Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०२३
चटपटीत चकली....! एक मसालेदार गंमत....!
दीपावली उत्सव म्हटलं की लगबग,
साफसफाई,नवीन कपडे खरेदी,
रंग रंगोटि,गाठीभेटी असं सगळं अगदी
भरगच्च दिनचर्येचे दिवस...पण यात खरी परीक्षा होत असते ती हर एक गृहदेवतेची...आणि ती यासर्व उपद्व्यापातून लीलया सर्व गोष्टी पार पाडत असते, या सणाच्या किमान पंधरा दिवस आधी पासून वेळापत्रक सुरू होते ते तुलसी विवाह होई पर्यंत....
दिवाळी म्हणजे सर्व सणांचा राजा...
या सणाच्या मध्यवर्ती भूमिकेत असतो तो म्हणजे चवदार,खुसखुशीत फराळ,
किमान दहा गोड,तिखट असे अनेक पदार्थ हे आपली रसना तृप्त करत असतात...याच उत्सवाच्या तयारीत खरेदी हा एक जपून डोळे उघडे ठेवून करण्याचा कोणत्याही संसारातील महत्वाचा संस्कार याच संस्कारा नंतर घडलेली एक मसालेदार गंमत सांगतो.....श्री.फळदिपकर नावाचे एक कुटुंब महाड मधे स्थायिक झाले होते,हे नेहमी आमच्याकडून खरेदी करत असत, माझ्याकडे उपलब्ध असलेले सर्व मसाले,तयार पिठे,अस्सल खाद्यतेलं न्यायला आले होते, हे सर्व अगदी सालाबादप्रमाणे करून गेले...
त्यानंतर चार दिवसांनी श्री.फळदिपकर
यांज कडून फराळ करण्यासाठी या असे अगदी आग्रहाचे आमंत्रण आले,मी ही शुभेच्छा दिल्या आणि हो,येईन म्हटले, पण दिवाळी हंगाम असल्याने व्यावसायिक धावपळीत जाणे नाही झाले....मग पुन्हा निरोप आला...आला नाहीत फराळाला....आजच या,सौ.
अश्विनी मॅडम याना घेऊन या,
आम्ही उभयता गेलो, खूप छान स्वागत झाले, गप्पा झाल्या, भाड्याने घेतलेले घर अगदी नीटनेटके ठेवले होते, मनमोहक सुगंध असलेल्या उदबत्या लावल्या होत्या आम्ही घर पूर्ण पाहिले आणि मस्त हवेशीर ओटीवर असलेल्या दिवाणावर बसलो....पण, तिथे गेल्यापासून श्री.फळदिपकर
पती पत्नी काहीतरी हळूच खुसफुस,
खुसफुस करत बोलत असल्याचा अंदाज येत होता...नेमके काय ते समजत नव्हते बाकी सगळच छान वातावरण होतं,मग, तबक भरून फराळ आला,पाणी आले...गम्मत अशी झाली, श्री.फळदिपकर वहिनी सारखं सारखं...आग्रह करत होत्या "चकली कशी झाली आहे सांगा"हे विचारत होत्या. मग मात्र एक अंदाज आला, आम्ही आग्रह करवून बोलवलेले परिचित आहोतच पण पाहुणे कम परिक्षक असल्याचा हा ही अंदाज आला,(हा हा हा), शेवटी आम्ही दोघांनी चकली पासूनच सुरुवात केली,
मस्त खुसखुशीत तर होती, जरा मसालेदार पण चटकदार होती, सामान्यपणे चकली असते त्या पेक्षा जरा तिखटपणा,आणि मसालेदारपणा, झुकणारी होती,गोल गरगरीत असल्यानं
थोडी तिखट वळणाची होती.आणि त्या नंतर गोड पदार्थाला हात घालायला लावणारी होती,आता मात्र समजेना हा काय प्रकार आहे,फराळ तर उत्तमच होता, प्रामुख्याने तिखट वाटली तरी चकली ही छान होती,बघा...ऐका, चकली आवडली त्यांना,
नाहीतर तुम्ही, चव बदलली म्हणून
नुसती बोंब मारत होतात ..
श्री.फळदिपकर वहिनी या जरा वैतागून बोलत होत्या अर्थात त्याचं हे बोलणे हे
श्री.फळदिपकर साहेबासाठी होतं...
आणि मघाशी आलेला अंदाज हा अंदाज नसून तर्क पक्का निघाला....
मग, चहा आला...थोड्या गप्पा झाल्या,
सौ अश्विनी घरात आत जाऊन,
सौ.फळदिपकर यांचा निरोप घ्यायला म्हणुन गेली, दोन पाच मिनिटे गेली,
ती बाहेर आली,वहिनी ही बाहेर आल्या
मी बाईक नेली होती, ती चालू करे पर्यंत
या दोघी हलकेच हसत होत्या,
मग निरोप घेतला आणि निघालो,
त्यांच्या घरापासून थोडे अंतर गेल्यावर
आमची सौभग्यावती हसायला लागली, मी म्हंटले घे हसून पण नेमका विनोद काय झालाय तो तर मला सांग....कुठे झाला ते ही सांग.....?? विनोद आवडला तर मी ही हसून आनंद घेईन....
मला विचारत होती, आपल्या शॉप मधून फळदिपकर यांनी काय काय खरेदी केले होते.... मी म्हंटले सर्वच वस्तू नेल्या,त्यात तेल, मसाले,तयार पिठे...मग त्यात चिकन मसाला पण होता का??? मी म्हंटले हो... आणि हे ही सांगितले की त्या म्हणत होत्या, भाऊबीजेला माझा भाऊ आला ना, की चिकन बनवणार आहे,
अग...बर मग त्याचे पुढे काय??
अहो,फळदिपकर वहिनीने चुकून चकली मसाल्या ऐवजी चकली भाजणीत चिकन मसाला टाकला.... मसाल्याच्या कागद कचऱ्यात टाकताना त्याना हे समजले, पण तो पर्यंत....सर्व चकल्या तळून तयार होत्या...
मग काय वहिनी गप्प,नवऱ्याला काय सांगणार...कसे समजावून देणार...
म्हणून आज त्यांनी फॅमिली कोर्ट उभे केले...तुम्ही न्यायाधीश होतात आणि आता मी फळदिपकर वहिनीची वकील....(हा हा हा)अहो खरी गम्मत तर पुढे आहे,तुमचे फळदिपकर साहेब हे त्यांच्या बायकोवर, चक्क चकली बिघडवून ठेवलीस या आरोप करण्यापासून वाचले बा इज्जत बरी झाले....हा हा हा...
असो ही घटना अगदी खरी आहे,पण हे चविष्ट फळदिपकर आडनाव मात्र असच बनवले आहे, कोणाचे या आडनावाशी साधर्म्य आढळले तर तो योगायोग समजावा, या घटनेतील खरं आडनांव शोधत बसू नका,मला कोणत्याही आदर्श गृहिणीची चेष्टा करायची नाही,पण आपणही चिकन मसाला टाकून चकली बनवा करा प्रयोग,खरचं छान लागते.... कोणालाही आवडली नाही तर मी नक्की येईन
माझे नाव व संपर्क देतो..
आपणा सर्वांना दीपावली व नवंवर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.....
शब्दांकन...
राकेश वि. मेहता
महाड
9881479214
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील एकाच कुटुंबातील काका ,पुतण्या चुलत भाऊ, बहीण असे चार जण राज्य सेवा स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय...
-
अमळनेर : तालुक्यातील ग्रामीण भागात एका रुग्णाला चिकुन गुनिया झाल्याचे उघडकीस आले असून नागरीकांनी आता डासांपासून सावध राहण्याची गरज आहे....
-
खरा भूमिपुत्र कोण 2009 ला अनिल दादा विधानसभेला पराभूत झाले, परंतु पराभव विसरून अनिल दादा परत सक्रिय झाले. 2014 ला विधानसभेला परत एकदा पराभव ...
-
भूमिपुत्र व विकास पुरुष म्हणून संपुर्ण शहरात अनिल दादांनाच पसंती- गोपी कासार व नरेंद्र चौधरी अमळनेर- शहरातील सर्वच प्रभागात महायुतीचे उमेदवा...
-
साक्री दि.१५ : रब्बी हंगामाच्या सुरवातीलाच बाजारातून डीएपी आणि १०:२६ ही दोन्ही खते गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.त्यासोब...
-
अमळनेर: तालुक्यातील तासखेडा येथे घराच्या सामाईक भिंतीच्या बांधकामावरून दोन कुटुंबात वाद होऊन चौघांना मारहाण केल्याची घटना ९ रोजी घडली आहे...
-
अमळनेर : अमळनेर हि संत आणि महंतांची भूमी आहे. या अमळनेरनगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप हा जंत करीत आहे. तेही केवळ राजकीय फायद्यासाठी, हे...
-
मतदारांच्या मनातील भीती दूर होण्यासाठी इंडोतिबेट व स्थानिक पोलिस पथकाने रूट मार्च काढला अमळनेर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभ...
-
अमळनेरकरांच्या भावनांशी खेळणारे चौधरी बंधूंनो, भर चौकात द्या उत्तर मंत्री अनिल पाटील यांनी गौप्यस्फोट करीत दिले आव्हान *अमळनेर* (प्रतिनिधी) ...
-
साक्री श्रमिक,शेतकरी, कष्टकऱ्यांचे लढावू नेते, शेतमजूर,कामगार व आदिवासी जनतेचे पाठीराखे,लाल निशाण पक्षाचे राज्य अध्यक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा