयत्न असेल तर त्याला राज्यातील ओबीसींचा कायम विरोध राहणार असल्याचे एड.नितीन राजगरू भरणेवाडी येथे बोलताना म्हणाले.
याप्रसंगी गणेश शिंदे,दिपक बोराटे, भारत बोराटे,आणिल बोराटे,
सुनिल शिंदे, बाबुराव जठार,शमशुद्दीन मुलाणी, महादेव खराडे,बाळासाहेब वाघ,महेश बोराटे,आशोक वाघ,
विनायक बोराटे यांचेसह मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव उपस्थित होते.

सुधाकर बोराटे....



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध