Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
बुधवार, २९ नोव्हेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
रब्बी हंगामासाठी ढगाळ वातावरणात कांदा पिकाचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत पी एम बायोटेक कडून मार्गदर्शन सूचना ?
रब्बी हंगामासाठी ढगाळ वातावरणात कांदा पिकाचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत पी एम बायोटेक कडून मार्गदर्शन सूचना ?
अवळाळी पावसात कांद्याच्या रोपवाटिकेमध्ये साठलेले अतिरिक्त पाणी शेताच्या बाहेर काढून द्यावे.मागील तीन-चार आठवड्याच्या सतत ढगाळ वातावरणामुळे व पावसामुळे हवेत आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहे.
रोपांची उभट वाढ झाल्याचे निर्दशनास येत आहे. रोपाच्या बुंध्याची जाडी कमी राहिलेली आहे. रोपांचे मुळे सडण्याचे प्रमाण वाढलेले आहे. रोपांच्या पातींना पीळ पडत असल्याचे दिसून येत आहे.
त्याकरिता पी.एम.बायोटेक पुणे चे या कंपनीची मार्गदर्शक सूचना ज्वारी केल्या आहेत
रोपे मजबूत व सशक्त होण्याकरिता
- ००:५२:३४ हे विद्राव्य खत २ ग्रॅम + पी.एम सिलीकॉन १ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून एकदा किंवा दोनदा फवारणी करावी. तसेच विद्राव्य गंधक ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात द्रावण करून या द्रावणाची प्रती चौरस मीटर २ लीटर द्रावणाची आळवणी करावी.
- रोपांवर करपा रोगाचा व फुलकिड्यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून डायथेन एम-४५ २ ग्रॅम + फेप्रोनिल १ मिली + पी.एम.स्टिकर १ मिली प्रति ली.पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- रोपवाटिकेमध्ये पी.एम बायोटेक चे ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ५ मिली प्रति लिटर पाण्यामध्ये द्रावण करून त्याची आळवणी करावी.
पुनर्लागवड झालेल्या कांदा पिकांची निगा व काळजी.
अवकाळी पावसात नुकत्याच पुनर्लागवड झालेल्या शेतातील रोपांची मुळे सडण्याचे प्रमाण व पातींना पीळ पडण्याचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. तसेच मध्यम ते भारी जमिनीतील वाफ्यामध्ये पाणी साचून राहिल्याने रोपांची मर होत आहे.
- अवकाळी पावसामुळे जमिनीमध्ये दिलेल्या खतांमधील अन्नद्रव्यांचा पाण्याबरोबर निचरा होत आहे.
- पिकाला नव्याने सुक्ष्म अन्नद्रव्ये व मुख्य अन्नद्रव्ये युक्त जैविक खतांचा अवलंब करणे गरजेचे आहे.
- लागवडीपूर्वी टाकलेले नसेल तर प्रति एकर १५ किलो युरिया + २० किलो १०:२६:२६ + २५ किलो सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त (काला) +५ किलो गंधक या खतांचा वापर करावा.
- सिलिकॉन मुलद्रव्य फवारणीतून पिकाला द्यावे.
- लागवडीनंतर १० दिवसापर्यंत पी.एम बायोटेक चे अॉटोबॅक्टर, पी. एस. बी प्रत्येकी २ लीटर प्रती एकर द्यावे.
- मुळकुज, कंदकुज टाळण्यासाठी ट्रायकोडर्मा व सुडोमोनास हे जैविक बुरशीनाशक प्रत्येकी २ लीटर प्रती एकर १० दिवसाच्या अंतराने २ ते ३ वेळेस द्यावे.
- करपा व फुलकिड्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डायथेन एम-४५ २ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल (०.१% ) किंवा हेक्झाकोनॅझोल १ ग्रॅम + फेप्रोनिल १ मिली किंवा प्रोफेनिफॉस १ मिली. किंवा लॅम्बडा सायहॅलेथ्रीन ३०% इ.सी. ०.५ मिली + स्टिकर १ मिली प्रति लीटर पाण्यात मिसळून आलटून पालटून १० ते १५ दिवसाच्या अंतराने फवारणी करावी. म्हणजे आपल्या पिकाला सुदृढ व निरोगी राहण्यासाठी मदत होईल व आपल्या उत्पादनात देखील मोठा बदल दिसून येईल
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील एकाच कुटुंबातील काका ,पुतण्या चुलत भाऊ, बहीण असे चार जण राज्य सेवा स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय...
-
अमळनेर : तालुक्यातील ग्रामीण भागात एका रुग्णाला चिकुन गुनिया झाल्याचे उघडकीस आले असून नागरीकांनी आता डासांपासून सावध राहण्याची गरज आहे....
-
खरा भूमिपुत्र कोण 2009 ला अनिल दादा विधानसभेला पराभूत झाले, परंतु पराभव विसरून अनिल दादा परत सक्रिय झाले. 2014 ला विधानसभेला परत एकदा पराभव ...
-
भूमिपुत्र व विकास पुरुष म्हणून संपुर्ण शहरात अनिल दादांनाच पसंती- गोपी कासार व नरेंद्र चौधरी अमळनेर- शहरातील सर्वच प्रभागात महायुतीचे उमेदवा...
-
साक्री दि.१५ : रब्बी हंगामाच्या सुरवातीलाच बाजारातून डीएपी आणि १०:२६ ही दोन्ही खते गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.त्यासोब...
-
अमळनेर : अमळनेर हि संत आणि महंतांची भूमी आहे. या अमळनेरनगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप हा जंत करीत आहे. तेही केवळ राजकीय फायद्यासाठी, हे...
-
अमळनेर: तालुक्यातील तासखेडा येथे घराच्या सामाईक भिंतीच्या बांधकामावरून दोन कुटुंबात वाद होऊन चौघांना मारहाण केल्याची घटना ९ रोजी घडली आहे...
-
अमळनेरकरांच्या भावनांशी खेळणारे चौधरी बंधूंनो, भर चौकात द्या उत्तर मंत्री अनिल पाटील यांनी गौप्यस्फोट करीत दिले आव्हान *अमळनेर* (प्रतिनिधी) ...
-
शिरीष चौधरींच्या प्रचारात सुज्ञ व जेष्ठ नागरिक दाखवा आणि लाख रुपये मिळवा- विनोद लांबोळे अमळनेर- माजी आमदार शिरीष चौधरी यांचा या निवडणुकीत ना...
-
साक्री श्रमिक,शेतकरी, कष्टकऱ्यांचे लढावू नेते, शेतमजूर,कामगार व आदिवासी जनतेचे पाठीराखे,लाल निशाण पक्षाचे राज्य अध्यक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा