Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या डी.बी.पथकाची उत्कृष्ट कामगिरी...! दुकानातून नळ ची चोरी करणाऱ्या संशयितांना मुद्देमालासह केले जेरबंद...
शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या डी.बी.पथकाची उत्कृष्ट कामगिरी...! दुकानातून नळ ची चोरी करणाऱ्या संशयितांना मुद्देमालासह केले जेरबंद...
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर शहरातील रिक्रीएशन गार्डनजवळ हार्डवेअरच्या दुकानात पत्रा उचकटून 60 हजार रुपये किंमतीचे महागडे नळ चोरुन नेणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शिरपूर न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
तालुक्यातील ताजपुरी येथील रहिवासी प्रदीप किशोर शिरसाठ यांच्या मालकीचे रिक्रीएशन गार्डनजवळ बजरंग हार्डवेअर दुकान आहे.14 नोव्हेंबरची सायंकाळ ते 15 नोव्हेंबरच्या सकाळी आठदरम्यान संशयितांनी पत्रा उचकटून दुकानात ठेवलेल व्हिक्टोरिया कंपनीचे 150 नळ चोरुन नेले होते. शिरसाठ यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान गुन्ह्याचा तपास करतांना शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अन्साराम आगरकर यांना शहरातील पाच कंदीलकडून खंडेराव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन तरूण पिशव्यांमध्ये नळ घेऊन फिरत असून विक्रीच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दोघांना शिताफीने अटक केली. सूर्यकांत तथा सोनू चंद्रकांत कलाल (वय 24, रा. रामसिंह नगर, शिरपूर) व सतीश गोविंद महाजन (वय 38, रा. वरवाडे, शिरपूर) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून
चोरीचे 150 नळ जप्त करण्यात आले. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली.पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली
निरीक्षक ए.एस.आगरकर, उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, शोध पथकाचे हवालदार ललित पाटील, पोलिस नाईक रवींद्र आखडमल,हवालदार विनोद आखडमल, गोविंद कोळी,योगेश दाभाडे, प्रशांत पवार, मनोज दाभाडे,
भटू साळुंखे, सचिन वाघ, मनोज महाजन,आरिफ तडवी, विजय पाटील यांनी ही कारवाई केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील एकाच कुटुंबातील काका ,पुतण्या चुलत भाऊ, बहीण असे चार जण राज्य सेवा स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय...
-
अमळनेर : तालुक्यातील ग्रामीण भागात एका रुग्णाला चिकुन गुनिया झाल्याचे उघडकीस आले असून नागरीकांनी आता डासांपासून सावध राहण्याची गरज आहे....
-
खरा भूमिपुत्र कोण 2009 ला अनिल दादा विधानसभेला पराभूत झाले, परंतु पराभव विसरून अनिल दादा परत सक्रिय झाले. 2014 ला विधानसभेला परत एकदा पराभव ...
-
भूमिपुत्र व विकास पुरुष म्हणून संपुर्ण शहरात अनिल दादांनाच पसंती- गोपी कासार व नरेंद्र चौधरी अमळनेर- शहरातील सर्वच प्रभागात महायुतीचे उमेदवा...
-
साक्री दि.१५ : रब्बी हंगामाच्या सुरवातीलाच बाजारातून डीएपी आणि १०:२६ ही दोन्ही खते गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.त्यासोब...
-
अमळनेर: तालुक्यातील तासखेडा येथे घराच्या सामाईक भिंतीच्या बांधकामावरून दोन कुटुंबात वाद होऊन चौघांना मारहाण केल्याची घटना ९ रोजी घडली आहे...
-
अमळनेर : अमळनेर हि संत आणि महंतांची भूमी आहे. या अमळनेरनगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप हा जंत करीत आहे. तेही केवळ राजकीय फायद्यासाठी, हे...
-
मतदारांच्या मनातील भीती दूर होण्यासाठी इंडोतिबेट व स्थानिक पोलिस पथकाने रूट मार्च काढला अमळनेर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभ...
-
अमळनेरकरांच्या भावनांशी खेळणारे चौधरी बंधूंनो, भर चौकात द्या उत्तर मंत्री अनिल पाटील यांनी गौप्यस्फोट करीत दिले आव्हान *अमळनेर* (प्रतिनिधी) ...
-
साक्री श्रमिक,शेतकरी, कष्टकऱ्यांचे लढावू नेते, शेतमजूर,कामगार व आदिवासी जनतेचे पाठीराखे,लाल निशाण पक्षाचे राज्य अध्यक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा