Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री गिरीशजी महाजन यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र भाजप किसान मोर्चाचे महामंत्री श्री बिंदू शेठ शर्मा व भावी आमदार इंजि.श्री मोहन सूर्यवंशी यांची वाटचाल.



साक्री आज शुक्रवार रोजी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री गिरीश जी महाजन यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मित्र श्री बिंदू शेठ शर्मा व साक्री विधानसभा प्रमुख इंजि.श्री मोहन सूर्यवंशी हे साक्री दौऱ्यावर आले असताना साक्री येथे भाजपा कार्यालयात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांसोबत मेळावा घेतला. त्यात श्री शर्मा साहेबांनी साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या व इतर शासकीय योजनां पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न हे शासकीय अधिकाऱ्यांना फोन करून व प्रत्यक्ष भेट घेऊन जागेवर सोडवण्यात आले तसेच साक्री येथील नायब तहसीलदार पाटील साहेब यांना साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या व इतर शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांच्या समस्यांबाबत निवेदन दिले.
निवेदन देताना श्री बिंदू शेठ शर्मा व इंजिनियर श्री मोहन सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांच्या व महिलांच्या योजना संदर्भात अशी माहिती दिली की कुसुम योजना महाराष्ट्र शासनाने कुसुम राहिलेल्या लाभार्थ्यांना 1)कुसुम योजना अंतर्गत आज पर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना कुठलाही लाभ मिळालेला नाही तरी वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना त्वरित लाभ मिळावा.2) साक्री तालुक्यातील पिक विमा योजनेअंतर्गत ७४ हजार शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला असून शासनाने साक्री तालुक्यातील फक्त दोन मंडळांमध्ये लाभार्थ्यांना 25 टक्के रक्कम अदा केलेली आहे तरी उर्वरित साक्री तालुक्यातील सर्व मंडळांना पिक विमा योजनेचा लाभ मिळून शंभर टक्के पिक विमा योजना चा लाभ मिळावा.3) शेतकऱ्यांना पुरेशी वीज मिळत नसून दिवसा बारा तास वीज मिळेल अशा पद्धतीने रचना करून शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाची सोडवणूक करावी.4) महात्मा फुले कृषी सन्मान योजना व छत्रपती शिवाजी सन्मान योजनेअंतर्गत नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जाहीर केलेले 50000 चे अनुदान त्वरित जमा करण्यात यावे तसेच महात्मा फुले कृषी सन्मान योजनेअंतर्गत कर्जदारांना माफ केलेल्या पात्र लाभार्थ्यांना त्वरित कर्ज मुक्त करून कर्जमुक्ती मिळावी.5) डिजिटल रेशन कार्ड अद्याप पर्यंत प्रशासनाने तयार केलेली नसून शासन आपल्या दारी या अंतर्गत रेशन कार्ड तयार करून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची तजबीज करावी व रेशन सुरळीतपणे मिळेल या संदर्भात पावले उचलावी.6)श्रावणबाळ योजना संजय गांधी निराधार योजना योजना या योजनेचे  पैसे त्वरित खात्यावर जमा करण्यात यावे. 7)साक्री तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांचे वीज कोटेशन 12 वर्षापासून भरलेले आहेत त्यांचे बिल देखील चालू झाले आहे परंतु शेतकऱ्यांना कोटेशन मिळालेले नाही अशा शेतकऱ्यांना तात्काळ कोटेशन देण्यात यावे.8)तसेच ज्या शेतकऱ्यांचे दुष्काळी अवकाळी गारपीट पीक विम्याचे पैसे आले त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याला होल्ड लावू नये त्यांचे पैसे त्वरित खात्यावर जमा करण्यात यावे अशा विविध संदर्भाचे निवेदन आज शेतकरी मित्र श्री बिंदू शेठ शर्मा व साक्री तालुक्यातील भावी आमदार मा. इंजि.श्री मोहन सूर्यवंशी यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत व भाजपाचे पदाधिकाऱ्यांसोबत नायब तहसीलदार यांना निवेदन दिले.निवेदन देताना भाजपाचे पदाधिकारी श्री योगेश भामरे संयोजक सहकार आघाडी नाशिक,भाजपा सरचिटणीस ॲड श्री सुरेश शेवाळे, श्री प्रवीण देसले, साक्री तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री रोहित पवार तसेच पत्रकार श्री चंद्रशेखर अहिरराव व श्री संजय बच्छाव व साक्री तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध