Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०२३

जन्म दात्या वडिलांना दोघी मुलींनी दिला अग्नी डाग,चुंचाळे गावातील घटना...!



गलंगी ता चोपडा :- आजच्या आधुनिक युगात मुलांबरोबर मुलींना देखील तेवढेच स्थान आहे. जेवढे मुलांना आहे. सर्वच क्षेत्रात मुली देखील आम्ही कुठे मागे नाहीत. असा संदेश देतांना दिसत असतात. जुन्या लोकांची एक म्हण आहे "मुलगा पेक्षा मुलगी बरी" या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव आज चोपडा तालुक्यातील चुंचाळे गावात पहायला मिळाला. 

सविस्तर वृत असे की, चोपडा तालुक्यातील चुंचाळे गावातील प्रगतशील शेतकरी कै. विठ्ठल तुकाराम पाटील यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी अल्पशा: आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली या दोन्ही मुलींचे लग्न झाल्यामुळे त्यांना भाऊ नव्हता. आपल्या वडिलांच्या अंत संस्कार प्रसंगी सुरेखा कमलाकर भामरे राहणार चोपडा व लहान मुलगी जागृती भुषण बाविस्कर राहणार लहान हातेड या दोन्ही बहिणींनी आपल्या वडिलांचे अंत यात्रेत खांदा देऊन स्मशानभूमीत अग्नी डाग दिल्यामुळे त्यांचे समाजात सर्वत्र कौतुक केले जात आहे. कारण आपल्याला जरी भाऊ नसला तरी काय झाले भावाचे कर्तव्य मुली देखील पार करु शकतात. असा संदेश त्यांनी समाजात निर्माण केला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध