Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, ३० डिसेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
नवीन वर्षात राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चालू होणार ! शिंदे सरकारकडून शिव संकल्प अभियानाचे वेळापत्रक जाहीर
नवीन वर्षात राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चालू होणार ! शिंदे सरकारकडून शिव संकल्प अभियानाचे वेळापत्रक जाहीर
मुंबई .राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी यांच्या पक्ष फुटी नंतर एकमेकांवरील आरोपांचा कलगीतुरा चालू असतानाच राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत किती जागा देणार हा प्रश्न भाजपा कडून अद्याप गुलदस्त्यात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सहा जानेवारी ते 30 जानेवारी या काळात शिवसेना महाराष्ट्रातील 16 लोकसभा मतदारसंघात शिव संकल्प यात्रेचे आयोजन केले आहे मात्र या त्यांच्या यात्रेला सत्ताधारी भाजपाकडून हिरवा झेंडा दाखवला जातो की लाल झेंडा यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात होणार आहे
राज्यात मागील वर्षी शिवसेना पक्षात फुटी नंतर चालू वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील मोठी फूट पडली या पक्ष फुटी नंतर राज्यामध्ये या दोन्ही पक्षांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असताना व त्यावर पक्षातून फुटून गेलेले व मूळ पक्ष कोणाचा यावरून मोठ्या प्रमाणावर कलगीतुरा रंगला असून राज्यात एकही दिवस एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप करण्यावरून जात नाही त्याचबरोबर राष्ट्रवादी मधून फुटून गेलेले व शिवसेना पक्षातून फुटून गेलेले दोन्हीही बाजूकडील गट आपापली ताकद आजमावण्यासाठी राज्यात कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात मिळावे तसेच शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून राजकीय ताकद आजमावण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यावरून देखील राज्यात मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोपांच्या जुगलबंदी चालू आहेत त्यामुळे राज्यातील वातावरण दूषित झाले असतानाच राज्या सह देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत
राज्यात इंडिया आघाडी व शिवसेना शिंदे गट भाजपा व मित्रपक्ष तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेना व वंचित बहुजन आघाडी यासह एम आय एम व केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष यांच्यासह शेतकरी कामगार पक्ष शेतकरी संघटना व अन्य छोटे मोठे पक्ष व तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के सी आर राव यांचा बी आर एस या सर्व पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे
केंद्रातील भाजपा सरकारने जानेवारी महिन्यात राम जन्मभूमीचा शिलान्यास कार्यक्रम पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्याचे संकल्प केला असून त्यानंतर राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी खऱ्या अर्थाने चालू होणार आहे या राम मंदिराच्या शिलान्याशा नंतर राज्यासह देशात मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोपाच्या फेरी चालू होणार आहेत त्यापूर्वी भाजपा सहित सर्वच पक्षांनी प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांबाबत चाचपणी चालू केली असून त्यासाठी मुंबई दिल्ली या ठिकाणी बैठका चालू केल्या आहेत तसेच राज्यात सत्ताधारी शिंदे व भाजपा सरकारने आपापल्या आमदारांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी बजेटमध्ये मोठ्या प्रमाणावर निधीची खैरात केली आहे त्यानंतर देखील हो राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामीण भागातील आमदारांना ग्रामविकास खात्याच्या 25 15 या शीर्षकाखाली प्रत्येक विधानसभा सदस्याला वीस कोटी रुपये अतिरिक्त निधी दिला आहे त्यामुळे ग्रामीण भागातील लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील भाजपा सरकार व शिंदे सरकार हे कामाला लागल्याचे यावरून स्पष्ट होत आहे
राज्यात मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांचे झालेले उपोषण व त्यांचा मराठा आरक्षणासंदर्भातल्या राज्यातला दौरा पुन्हा 20 जानेवारीपासून त्यांनी.जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून दौऱ्याला प्रारंभ करणार असून पाडळशिंगी ,मादळ मोही ,मातोरी,खरवंडी ,पाथर्डी,तिसगाव,करंजी,अहमदनगर ,सुपा, शिरूर ,घोडनदी,शिक्रापूर,वाघोली,चंदन नगर पुणे, लोणावळा,नवी मुंबई, चेंबूर व आझाद मैदान मुंबई. असा जरांगे पाटलांचा मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई त पुन्हा आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय आहे तर दुसरीकडे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास ओबीसी समाजाचा विरोध आहे तर दुसरीकडे धनगर समाज देखील आरक्षण मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे त्यामुळे मागील चार महिन्यांमध्ये राज्यातील पोलिसांवर आंदोलनाचा अतिरिक्त ताण पडला असताना दुसरीकडे लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून राज्यात येत्या काळात प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोचणार असून राजकीय आरोप प्रत्यारोप हे मोठ्या प्रमाणावर होणार आहेत
राज्यात एकनाथ शिंदे गट भाजपा सरकार मध्ये सामील झाला असून अद्यापी लोकसभेच्या 48 लोकसभा मतदारसंघांपैकी किती जागा भाजपा शिंदे गटाला देणार याबाबत अद्याप कोणतेही स्पष्ट संकेत नसताना पण नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षण अहवालानुसार शिंदे गटाकडील खासदार डेंजर झोन मध्ये असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील 16 लोकसभा मतदारसंघात सहा जानेवारी ते 30 जानेवारी या काळात शिव संकल्प अभियाना अंतर्गत प्रचार सभा आयोजित केल्या आहेत
राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 16 लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिव संकल्प अभियाना अंतर्गत यांनी प्रचार सभा आयोजित केल्या आहेत ते कुठल्या गटाचे आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे;
(1) सहा जानेवारी सकाळी 11 वाजता यवतमाळ वाशिम खासदार भावना गवळी (एकनाथ शिंदे गट)
(2). सहा जानेवारी सायंकाळी पाच वाजता रामटेक कृपाल तुमाने (एकनाथ शिंदे गट)
(3) आठ जानेवारी सकाळी 11 वाजता अमरावती खासदार नवनीत राणा (अपक्ष) परंतु भाजपा सहयोगी गट)
(4) आठ जानेवारी सायंकाळी पाच वाजता बुलढाणा खासदार प्रतापराव जाधव (एकनाथ शिंदे गट)
(5) 10 जानेवारी सकाळी 11 वाजता हिंगोली खासदार हेमंत पाटील (शिंदे गट)
(6) 10 जानेवारी सायंकाळी पाच वाजता धाराशिव खासदार ओम प्रकाश पवनराजे निंबाळकर( शिवसेना उद्धव बाळासाहेब. ठाकरे गट)
(7) 11 जानेवारी सकाळी 11 वाजता परभणी खासदार संजय बंडू जाधव (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
(8) छत्रपती संभाजी नगर खासदार इम्तियाज जलील (एम आयh एम पक्ष)
(9) 13 व 25 जानेवारी . सकाळी 11 वाजता शिर्डी खासदार सदाशिव लोखंडे (एकनाथ शिंदे गट)
(10) 13 व 25 जानेवारी सायंकाळी पाच वाजता नाशिक खासदार हेमंत गोडसे (एकनाथ शिंदे गट)
(11) 21 जानेवारी सकाळी 11 वाजता शिरूर खासदार अमोल कोल्हे (शरद पवार गट राष्ट्रवादी)
(12) 21 जानेवारी सायंकाळी पाच वाजता मावळ लोकसभा मतदारसंघ खासदार श्रीरंग बारणे (एकनाथ शिंदे गट)
(13)24 जानेवारी सकाळी 11 वाजता रायगड लोकसभा मतदारसंघ खासदार सुनील तटकरे (अजित पवार गट राष्ट्रवादी)
(14)24 जानेवारी सायंकाळी पाच वाजता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ खासदार विनायक राऊत (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
(15)29 जानेवारी सकाळी 11 वाजता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ खासदार संजय मंडलिक (एकनाथ शिंदे गट)
(16) 30 जानेवारी सायंकाळी पाच वाजता हातकणंगले मतदारसंघ खासदार धैर्यशील माने (एकनाथ शिंदे गट)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिव संकल्प अभियानांतर्गत या लोकसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी आखली आहे त्यामध्ये एक अपक्ष नवनीत राणा अमरावती लोकसभा मतदारसंघ एक राष्ट्रवादी अजित पवार गट खासदार सुनील तटकरे रायगड लोकसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघ डॉक्टर अमोल कोल्हे शरद पवार गट छत्रपती संभाजी नगर इम्तियाज जलील एम आय एम व चार लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आहेत . तीन लोकसभा मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आहेत ते पुढील प्रमाणे परभणी संजय बंडू जाधव ,धाराशिव ओम प्रकाश पवनराजे निंबाळकर, व रत्नागिरी सिंधुदुर्ग विनायक राऊत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई व ठाणे पालघर या लोकसभा मतदारसंघात मात्र त्यांचे खासदार असताना देखील त्यांनी या ठिकाणी शिवसंकल्प अभियाना अंतर्गत प्रचार सभा का आयोजित केल्या नाहीत यावरून भाजपा व शिंदे गटात सर्व काही अलबेला तर नाही ना असा सवाल राजकीय निरीक्षकांकडून विचारला जात आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसंकल्प अभियानाअंतर्गत राज्यातील लोकसभा मतदारसंघात ज्या प्रचार सभा आयोजित केल्या आहेत त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा हिरवा झेंडा आहे का असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे कारण रायगड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सुनील तटकरे हे अजित पवार गटाकडे आहेत असे असताना देखील या लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाने दावा केला आहे तर दुसरीकडे भाजपा देखील हा मतदारसंघ लढण्यास इच्छुक आहे त्यासाठी त्यांनी शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याची तयारी चालू केली आहे त्यासाठी त्यांचे रायगड लोकसभा मतदारसंघात नित्य नियमाने दौरे देखील चालू आहेत
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवशंकर अभियाना अंतर्गत आयोजित केलेल्या लोकसभा मतदारसंघ निहाय दौऱ्याला भाजपाकडून हिरवा कंदील आहे की नाही असा प्रश्न भाजपाच्या सामान्य कार्यकर्त्यांना पडला असून शिंदे गट व भाजपा मध्ये वैचारिक समन्वय नसल्याने शिंदे यांची शिवसंकल्प अभियान यात्रा ही नियोजित कार्यक्रमानुसार होईल की नाही हे भाजपाच्या संभाव्य स्पष्टीकरणानंतरच स्पष्ट होईल एकंदरीत राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीला नवीन वर्षात प्रारंभ होत असल्याने राज्यातील राजकीय वातावरण ऐन थंडीच्या हंगामात तापण्यास सुरुवात होणार आहे हे मात्र नक्की..
तरुण गर्जना वृत्तपत्र सह चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरकरांच्या भावनांशी खेळणारे चौधरी बंधूंनो, भर चौकात द्या उत्तर मंत्री अनिल पाटील यांनी गौप्यस्फोट करीत दिले आव्हान *अमळनेर* (प्रतिनिधी) ...
-
शिरीष चौधरींच्या प्रचारात सुज्ञ व जेष्ठ नागरिक दाखवा आणि लाख रुपये मिळवा- विनोद लांबोळे अमळनेर- माजी आमदार शिरीष चौधरी यांचा या निवडणुकीत ना...
-
साक्री श्रमिक,शेतकरी, कष्टकऱ्यांचे लढावू नेते, शेतमजूर,कामगार व आदिवासी जनतेचे पाठीराखे,लाल निशाण पक्षाचे राज्य अध्यक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट...
-
डॉ. अनिल शिंदे निवडून आल्यास अनेक स्थानिक प्रश्न लागणार मार्गी:- मगन भाऊसाहेब, अमळनेर:- मागील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे निम-कळमसरे परि...
-
अमळनेर : समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर ने धडक दिल्याने पारोळ्याच्या एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अमळनेर पारोळा रस्त्यावर जिनिंग जवळ ९ रो...
-
अमळनेर- विधानसभा मतदारसंघात असलेल्या पारोळा तालुक्यातील सुमारे 42 गावात भरगच्च विकास कामांमुळे मंत्री अनिल पाटील यांनाच साथ मिळणार असा दावा ...
-
अमळनेर : तालुक्यातील चोपडाई कोंढावळ येथील एसएसटी पथकाने गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कार मधून सुमारे ४५ हजाराचा गुटखा आणि तंबाखू जप्त...
-
घरमालक कुटुंबाच्या चारही जणाविरुद्ध गुन्हा दाखल अमळनेर : घर खाली करण्यावरून वाद होऊन घरमालकाच्या कुटुंबाने भाडेकरूंच्या कुटुंबाल...
-
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील एकाच कुटुंबातील काका ,पुतण्या चुलत भाऊ, बहीण असे चार जण राज्य सेवा स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय...
-
खरा भूमिपुत्र कोण 2009 ला अनिल दादा विधानसभेला पराभूत झाले, परंतु पराभव विसरून अनिल दादा परत सक्रिय झाले. 2014 ला विधानसभेला परत एकदा पराभव ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा