Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १८ डिसेंबर, २०२३

महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र दिघावे यांचे नवीन इमारतीत स्थलांतर झाले



साक्री तालुक्यातील काटवान परिसरातील दिघावे येथील महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र दिघावे या दुकानाचे नवीन इमारतीत स्थलांतर झाले आहे तरी दिघा व्यासह संपूर्ण सोळा गाव काटवान परिसरातील उत्कृष्ट कृषी निवेष्ठा विक्रेते म्हणून श्री मोठा भाऊ देसले नंदिन ता.सटाणा जि.नाशिक यांचे नाव परिसरात प्रचलित आहे मोठा भाऊ हे मूळ शेतकरी कुटुंबातील सदस्य आहेत परंतु ते गेल्या तीस वर्षापासून साक्री तालुक्यातील दिघावे येथे वास्तव्यात आले आहेत त्यामुळे या सोळा गाव काठवान भागातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना एक मोठा आधार त्यांच्या रूपाने लाभला आहे भविष्यात ऑरगॅनिक शेती काळाची गरज आहे हे परिसरातील शेतकऱ्यांना त्यांनी समजावून दिले व येणाऱ्या काळात सेंद्रिय शेती केल्याशिवाय पर्याय नाही असेही वेळोवेळी मार्गदर्शन ते शेतकऱ्यांना करत राहतात ते उत्कृष्ट असे डाळिंब बाग अभ्यासक व मार्गदर्शक आहेत तसेच भाजीपाला व इतर पिकांचे देखील त्यांचा गाढा अभ्यास आहे त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होतो कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांची फसवणूक न करता त्यांना दर्जेदार मालाचा पुरवठा कसा करता येईल यावर नेहमी त्यांचा भर असतो म्हणूनच काटवान परिसरातील शेतकऱ्यांमध्ये त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढते आहे आणि या भागातील डाळिंब बागांमधील अतिशय दुर्धर अशा तेल्या आजारावर देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शेतकऱ्यांना तेल्या रोगावर मात करणे शक्य झाले आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना उत्कृष्ट क्वालिटीचे डाळिंब पिकवणे व बाजारापर्यंत घेऊन जाणे तसेच भाव ही चांगला मिळवून देणे पर्यंत त्यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभत असते त्यांना शेतकरी हिताय शेतकरी सुखाय या उक्तीप्रमाणे वागणारे महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र दिघावे चे संचालक मोठा भाऊ देसले हे सर्वश्रुत शेतकऱ्यांमध्ये प्रचलित आहेत


तरुण गर्जना वृत्तपत्र सह चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध