Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
रविवार, ३ डिसेंबर, २०२३
संकटाचा सामना करण्याची ताकत ओबीसीमध्ये.....विलास वाघमोडे
इंदापूर : शासनाने दिलेले आरक्षण हे आपल्या हक्काचे आरक्षण आहे.आपल्या हक्काच्या आरक्षणावर कोणी घुसखोरी करू पहात असेल तर त्याला वेळीच प्रतिकार करण्यासाठी ओबीसी,भटक्या विमुक्त जाती, जमाती,
मागासवर्गीय व अल्पसंख्यांक समाजातील सर्वांनीच जागृत राहीले पाहिजे.कोण मोठा, कोण लहाण यापेक्षा विचाराने सर्वच जण मोठे आहोत.सर्वजण जिद्दीने कामाला लागलले आहेत.त्यामुळे आलेले कोणतेही संकट परतवून लावण्याची ताकत राज्यातील ओबीसी बांधवात असल्याचे मत इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती व ओबीसी नेते विलासबापू वाघमोडे यांनी मौजे काटी (ता.इंदापूर) येथे ओबीसी जनजागृती सभेत बोलताना केले.
ओबीसी नेते छगनरावजी भुजबळ यांची ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा शनिवार दि. ०९ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता इंदापूर नविन प्रशासकीय इमारत शेजारील मैदांनात इंदापूर तालुका सकल ओबीसी समाजाचे वतीने आयोजित करण्यात आलेली आहे.या सभेसाठी तालुक्यातील ओबीसी बांधवांनी उपस्थित राहण्यासंदर्भात जनजागृती सभेचे आयोजन मौजे काटी (ता.इंदापूर) भरतवाडी येथे शनीवार दि.०२ डिसेंबर रोजी सायंकाळी ०६:३० वाजता करण्यात आले होते.त्यावेळी विलास वाघमोडे बोलत होते.या प्रसंगी ओबीसी नेते युवराज मस्के, साहेबराव मोहिते,ओबीसी युवा नेते अतुल झगडे, इंदापूर न.प.माजी विरोधी पक्षनेता पोपट शिंदे,शेटफळ हवेली सरपंच संतोष पवार, काटी गावचे सरपंच सोमनाथ मोहिते,भटक्या विमुक्त जाती जमातीचे प्रदेश सचिव तानाजीराव धोत्रे,शिवाजी सातव, दिपक बोराटे,सुरेश मिसाळ, सुधाकर बोराटे,संतोष बनकर,बापू बोराटे,वैभव बनकर इत्यादी प्रमख उपस्थित होते.
मोठ्या कार्यात कुठेतरी,कुणीतरी खडा टाकुण आपला हेतु साध्य करण्याचा प्रयत्न होईल, त्याकडे सर्वांनीच दूर्लक्ष करून एकजुटीने व एकदिलाने काम हाती घेवुन ओबीसी मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत.
आपल्याला आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी राज्यातील ओबीसी नेते यांना पाठबळ देण्याचे कार्य करायचे आहे.जर आपण कमी पडलो तर तुमची आमची अस्मिता भविष्यात धोक्यात येण्याची शक्यता असल्याची भावना सध्या ओबीसीं मध्ये आहे.खरोखरच तशी भावना निर्माण झाली तर तुम्हाला आम्हाला आपले अस्तित्व राहील की नाही याची शक्यता नाही.त्यामुळे तालुक्यातील सकल ओबीसी बांधवांनी ०९ डिसेंबरच्या ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन विलास वाघमोडे यांनी केले.
या सभेसाठी राज्यातील प्रमुख म्हणुन महाराष्ट् राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,ओबीसी नेते प्रकाश शेंडगे,राष्ट्रिय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर,विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर,शब्बीर अन्सारी,
प्रा.टी.टी.मुंडे, अॅड.तायडे, लक्ष्मण गायकवाड हे प्रमुख मार्गदर्शक म्हणुन उपस्थित राहणार आहेत.यावेळी युवराज मस्के,साहेबराव मोहिते, अतुल झगडे,तानाजी धोत्रे,सुधाकर बोराटे यांनी उपस्थीताना मार्गदर्शन केले.या प्रसंगी सुभाष पाटील,सचिन परांडे, सचिन बोराटे, संतोष मोहिते,प्रकाश राऊत,राजु राऊत,देवराव बोराटे, दत्तात्रय माने,निवृत्ती भोसले,शिवाजी बनसोडे, सुधीर यादव, तुकाराम मोहिते, दिलीप मोहिते,नाना ताटे,सुनिल पडसळकर, संजय परांडे,लखन परांडे,मोहन सावंत,लखन नरबत, विशाल सावंत यांचेसह परिसरातील मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव उपस्थित होते.दिपक बोराटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सुधाकर बोराटे....
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरकरांच्या भावनांशी खेळणारे चौधरी बंधूंनो, भर चौकात द्या उत्तर मंत्री अनिल पाटील यांनी गौप्यस्फोट करीत दिले आव्हान *अमळनेर* (प्रतिनिधी) ...
-
शिरीष चौधरींच्या प्रचारात सुज्ञ व जेष्ठ नागरिक दाखवा आणि लाख रुपये मिळवा- विनोद लांबोळे अमळनेर- माजी आमदार शिरीष चौधरी यांचा या निवडणुकीत ना...
-
साक्री श्रमिक,शेतकरी, कष्टकऱ्यांचे लढावू नेते, शेतमजूर,कामगार व आदिवासी जनतेचे पाठीराखे,लाल निशाण पक्षाचे राज्य अध्यक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट...
-
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील एकाच कुटुंबातील काका ,पुतण्या चुलत भाऊ, बहीण असे चार जण राज्य सेवा स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय...
-
अमळनेर : तालुक्यातील ग्रामीण भागात एका रुग्णाला चिकुन गुनिया झाल्याचे उघडकीस आले असून नागरीकांनी आता डासांपासून सावध राहण्याची गरज आहे....
-
खरा भूमिपुत्र कोण 2009 ला अनिल दादा विधानसभेला पराभूत झाले, परंतु पराभव विसरून अनिल दादा परत सक्रिय झाले. 2014 ला विधानसभेला परत एकदा पराभव ...
-
भूमिपुत्र व विकास पुरुष म्हणून संपुर्ण शहरात अनिल दादांनाच पसंती- गोपी कासार व नरेंद्र चौधरी अमळनेर- शहरातील सर्वच प्रभागात महायुतीचे उमेदवा...
-
पारोळा येथील सभेत डॉ. शिंदे यांना विजयी करण्याचे केले आवाहन, अमळनेर:- काल ११ रोजी पारोळा येथे महाविकास आघाडीच्या सतीश पाटील व डॉ. अनिल शिंदे...
-
अमळनेर : अमळनेर हि संत आणि महंतांची भूमी आहे. या अमळनेरनगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप हा जंत करीत आहे. तेही केवळ राजकीय फायद्यासाठी, हे...
-
अमळनेर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांचा शहरी भागात प्रचार दौरा सुरू असून त्यांना प्रचारा दरम्यान भरघोस प्रतिसाद मिळत आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा