Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई....! हाडाखेड नाक्यावर 62 लाखांचा गुटखा जप्त ;



शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गुटख्याची तस्करी रोखत कंटेनरसह 62 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून या कारवाईने अवैधरीत्या गुटख्याची तस्करी करणाऱ्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. ही कारवाई हाडाखेडा चेकपोस्टवर शुक्रवार, 15 रोजी करण्यात आली.
 
हरीयाणातील कंटेनर चालक जाळ्यात

मध्यप्रदेशातील इंदोरहून भिवंडीत कंटेनरद्वारे गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती शिरपूरचे सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले होते. शुक्रवारी पहाटे सांगवी पोलिसांनी हाडाखेड येथील सीमा तपासणी नाक्याजवळ सापळा रचल्यानंतर साडेआठ वाजेच्या सुमारास कंटेनर (एच.आर.55 एक्स.5913) आल्यानंतर त्याची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा आढळल्याने हा कंटेनर जप्त करण्यात
 
कंटेनरसह 62 लाखांचा साठा जप्त

पोलिसांनी पंचांसमक्ष कंटेनरची झडती घेतल्यानंतर त्यात 29 लाख 95 हजार 200 रुपये किंमतीचा रॉयल 1000 गुटखा, 12 लाख 44 हजार 880 रुपये किंमतीचा एसएनके सनकी नावाचा गुटखा व 20 लाखांचा कंटेनर असा एकूण 62 लाख 40 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कंटेनर चालक अजीज शरीफ (40, अंजनपूर, जि.जिर्ग, फिरोजपूर, जि.नुहू, हरियाणा) याला अटक करण्यात आली.
 
यांनी केली कारवाई

ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, डीवायएसपी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूरचे सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाठ, सुनील वसावे, विजय पाटील, हवालदार संतोष पाटील, योगेश मोरे, संजय भोई, रामदास पावरा, चालक अल्ताफ मिर्झा यांनी ही कारवाई केली.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध