Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
महामार्ग पोलीस केंद्र,शिरपूर तर्फे अपघातामधील पिडीत व्यक्तींच्या स्मरणार्थ जनजागृती व कायदेविषयक शिबिर संपन्न...!
महामार्ग पोलीस केंद्र,शिरपूर तर्फे अपघातामधील पिडीत व्यक्तींच्या स्मरणार्थ जनजागृती व कायदेविषयक शिबिर संपन्न...!
शिरपूर प्रतिनिधी:- महामार्ग पोलीस केंद्र, शिरपूर तर्फे आज जागतिक स्मरण दिनानिमित्ताने रस्ते अपघातामधील पिडीत व्यक्तींच्या स्मरणार्थ जनजागृती व कायदेविषयक शिबिर शिरपूर तालुक्यातील आमोदे येथील सारंगेश्वर महादेव मंदिरात संपन्न झाला.
महाराष्ट्राचे महामार्ग विभागाचे प्रमुख मा.श्री.डॉ.रविद्रकुमार सिंगल, अपर पोलीस महासंचालक (वाहतुक) महाराष्ट्र राज्य- मुंबई, मा. श्री. डॉ. मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्र, ठाणे, मा.श्री. प्रदिप मैराळे, पोलीस उपअधीक्षक, महामार्ग पोलीस विभाग, नाशिक यांचे निर्देशानुसार रस्ते अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या, गंभीर जखमी झालेल्या, अपघातामध्ये अपंगत्व प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ तसेच अपघातातील पिडीतांच्या कुटुंबियांच्या सात्यनाकरीता तसेच त्यांना कायदेशिर मार्गदर्शनाकरीता सामाजिक जबाबदारी म्हणून दरवर्षी नोव्हेंबर महिन्यातील ०३ रा रविवार हा जागतिक स्मरण दिन म्हणून पाळण्यात येतो. तरी दिनांक १९/११/२०२३ रोजी जागतिक स्मरण दिन पाळण्यात येत असुन महामार्ग पोलीस विभाग, महाराष्ट्र राज्य कार्यालयाकडून सदर दिनाचे औचित्य साधुन दिनांक १९/११/२०२३ ते २४/११/२०२३ पर्यंत रस्ते अपघाताबाबत विविध जगजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
म्हणून महामार्ग पोलीस केंद्र, शिरपुरकडून दि. २३/११/२०२३ रोजी ११.३० वाजता सारंगेश्वर महादेव मंदिर, आमोदे, ता. शिरपुर, जि. धुळे येथे रस्ते अपघातातील मृत्युमुखी पडलेल्या, गंभीर जखमी, अपंगत्व आलेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ तसेच त्यांच्या कायदेशिर मार्गदर्शनासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.
सदर कार्यक्रमांत मा.श्री. प्रदिप मैराळे, पोलीस उपअधीक्षक, महामार्ग पोलीस विभाग, नाशिक, मा. श्री. हेमंतकुमार भामरे, महामार्ग विभाग धुळे, एडवोकेट शातांराम काशीराम महाजन, बार असोसिएशन अध्यक्ष, शिरपुर, एडवोकेट शिवाजी एन राजपुत व प्रविण जे. पाटील, मोटार अपघात दावा हाताळणारे तज्ञ वकील, शिरपुर, ता. शिरपुर, जि.धुळे, पो.उप.नि.एम. आय. मिर्झा, प्रभारी अधिकारी, महामार्ग पोलीस केंद्र, शिरपुर, पो.उप.नि. भुषण पाटील, पोलीस अंमलदार तसेच अपघातातील पिडीत तसेच जखमी व्यक्तीचे नातेवाईक व मृत्युंजय दुत उपस्थित होते. सदर कार्यक्रमात मा. श्री. प्रदिप मैराळे, पोलीस उपअधीक्षक, महामार्ग पोलीस विभाग, नाशिक, मा.श्री. हेमंतकुमार भामरे, महामार्ग विभाग धुळे यांनी उपस्थित नागरिकांना महामार्गावर वाहन चालवितांना आपले वाहन हे वेग मयदित वाहन चालविणे, दुचाकी चालक यांनी हेल्मेट परिधान करणे, दारु पिऊन वाहन चालवु नये, मोबाईल फोन वाहन चालवितांना वापर करु नये, कारचालकांनी सिट बेल्टचा वापर करावा तसेच एडवोकेट शातांराम काशीराम महाजन, बार असोसिएशन अध्यक्ष, शिरपुर, ता. शिरपुर, जि. धुळे, एडवोकेट शिवाजी एन राजपुत व प्रविण जे. पाटील, मोटार अपघात दावा हाताळणारे तज्ञ वकील, शिरपुर, ता. शिरपुर, जि. धुळे यांनी मयत तसेच जखमी व्यक्तींच्या नातेवाईकांना मोटार अपघात दावा तसेच विमा संदर्भात येणा-या अडचणी संदर्भात मार्गदर्शन करुन कायदेविषयक मार्गदर्शन करुन शासकिय योजनाबाबत माहिती दिली.
तसेच सदरचे अपघातामध्ये वेळोवेळी मृत्युंजय १. लोटन मोहन जगदेव, रा. मु. पो. पळासनेर, ता. शिरपुर, अरविंद विजयसिंग जमादार, वय-३६, मु.पो.पळासनेर, ता. शिरपुर, जि. धुळे यांनी तात्काळ म.पो. केंद्र, शिरपुर येथील प्रभारी यांना फोनव्दारे सदर घटनेची माहिती देवुन तात्काळ केन तसेच ॲम्बुलन्स ला फोन करुन ॲम्बुलन्स बोलावुन म.पो. केंद्र, शिरपुर येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्यासोबत सदर अपघातग्रस्तांना वैद्यकिय उपचाराकामी ॲम्बुलन्स मध्ये ठेवण्यास वाहतुक सुरळीत करण्यास वेळोवेळी मदत करीत असतात त्यामुळे अपघात ग्रस्तांना वेळीच उपचार मिळाल्याने अनेक अपघात ग्रस्तांचे प्राण वाचविलेले आहे. म्हणुन त्यांचाही कार्यक्रमात गौरव करुन तसेच प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील एकाच कुटुंबातील काका ,पुतण्या चुलत भाऊ, बहीण असे चार जण राज्य सेवा स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय...
-
अमळनेर : तालुक्यातील ग्रामीण भागात एका रुग्णाला चिकुन गुनिया झाल्याचे उघडकीस आले असून नागरीकांनी आता डासांपासून सावध राहण्याची गरज आहे....
-
खरा भूमिपुत्र कोण 2009 ला अनिल दादा विधानसभेला पराभूत झाले, परंतु पराभव विसरून अनिल दादा परत सक्रिय झाले. 2014 ला विधानसभेला परत एकदा पराभव ...
-
भूमिपुत्र व विकास पुरुष म्हणून संपुर्ण शहरात अनिल दादांनाच पसंती- गोपी कासार व नरेंद्र चौधरी अमळनेर- शहरातील सर्वच प्रभागात महायुतीचे उमेदवा...
-
साक्री दि.१५ : रब्बी हंगामाच्या सुरवातीलाच बाजारातून डीएपी आणि १०:२६ ही दोन्ही खते गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.त्यासोब...
-
अमळनेर: तालुक्यातील तासखेडा येथे घराच्या सामाईक भिंतीच्या बांधकामावरून दोन कुटुंबात वाद होऊन चौघांना मारहाण केल्याची घटना ९ रोजी घडली आहे...
-
अमळनेर : अमळनेर हि संत आणि महंतांची भूमी आहे. या अमळनेरनगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप हा जंत करीत आहे. तेही केवळ राजकीय फायद्यासाठी, हे...
-
मतदारांच्या मनातील भीती दूर होण्यासाठी इंडोतिबेट व स्थानिक पोलिस पथकाने रूट मार्च काढला अमळनेर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभ...
-
अमळनेरकरांच्या भावनांशी खेळणारे चौधरी बंधूंनो, भर चौकात द्या उत्तर मंत्री अनिल पाटील यांनी गौप्यस्फोट करीत दिले आव्हान *अमळनेर* (प्रतिनिधी) ...
-
साक्री श्रमिक,शेतकरी, कष्टकऱ्यांचे लढावू नेते, शेतमजूर,कामगार व आदिवासी जनतेचे पाठीराखे,लाल निशाण पक्षाचे राज्य अध्यक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा