Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २० डिसेंबर, २०२३

शिंदखेडा तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक जोमात, प्रशासन मात्र कोमात....



शिंदखेडा तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीचा कळस धुळे जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक हा नेहमीच कळीचा मुद्दा ठरला आहे.परिसरात विशेषता दररोज दिवसाढवळ्या अवैध गौण खनिजाचे शेकडो ट्रॅक्टर बिनदिक्कतपणे वाहतूक करतात. शनिवार,रविवार हे सुटीचे दिवस तर अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्यांसाठी हॉलिडे पॅकेज असल्याचे दिसून येत आहे.एकाच रॉयल्टीवर वारंवार फेऱ्या मारुन शासनाला चूना लावला जात असल्याचे दिसून येत आहे.याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे.


एकाच गौण खनिज परवान्यावर दिवसभर डंपर किंवा ट्रॉली भरून अवैध गौण खनिज वाहतूक जिल्ह्यात सर्रास होत आहे.अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक उद्योग रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विनापरवाना ब्लास्टिंग देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शिंदखेडा तालुक्यातील माळीच व गोराने,
वायपूर,चांदगड, बाभळे,खलाने..... ही गावे तर अवैध गौण खनिज वाहतुकीचे केंद्रे झाली आहेत. शेकडो ट्रॅक्टर,
जेसीपी या कामी असून एक ब्रास गौण खनिजाच्या पावतीवर दिवसभर ट्रॅक्टर, टिप्परद्वारे गौण खनिजाची वाहतूक केली जात आहे.तसेच स्थानिक तलाठी,मंडळ अधिकारी हे यांनी तर या सर्व बाबींना आपली मूक सहमतीच दर्शवली आहे.व त्यांना कुठल्याच कारवाईची भीती राहिली नाही.


जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केल्यास गौण खनिजाची किती मोठ्या प्रमाणात वाहतूक होते, हे स्पष्ट दिसून येऊ शकते.महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे हेतुपुरस्परपणे दुर्लक्ष होत असल्याने अनेक ट्रॅक्टर, टिप्पर हे विना नंबर आणि विना परवाना गौण खनिजाची वाहतूक करीत आहे.तहसीलदार शिंदखेडा यांच्यासह महसूल अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष पथक तयार करून अवैध गौण खनिज वाहतूक आणि उत्खनन प्रकरणी कारवाई करणे गरजेचे झाले आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.


(सविस्तर वाचा पुढील अंकात...)





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध