Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

नाशिक विभागीय आयुक्त (प्र) जलज शर्मा यांच्या पत्रान्वये देवेंद्र पाटील यांच्याकडे धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा कार्यभार



शिरपूर : नाशिक विभागीय आयुक्त (प्र) जलज शर्मा यांच्या पत्रान्वये देवेंद्र पाटील यांच्याकडे धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा कार्यभार देण्यात आला आहे.

नाशिक विभागीय आयुक्त (प्र) जलज शर्मा यांनी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निर्देशित केलेल्या पत्रात म्हटले आहे की, धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष अश्विनी भटू पवार यांनी १४ डिसेंबर २०२३ रोजी अध्यक्ष पदाचा लेखी राजीनामा समक्ष विहीत नमुन्यात माझ्याकडे सुपूर्द केला आहे. तरी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम ४८ नुसार अध्यक्ष पद लागोलाग १४ डिसेंबर २०२३ रोजी मध्यान्होत्तर रिक्त झालेले आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम ५५ नुसार पुढील अध्यक्षांची निवडणूक होईपर्यंत धुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील हे अध्यक्षांच्या अधिकाराचा वापर करतील व त्यांचे कर्तव्य पार पाडतील, असे म्हटले आहे.

सदर पत्राची प्रत प्रधान सचिव (ग्रामविकास विभाग, मुंबई), उपाध्यक्ष (जिल्हा परिषद, धुळे), जिल्हाधिकारी धुळे व अश्विनी भटू पवार (सदस्य जिल्हा परिषद, धुळे) यांना माहितीस्तव पाठविण्यात आल्याचे पत्रात नमूद केले आहे.

देवेंद्र पाटील यांच्याकडे धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा कार्यभार सोपविण्यात आल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, नंदुरबार लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ. तुषार रंधे, शिरपूर विधानसभा निवडणूक प्रमुख प्रभाकरराव चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष चिंतनभाई पटेल, विविध संस्थांचे अनेक पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध