Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २४ डिसेंबर, २०२३

सारंगखेडा पोलीस निरीक्षक संदीप पाटील व पोलीस शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागात च्या जाळ्यात….!



नंदुरबार प्रतिनिधी :- नंदुरबार जिल्ह्यात काही महिन्यांपासून लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून चांगल्या प्रकारे लाचखोरांना वेळीच अटकवण्याचा प्रकार सुरू असल्याने लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत. लाच घेणाऱ्या व्यक्तींच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. याचे सर्व श्रेय एसीबी नंदुरबार यांना जाते.नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक संदीप उत्तमराव पाटील आणि चालक पोलीस शिपाई गणेश भामट्या गावीत यांना १००००/- रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले आहेत्यामुळे सारंगखेडा पोलीस स्टेशन वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.तक्रारदार यांना सारंगखेडा येथील यात्रेनिमित्त दारू वाहतुकीचा व्यवसाय करावयाचा असल्याने पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि चालक पोलीस शिपाई गणेश गावीत यांनी २१००० रुपये लाचेची मागणी केली होती.
 
या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. २१००० हजारहून ही डील १०००० हजारावर ठरवण्यात आले होते.
पोलीस निरीक्षण संदीप पाटील यांनी १०००० रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम पोलीस शिपाई यांनी पंचासमक्ष स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आले आहे. या निमित्ताने नंदुरबार पोलीस दलातील खाबुगिरी चव्हाट्यावर आली आली आहे .नाशिक लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सारंगखेडा पोलीस ठाण्यात सापळा रचून ही कारवाई केली आहे. या घटनेनंतर जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.सदरची ही कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घारगे – वालावलकर मॅडम पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक,माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक,

नरेंद्र पवार वाचक पोलीस उप अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली परशुराम ह.कांबळे पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक, पोलीस हवालदार सचिन गोसावी, प्रफुल्ल माळी यांनी केली आहे.

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा…



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध