Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १ डिसेंबर, २०२३

थाळनेरला ग्रामसभा विविध विषयांवर गाजली,शेतकऱ्यांकडून पैशाची मागणी करणाऱ्या पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी...!



थाळनेर (प्रतिनिधी) शेतकऱ्यांकडून फी च्या नावावर अव्वाच्या सव्वा पैशांची मागणी करणाऱ्या दोघां पशु वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत विविध विषयांवर थाळनेरची ग्रामसभा गाजली
या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त महिला सरपंच सो. मेघाताई संदीप पाटील होते. ग्राम विकास अधिकारी वेताळे यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम केले. यावेळी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचा कृती आराखडा तयार करण्यात आला. आपलं गाव आपला विकास आराखडा तयार करण्यात आला. मोदी आवास योजना,शबरी व रमाई घरकुल योजनेबाबत उद्दिष्टे अनुसार लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली. यावेळी विष्णू मंदिराचा ताबा खाजगी व्यक्तींकडून ग्रामपंचायत कडे घेणे. माजी स्वातंत्र्य सैनिकास पर्यायी जागा देणे,बस स्थानक परिसरात मुतारी बांधणे, मराठे गल्लीत चढावावर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, दामशेर पाडा येथील गावठाण जागा घरकुल साठी देणे, दिव्यांगचा ५ टक्के निधी खर्च करणे, गावातील शॉपिंगचे भाडे वाढवणे, ग्रामविकास अधिकारी वेताळे यांच्या इतर गावाच्या चार्ज काढून फक्त थाळनेर गावासाठी मागणी करणे. खंडेराव मंदिर परिसरात यात्रे अगोदर साफसफाई करणे. मागील ग्रामसभेत शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे.
  यावेळी शेतकऱ्यांनी गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यातील दोघे कर्मचारी फी च्या नावाने अव्वाच्या सव्वा पैसे घेत असल्याची गंभीर तक्रार केली. सदर कर्मचाऱ्यांबाबत मागील ग्रामसभेतही तक्रार होऊन काहीच कारवाई न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया उमटवत लोकप्रतिनिधींना जाब विचारला. सदर कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाईच्या ठराव ग्रामसभेत करण्यात आला. ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर गुलाबराव पाटील यांनी रुग्णालयातील विविध सुविधांबाबत माहिती दिली. कृषी सहाय्यक सुनील सोनवणे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत माहिती दिली.

ग्रामसभेत शिरपूर पंचायत समितीचे उपसभापती विजय बागुल, विकास सोसायटीचे चेअरमन रमेश मराठे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कुबेर जमादार, कोळी समाजाचे अध्यक्ष देवनाथ कोळी, सामाजिक कार्यकर्ते प्रेमचंद शिरसाठ,संदीप पाटील, सुनील शिरसाठ, सुभाष पाटील,डोंगर कोळी, जितेंद्र माळी, शांताराम कोळी, बबलू मराठे, अरुण रायसिंग, उज्वल निकम,भूषण तलवारे ग्रामपंचायत सदस्य गणेश चौधरी, प्रदीप देवरे,अनिल मराठे मंगलाताई कोळी, प्रतिभाबाई कोळी ,अर्चना पाटील, सोनाली पाटील व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध