Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १२ डिसेंबर, २०२३

भोई समाजाच्या मागण्यांची सरकार दखल घेत नसेल तर.......सकल भोई समाज नागपुरात विधान भवनाकडे जाणारे रस्ते जाम करणार...... भाऊसाहेब बावणे



नागपुर प्रतिनिधी :- गेल्या अनेक वर्षांपासून भोई समाज आपल्या मागण्या करीता संघर्ष करीत आहे परंतु कोणतेही सरकार समाजाच्या समस्या गांभीर्याने घेत नाही शांततेच्या मार्गाने केलेले आंदोलन सरकार पर्यंत पोहचत नाही त्या मुळे विधान सभेकडे जाणारे सर्व मार्ग जाम केल्यास सरकार पर्यंत आपल्या मागण्या पोहचतील त्यामुळे नागपुरात चक्का जाम करण्याचा निर्णय भोई समाज घेत आहे सरकार जर आक्रमक आंदोलन करणाऱ्यांचे म्हणणे ऐकत असेल तर भोई समाजानें ही त्याच मार्गाचा अवलंब केला पाहिजे सत्ताधारी सरकार समाजाच्या मागण्या बाबत साधी चर्चा ही करायला तयार नसतील तर सकल भोई समाजाने या वर गांभीर्याने विचार करावा आणि भोई समाजाच्या विविध संघटनेने एकत्रित होऊन नागपूर अधिवेशना दरम्यान विधान भवनाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चक्का जाम करून सरकारचे लक्ष भोई समाजाच्या मागण्यांकडे केंद्रित करावे असे आवाहन भोई समाजाच्या सर्व संघटनेच्या नेत्यांना भाऊसाहेब बावणे यांनी केले आहे.

या बाबत संघटनेच्या नेत्यांनी व्यक्तिगत व संघटनेचा भेद विसरून समाज हिता करीता आणि समाजाच्या अस्तित्वा करीता पेटून उठावे या करीता सामाजिक संघटनेच्या नेत्यांच्या  बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे सर्वांनी पुढे येऊन सरकारला इतर जाती प्रमाणे आपली ताकद दाखविण्या करीता पुढे यावे असे आवाहन राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब बावणे यांनी केले आहे या बाबत लवकरच तातडीची बैठक आयोजित करण्यात येत असून सामाजिक नेत्यांनी या तातडीच्या बैठकीत भाग घेण्या करीता राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाचे प्रदेश  अध्यक्ष ॲड अमोल बावणे यांच्या व्हॉटसअप क्रमांक 8605555303 वर संपर्क करावे  हे आंदोलन सकल भोई समाज या नावाने करण्यात येत आहे तरी सर्वांनी बैठकीत सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा भाऊसाहेब बावणे यांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध