Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २६ नोव्हेंबर, २०२३

पोलिस अधिक्षक नंदुरबार यांना पिडीतास नुकसान भरपाई देण्याचे मानवी हक्क आयोगाचे आदेश...!



नंदुरबार प्रतिनिधी:- खोटे गुन्हे दाखल केले म्हणून पोलिस अधिक्षक नंदुरबार यांना पिडीतास 21 हजार नुकसान भरपाई देण्याचे आदेश महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाणे दिला आहे अशी माहिती अॅड. रोहनसिंग गिरासे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
नंदुरबार येथील अटलबिहारी वाजपेयी सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, दि.१२/०३/२०२२ रोजी नंदुरबार ते दोंडाईचा रस्त्यावर रनाळा गावाजवळ ५०० गौवंश भरलेली चारचाकी गाडी पकडली होती. सदर गाडीमध्ये (पिकअप गाडी नं.एम.एच.३९ एडी- १४३७) गौवंशच्या कातडी असल्यासंदर्भात केतन रघुवंशी यांनी नंदूरबार तालुका पोलिस स्टेशनला संपर्क करून पोलिसांना जागेवर बोलावले होते.

पोलिस जागेवर आल्यानंतर गाडी ड्रायव्हर जवळ कागदपत्रांची मागणी केली असता त्याच्याजवळ कुठलेही बिल नसल्यामुळे गाडी नंदुरबार तालुका पोलिस स्टेशन येथे कार्यवाहीसाठी आणली होती. त्यावेळी सदर गाडीवर कायदेशिर कार्यवाही व्हावी म्हणून केतन रघुवंशी यांनी फिर्याद (तक्रार) दिली होती.

परंतु दि.१८/०३/२०२२ रोजी सदर गाडी ही कुठलीही कायदेशिर पुर्तता/दस्तऐवज / बिल न घेता गाडी सोडण्यात आली. त्यामुळे केतन रघुवंशी यांनी सुदर्शन न्युज चॅनलवर बातमी लावल्यामुळे नंदुरबार तालुका पोलिस स्टेशनचे संबंधित अधिकारी यांनी त्याचा राग मनात धरून दि. १६/०३/२०२२ रोजी सदर गाडी मालकाला बोलावुन रस्त्यावर गाडी अडवुन दहशत निर्माण केली असा खोटा गुन्हा दाखल केला व तसेच सहाय्यक पो.नि.योगेश शामराव चौधरी यांनी देखील बातमी लावल्याच्या रागातुन पोलिसांची बदनामी केली म्हणून खोटा गुन्हा दाखल केला होता.
 
त्यात गु.र.नं. १००/२२ व गु.र.नं. १०१/२२ असा नंबर लागला होता. या कार्यवाहीचा आधार घेऊन केतन रघुवंशी यांनी त्यांचे मुलभुत अधिकारांचे हनन झाले म्हणून महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

सदर तक्रारीत महाराष्ट्र मानवी हक्क आयोग यांनी निकाल देतांना पोलिस अधिक्षक नंदुरबार यांनी तक्रारदार केतन दिलीप रघुवंशी यांना रु.२१ हजार इतकी रक्कम एक महिन्याच्या आत नुकसान भरपाई द्यावी. तसेच संबंधित पोलिस अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करुन कार्यवाही करण्याचे आदेशित केले आहे. तक्रारदार तर्फे अॅड. रोहनसिंग गिरासे यांनी बाजू मांडली असे त्यांनी सांगितले. यावेळी गोरक्षक केतन रघुवंशी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध