Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २ डिसेंबर, २०२३

थाळनेरला पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांना लोकप्रतिनिधींनी धरले धारेवर...



थाळनेर ( प्रतिनिधी) शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात गावातील लोकप्रतिनिधींनी भेट देऊन ग्रामसभेत शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरले.
      
याबाबत थोडक्यात वृत्त असे की ४/५ दिवस अगोदर झालेल्या ग्रामसभेत शेतकऱ्यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यातील दोघे कर्मचारी फी च्या नावावर अव्वाच्या सव्वा पैशाची मागणी करत असल्याची तक्रार केली होती.मागील ग्रामसभेत सदर कर्मचाऱ्यांबाबत तक्रारी होऊन काहीच कारवाई न झाल्यामुळे या ग्रामसभेत शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींना जाब विचारला होता.या तक्रारीच्या अनुषंगाने शिरपूर पंचायत समितीचे उपसभापती विजय बागुल, लोकनियुक्त महिला सरपंच सौ. मेघा संदीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिल मराठे, सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील, अक्षय पाटील,गिरीश सोनवणे,पत्रकार हेमंत चौधरी आदींनी शेतकऱ्यांसह पशुवैद्यकीय दवाखान्यात भेट दिली. पशु वैद्यकीय दवाखान्यात डॉ.परमेश्वर दुडोळे ,डॉ. भीमराव मोरे व लोखंडे उपस्थित होते. लोकप्रतिनिधींनी ग्रामसभेत गैरहजर राहिल्याबद्दल जाब विचारत शासकीय फी चा तक्ता दवाखान्या बाहेर लावून, हालचाल रजिस्टर ची तपासणी केली. शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या योजनांबाबत माहिती घेतली. 

यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल मराठे यांनी तक्रार केली की दोघे कर्मचारी एका शेतात दुपारी ३/४ तास झोपून राहतात.डॉक्टरांसह कर्मचारी मुख्यालय न राहता बाहेरगावी अपडाऊन करतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रात्री/अपरात्री उपचार न मिळाल्यामुळे  गुरे उपचाराअभावी दगावतात. शेतकऱ्यांना अनेक वेळा दवाखान्यात कर्मचारी मिळून येत नाही. शेतकऱ्यांनी काही गंभीर तक्रारी संबंधित कर्मचाऱ्यांबाबत केल्यात. लोक प्रतिनिधींनी संबंधितांना धारेवर धरल्यानंतर त्यांनी माफी मागत यापुढे असं काही होणार नाही अशी हमी यावेळी दिली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध