Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, २५ नोव्हेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिरपूर आगाराने चार कोटी १० लाख रुपयांची केली कमाई... अनेक वर्षांनंतर प्रथमच आगाराने केले लक्ष्य प्राप्त....!
शिरपूर आगाराने चार कोटी १० लाख रुपयांची केली कमाई... अनेक वर्षांनंतर प्रथमच आगाराने केले लक्ष्य प्राप्त....!
शिरपूर प्रतिनिधी:-धनतेरस आणि लक्ष्मीपूजनामुळे धनप्राप्तीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या दिवाळीने शिरपूर आगाराला अक्षरशः कोट्यधीश केले. अवघ्या २० दिवसांत शिरपूर आगाराने चार कोटी १० लाख रुपयांची कमाई केली. अनेक वर्षांनंतर प्रथमच आगाराने हे लक्ष्य प्राप्त केले.
नोव्हेंबरच्या प्रारंभापासूनच बसस्थानक गर्दीने फुलण्यास सुरवात झाली. विशेषतः लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बससेवेला मोठी मागणी होती.
महिला वर्गाला प्रवासभाड्यात ५० टक्के सूट असल्याने प्रवाशांमध्ये महिलांचा भरणा अधिक असल्याचे दिसून आले.आगार व्यवस्थापक व्ही. डी.देवराज, सहाय्यक वाहतूक अधीक्षक मनोज पाटील यांनी बसफेऱ्यांचे काळजीपूर्वक नियोजन केले.सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक मिलिंद परदेशी यांनी युद्धपातळीवर बसची दुरुस्ती, देखभाल करून प्रवासासाठी सज्ज केल्या.
परिणामी १ ते २० नोव्हेंबर या कालावधीत शिरपूर आगाराच्या बसने लांब व मध्यम पल्ल्याचा तब्बल सात लाख ७४ हजार ६३७ किलोमीटर प्रवास यशस्वीपणे केला.या वाहतुकीतून आगाराला चार कोटी दहा लाख ४४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.दिवाळीचा कालावधी शिरपूर आगारासाठी लाभयोग घेऊन आला. नियमित बसफेऱ्यांसह आगारातून लांब आणि मध्यम पल्ल्यासाठी जादा बस सोडण्यात आल्या.त्यांनी २३८ फेऱ्यांतून ८५ हजार किलोमीटर प्रवासी वाहतूक करीत ८ ते १८ नोव्हेंबर या दहा दिवसांत ३५ लाख १६ हजार ७६३ रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले.या कालावधीत प्रतिकिलोमीटर ४१ रुपये उत्पन्न मिळविण्याचा विक्रम शिरपूर आगाराने रचला आहे.
धुळे येथे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथा कार्यक्रमाची भाविकांमधील लोकप्रियता लक्षात घेऊन बस आगाराने विशेष नियोजन केले. शिरपूरच्या बसस्थानकातून थेट कथावाचन स्थळापर्यंत भाविकांच्या वाहतुकीची सोय आगाराने केली.
या उपक्रमालाही भाविक प्रवाशांनी उदंड प्रतिसाद दिला.या जादा १२६ बसफेऱ्यांच्या माध्यमातून आठ हजार ६४ किलोमीटर प्रवास करीत बसेसनी तीन लाख ६० हजार २०२ रुपयांचे उत्पन्न आगाराला मिळवून दिले.
प्रवाशांचा कल, अपेक्षा आणि मागणी लक्षात घेऊन शिरपूर आगारातर्फे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात.यापूर्वी आगाराने अष्टविनायक यात्रा, नवरात्रात नवदुर्गा यात्रा आदी उपक्रम राबविले असून, त्यांना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद लाभला.
"प्रवाशांचा आजही बससेवेवर विश्वास कायम आहे. सुरक्षित प्रवासाची हमी महामंडळ देत असते. प्रवाशांचा विमा असतो. आमचे चालक, वाहक बंधू, यांत्रिकी व पर्यवेक्षकीय कर्मचारी यांनी अथक परिश्रम केल्याने ही कामगिरी शक्य झाली." मनोज पाटील, सहाय्यक वाहतूक अधीक्षक
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील एकाच कुटुंबातील काका ,पुतण्या चुलत भाऊ, बहीण असे चार जण राज्य सेवा स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय...
-
अमळनेर : तालुक्यातील ग्रामीण भागात एका रुग्णाला चिकुन गुनिया झाल्याचे उघडकीस आले असून नागरीकांनी आता डासांपासून सावध राहण्याची गरज आहे....
-
खरा भूमिपुत्र कोण 2009 ला अनिल दादा विधानसभेला पराभूत झाले, परंतु पराभव विसरून अनिल दादा परत सक्रिय झाले. 2014 ला विधानसभेला परत एकदा पराभव ...
-
भूमिपुत्र व विकास पुरुष म्हणून संपुर्ण शहरात अनिल दादांनाच पसंती- गोपी कासार व नरेंद्र चौधरी अमळनेर- शहरातील सर्वच प्रभागात महायुतीचे उमेदवा...
-
साक्री दि.१५ : रब्बी हंगामाच्या सुरवातीलाच बाजारातून डीएपी आणि १०:२६ ही दोन्ही खते गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.त्यासोब...
-
अमळनेर : अमळनेर हि संत आणि महंतांची भूमी आहे. या अमळनेरनगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप हा जंत करीत आहे. तेही केवळ राजकीय फायद्यासाठी, हे...
-
अमळनेर: तालुक्यातील तासखेडा येथे घराच्या सामाईक भिंतीच्या बांधकामावरून दोन कुटुंबात वाद होऊन चौघांना मारहाण केल्याची घटना ९ रोजी घडली आहे...
-
अमळनेरकरांच्या भावनांशी खेळणारे चौधरी बंधूंनो, भर चौकात द्या उत्तर मंत्री अनिल पाटील यांनी गौप्यस्फोट करीत दिले आव्हान *अमळनेर* (प्रतिनिधी) ...
-
शिरीष चौधरींच्या प्रचारात सुज्ञ व जेष्ठ नागरिक दाखवा आणि लाख रुपये मिळवा- विनोद लांबोळे अमळनेर- माजी आमदार शिरीष चौधरी यांचा या निवडणुकीत ना...
-
साक्री श्रमिक,शेतकरी, कष्टकऱ्यांचे लढावू नेते, शेतमजूर,कामगार व आदिवासी जनतेचे पाठीराखे,लाल निशाण पक्षाचे राज्य अध्यक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा