Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
बुधवार, २२ नोव्हेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
मयत व्यक्तीच्या नावाचे बनावट दस्तावेज बनून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी ८ जणांवर चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल....
मयत व्यक्तीच्या नावाचे बनावट दस्तावेज बनून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी ८ जणांवर चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल....
चोपडा प्रतिनिधी:- चोपडा तालुक्यातील मजरे हिंगोणा ग्रामपंचायतीत मयत व्यक्तीच्या नावाचे बनावट दस्तावेज बनून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी प्रथमवर्ग मा.न्यायदंडाधिकारी चोपडा जि.जळगाव यांचेकडुन आर पी सी १५६/३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश प्राप्त झाल्याने चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी प्रसाद सुधाकर सुर्यवंशी वय २५ वर्ष व्यवसाय – शेती रा.मजरे हिंगोणा ता.चोपडा यांनी दिलेल्या फिर्यादी वरून कल्पनाबाई जिजाबराव पाटील वय ५० वर्ष (सरपंच), नंदकिशोर चिंधु सांगोरे वय ४८ (उपसंरपंच), करुणा रामकृष्ण ईघाटे वय ३५ धंदा घरकाम, मालती भागवत पाटील वय ३६ (सदस्या), आशाबाई नाना भील वय ५१ (सदस्या), साहेबराव छगन पाटील वय ६८ (सदस्य), संगीताबाई छगन पाटील वय ४२ (सदस्या), शाताराम आर पाटील वय ५८ (तत्कालीन ग्रामसेवक) सर्व रा.मजरेहिंगोणा ता.चोपडा जि.जळगाव यांनी सन २०२२ ते २०२३ मजरे हिंगोणा ता.चोपडा सरपंच उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य पदावर कार्यरत असतांना पंचायती राज योजनेत मजूर म्हणून काम केलेली व्यक्ती, पोपट यादव पाटील, पिंताबर दौलत धिवर, उत्तम बाबुराव पाटील, ज्ञावेश्वर सिताराम पाटील हे सन २००९, २०१३, २०१४, २०१९ वर्षी मयत झालेले असताना त्यांचे नावाने खोटे दस्ताएवज तयार करुन खोट्या सह्या करुन शासनाकडुन २६१५७ /- रु काढुन शासनाची दिशाभुल करुन शासनाकडुन येणाऱ्या निधीचा स्वताच्या हीतासाठी अपहार केला म्हणुन, चोपडा ग्रामीण पोलिसात भादवी कलम ४०६, ४२०, ४६४, ४६८, ४२७, ४७७(A), ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील एकाच कुटुंबातील काका ,पुतण्या चुलत भाऊ, बहीण असे चार जण राज्य सेवा स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय...
-
अमळनेर : तालुक्यातील ग्रामीण भागात एका रुग्णाला चिकुन गुनिया झाल्याचे उघडकीस आले असून नागरीकांनी आता डासांपासून सावध राहण्याची गरज आहे....
-
खरा भूमिपुत्र कोण 2009 ला अनिल दादा विधानसभेला पराभूत झाले, परंतु पराभव विसरून अनिल दादा परत सक्रिय झाले. 2014 ला विधानसभेला परत एकदा पराभव ...
-
भूमिपुत्र व विकास पुरुष म्हणून संपुर्ण शहरात अनिल दादांनाच पसंती- गोपी कासार व नरेंद्र चौधरी अमळनेर- शहरातील सर्वच प्रभागात महायुतीचे उमेदवा...
-
साक्री दि.१५ : रब्बी हंगामाच्या सुरवातीलाच बाजारातून डीएपी आणि १०:२६ ही दोन्ही खते गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.त्यासोब...
-
अमळनेर: तालुक्यातील तासखेडा येथे घराच्या सामाईक भिंतीच्या बांधकामावरून दोन कुटुंबात वाद होऊन चौघांना मारहाण केल्याची घटना ९ रोजी घडली आहे...
-
अमळनेर : अमळनेर हि संत आणि महंतांची भूमी आहे. या अमळनेरनगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप हा जंत करीत आहे. तेही केवळ राजकीय फायद्यासाठी, हे...
-
मतदारांच्या मनातील भीती दूर होण्यासाठी इंडोतिबेट व स्थानिक पोलिस पथकाने रूट मार्च काढला अमळनेर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभ...
-
अमळनेरकरांच्या भावनांशी खेळणारे चौधरी बंधूंनो, भर चौकात द्या उत्तर मंत्री अनिल पाटील यांनी गौप्यस्फोट करीत दिले आव्हान *अमळनेर* (प्रतिनिधी) ...
-
साक्री श्रमिक,शेतकरी, कष्टकऱ्यांचे लढावू नेते, शेतमजूर,कामगार व आदिवासी जनतेचे पाठीराखे,लाल निशाण पक्षाचे राज्य अध्यक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा