Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २६ नोव्हेंबर, २०२३

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सरकारला अल्टिमेट...! प्रश्न न सुटल्यास दि.७ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार...!



महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना...! अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सरकारला अल्टिमेट...!
दि.१ डिसेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत फक्त आहार वाटप करणार
प्रश्न न सुटल्यास दि.७ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेत काम करणाऱ्या सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी आपल्या नमूद प्रलंबित मागण्यासाठी दि.७ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार केला आहे. तत्पूर्वी दि.१ डिसेंबर ते ६ डिसेंरपर्यंत फक्त आहार वाटपाशिवाय अंगणवाडी केंद्राचे कोणतेही काम करणार नाहीत.
मागण्या
१)अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात १८,००० ते २५,००० रुपये दरमहा मानधन वाढ करण्यात यावी.
२)अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा.
३)अंगणवाडी केंद्राचे काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना नवीन आणि अद्यावत मोबाईल तातडीने पुरविण्यात यावेत.
४) मिनी अंगणवाडी केंद्रांचे मध्यवर्ती सरकारच्या आदेशनुसार नियमित अंगणवाडी केंद्रात तत्काळ रूपांतर करावे.
५)सेवासमाप्ती नंतर दरमहा पेन्शन लागू करण्याचा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात यावा.
६)सेविकांच्या रिक्त पदांवर १० वी पास मदतनिसांना सेविका म्हणुन थेट नियुक्ती देण्यात यावी.
७) सेविका म्हणून थेट नियुक्ती दिलेल्या मदतनीसांची मदतनीस म्हणून केलेली सेवा सलग धरण्यात यावी.
८) मुख्यसेविकांची रिक्त पदे भरतांना सेविकांना शिक्षणाची आणि वयाची अट शिथिल करावी.
९) नागरी भागातील अंगणवाडी केंद्रांना सुधारीत घरभाडे लागू करण्यात यावे.
यासह अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या आदी मागण्या प्रलंबित आहेत. सदर मागण्या सोडविण्यासाठी गेली अनेक वर्षे अंगणवाडी कर्मचारी आंदोलन करीत आहेत. त्याअनुषंगाने शासनाबरोबर अनेकदा बैठका झाल्या आहेत परंतु शासनाने सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका मागण्यांकडे सतत दुर्लक्ष केले आहे.
म्हणून राज्यातील अंगणवाडी कर्मचारी शासनावर प्रचंड नाराज आहेत.नाराजी व्यक्त करण्यासाठी आणि आपल्या प्रलंबित मागण्या सोडविण्याचा आग्रह धरण्यासाठी राज्यभरातील सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी *राज्य विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे दि.७ डिसेंबर २०२३ पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार केला आहे.
त्यानुसार बेमुदत संप सुरू झाल्यावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अंगणवाडी केंद्र बंद करून केंद्राचे कोणतेही काम करू नये तसेच पोषण ट्रॅकरमध्ये कोणतीही माहिती भरू नये. कामकाजाची कोणतीही माहिती वरिष्ठांना सादर करू नये आणि संप काळात कोणाच्याही दबावाला बळी न पडता संप यशस्वी करावा असे आवाहन श्रीमती मायाताई परमेश्वर, युवराज पी.बैसाने,रामकृष्ण बी.पाटील यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध