Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
बुधवार, २९ नोव्हेंबर, २०२३
प्रियकराच्या मदतीने केला दरोड्याचा बनाव,साक्री दरोड्यातील तरुणीचा 'डाव' उधळला
साक्री प्रतिनिधी :- साक्रीतील सरस्वती नगरात सशस्त्र दरोडा प्रकरणात तरुणीचे अपहरण केल्याचा बनाव असल्याची बाब पोलीस तपासात उघडकीस आली आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. तरुणीचा अपहरण केल्याचा बनाव असल्याच्या माहितीला पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दुजोरा दिला आहे.
दहिवेल रस्त्यालगत विमलबाई पाटील महाविद्यालयाच्या पाठीमागे राहणाऱ्या ज्योत्स्ना पाटील यांच्या घरी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास चार ते पाच अज्ञात दरोडेखोर घरात शिरले. ज्योस्ना पाटील यांचे पती नीलेश पाटील काही कामानिमित बाहेरगावी गेले असल्याने त्यांनी त्यांच्यासोबत साक्रीतच राहणारी त्यांची भाची निशा मोठाभाऊ शेवाळे हिला सोबत बोलावले होते.
दरोडेखोरांनी घरात प्रवेश केल्यानंतर झटापट करत, तोंड हाताने दाबत तसेच त्यांच्याकडील लहान बंदूक व अन्य धारधार शस्त्रचा धाक दाखवत अंगावरील एकूण 88 हजार पाचशे रुपये किमतीचे दागिने हिसकावून घेतल्याचे ज्योत्स्ना पाटील यांनी पोलिसांनी सांगितले. त्यानुसार साक्री पोलीस ठाण्यात याचा गुन्हा दाखल करण्यात आला.विशेषता दरोडेखोरांनी निशा शेवाळे या तरुणीचे अपहरण केल्याची तक्रार झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली. त्यामुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी तपासाची सूत्रे फिरवली. दरम्यान संबंधित तरुणी ही मध्य प्रदेशातील सेंधवा परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांच्या पथकाने तिला ताब्यात घेतले. दरोडा आणि अपहरण प्रकरणात प्राथमिक तपास केला असता यात अपहरणाच्या प्रकरणात पोलिसांसमोर आलेली माहिती संशयास्पद असल्याचे दिसून आल्याने त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला. यात अपहरण करणारे दरोडेखोरांपैकी काहींची या तरुणी समवेत ओळख असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. या दोघांची सखोल चौकशी केली असता अपहरणाचा प्रकार हा बनाव असल्याचे निदर्शनास आले आहे. आता पोलिसांनी दरोडेच्या गुन्ह्याची माहिती देखील या दोघांकडून घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच या गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्या अन्य चौघांचा शोध देखील सुरू केला आहे . संबंधित तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
तिची प्रकृतीत सुधार झाल्यानंतर या गुन्ह्यातील आणखी माहिती पुढे येण्यास मदत होणार आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील एकाच कुटुंबातील काका ,पुतण्या चुलत भाऊ, बहीण असे चार जण राज्य सेवा स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय...
-
अमळनेर : तालुक्यातील ग्रामीण भागात एका रुग्णाला चिकुन गुनिया झाल्याचे उघडकीस आले असून नागरीकांनी आता डासांपासून सावध राहण्याची गरज आहे....
-
खरा भूमिपुत्र कोण 2009 ला अनिल दादा विधानसभेला पराभूत झाले, परंतु पराभव विसरून अनिल दादा परत सक्रिय झाले. 2014 ला विधानसभेला परत एकदा पराभव ...
-
भूमिपुत्र व विकास पुरुष म्हणून संपुर्ण शहरात अनिल दादांनाच पसंती- गोपी कासार व नरेंद्र चौधरी अमळनेर- शहरातील सर्वच प्रभागात महायुतीचे उमेदवा...
-
अमळनेर : अमळनेर हि संत आणि महंतांची भूमी आहे. या अमळनेरनगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप हा जंत करीत आहे. तेही केवळ राजकीय फायद्यासाठी, हे...
-
अमळनेर: तालुक्यातील तासखेडा येथे घराच्या सामाईक भिंतीच्या बांधकामावरून दोन कुटुंबात वाद होऊन चौघांना मारहाण केल्याची घटना ९ रोजी घडली आहे...
-
साक्री दि.१५ : रब्बी हंगामाच्या सुरवातीलाच बाजारातून डीएपी आणि १०:२६ ही दोन्ही खते गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.त्यासोब...
-
अमळनेरकरांच्या भावनांशी खेळणारे चौधरी बंधूंनो, भर चौकात द्या उत्तर मंत्री अनिल पाटील यांनी गौप्यस्फोट करीत दिले आव्हान *अमळनेर* (प्रतिनिधी) ...
-
शिरीष चौधरींच्या प्रचारात सुज्ञ व जेष्ठ नागरिक दाखवा आणि लाख रुपये मिळवा- विनोद लांबोळे अमळनेर- माजी आमदार शिरीष चौधरी यांचा या निवडणुकीत ना...
-
साक्री श्रमिक,शेतकरी, कष्टकऱ्यांचे लढावू नेते, शेतमजूर,कामगार व आदिवासी जनतेचे पाठीराखे,लाल निशाण पक्षाचे राज्य अध्यक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा