Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
रविवार, १८ सप्टेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अनधिकृत टू व्हीलर शोरुम धारकांकडून ग्राहकांची तुबाडणूक...! जीएसटी विभाग व परिवहन विभागाचे आधिकारी यांची अनाधिकृत शोरुम धारकांशी मिलीभगत...!
धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अनधिकृत टू व्हीलर शोरुम धारकांकडून ग्राहकांची तुबाडणूक...! जीएसटी विभाग व परिवहन विभागाचे आधिकारी यांची अनाधिकृत शोरुम धारकांशी मिलीभगत...!
तरुण गर्जना वृत्तसेवा शिरपूर
शिरपूर :मागील आठवड्यात आमच्या तरुण गर्जना वृत्तपत्रातून अनाधिकृत टू व्हीलर शोरूम व विक्रेते याबाबत वृत्त प्रकाशित केलेले होते.त्यामुळे जिल्ह्यातील अनाधिकृत टू व्हीलर शोरूम धारक विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.अधिकृतपणे परवानाधारक असलेल्या टू व्हीलर विक्रेत्यांच्या शोरूम मध्ये च टू व्हीलर वाहने ठेवण्याचा अधिकार आहे.
असे असताना धुळे व नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अनाधिकृतपणे सब डीलरच्या नावाखाली मोठमोठे शोरूम सुरू करण्यात आले असून त्यात वाहने ठेवून त्यांची खरेदी विक्री केली जाते. जिल्ह्यातील सोनगीर शिरपूर दोंडाईचा , साक्री,नेर होळनांथे,नरडाना इत्यादी ठिकाणी मोठमोठे शोरूम आहेत.
या शोरूम मध्ये जवळपास ३० ते ४० लाखाची वाहने ठेवलेले असतात शासनाच्या जीएसटी कर आकारणीनुसार दहा लाखापेक्षा जास्त उलाढाल करणाऱ्या व्यावसायिकांनी जीएसटी प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.
मात्र असे असताना देखील आमच्या प्रतिनिधीने प्राप्त केलेल्या माहितीनुसार या अनाधिकृत शोरूम धारकांकडे जीएसटी नंबरच नाही.म्हणजेच यांच्या शोरूम मध्ये उभे असलेल्या ३० ते ४० लाखाच्या वाहने आज दोन ते तीन वर्षे गाड्या नेमक्या कोणाच्या नावावर खरेदी - विक्री केली जातात ? ज्या अधिकृत विक्रेत्याच्या नावाने खरेदी विक्री केली जाते त्या शोरूम धारक विक्रेत्याने मूळ परवानाधारक शोरूम पासून दुसऱ्या ठिकाणी व दुसऱ्या गावावर विक्री करण्याची परवानगी मिळवली आहे काय ? व असा अधिकार अधिकृत परवानाधारक शोरूम धारकाला आहे का ? या सर्व बाबींची दखल परिवहन विभागाचे अधिकारी यांनी कोणत्याही लालचेस बळी न पडता कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
मात्र हे अधिकारी नेमके कधी व केंव्हा याकडे लक्ष देतील.याकडे अनाधिकृत टू व्हीलर शोरूम विक्रेते असलेल्या परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिलेले आहे. बऱ्याचश्या अनाधिकृत शोरुम मधुन विक्री झालेली झालेली वाहने आग दोन ते तीन वर्ष झालेल्या असून देखील त्यांची अधिकृत रजिस्ट्रेशन करून नंबर दिलेला नाही. व अशी वाहने रस्त्यावर चालवितांना अनाधिकृत शोरुम धारकांच्या निष्काळजीपणामुळे दंडाचा भरणा संबंधीत वाहन धारकांना करावा लागतो. तसेच अधिकृत रजिस्ट्रेशन झालेले नसल्याने त्या वाहन धारकांस वाहनाचा व चालकाचा विमा काढता येत नाही म्हणजेच त्या बिचान्यास आपला जीव धोक्यात घेवून वाहन चालवावे लागत आहे.म्हणून अश्या अनाधिकृत शोरुम वर कठोर कारवाई होणेबाबत अश्या ग्राहकांकडून देखील मागणी होत आहे.
तसेच जीएसटी कर आकारणी विभागाने देखील अशा अनाधिकृत शोरूम वाहनांची खरेदी विक्रीची रिसीट त्याच शोरूम च्या नावाने आहे काय ? याची पाहणी करून जीएसटी आकारणी बाबत दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य ग्राहकांकडून होत आहे.
प्रत्येक लहान मोठ्या वस्तूवर जीएसटी आकारणी होऊन सर्वसामान्य जनता खरेदी विक्रीतून त्याचा भरणा शासनास करत असते. मग हे अशा बड्या शोरूम धारकांकडून कराची आकारणी वसूल का केली जात नाही ? यासाठी योग्य पद्धतीने आपला कसून तपासणी करून त्यांवर कारवाई करण्यात यावी असे ग्राहकांचे म्हणणे आहे.याचाच अर्थ अनाधिकृत शोरुम धारकांकडून ग्राहकांची होत असलेली लुबाडणूक परिवहन अधिकारी डोळझाक करीत आहे, तर जी.एस.टी.कर विभागाचे अधिकारी देखील याकडे दुर्लक्ष करत आहे. म्हणून अनाधिकृत शोरुम धारक परिवहन विभाग व जी.एस.टी. कर विभाग अधिकारी यांची काही मिलीभगत तर नाही ना ?
असा प्रश्न वाहन खरेदी ग्राहकांमध्ये झाला आहे.
( वाचा सविस्तर पुढील अंकात )
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरकरांच्या भावनांशी खेळणारे चौधरी बंधूंनो, भर चौकात द्या उत्तर मंत्री अनिल पाटील यांनी गौप्यस्फोट करीत दिले आव्हान *अमळनेर* (प्रतिनिधी) ...
-
शिरीष चौधरींच्या प्रचारात सुज्ञ व जेष्ठ नागरिक दाखवा आणि लाख रुपये मिळवा- विनोद लांबोळे अमळनेर- माजी आमदार शिरीष चौधरी यांचा या निवडणुकीत ना...
-
साक्री श्रमिक,शेतकरी, कष्टकऱ्यांचे लढावू नेते, शेतमजूर,कामगार व आदिवासी जनतेचे पाठीराखे,लाल निशाण पक्षाचे राज्य अध्यक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट...
-
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील एकाच कुटुंबातील काका ,पुतण्या चुलत भाऊ, बहीण असे चार जण राज्य सेवा स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय...
-
अमळनेर : तालुक्यातील ग्रामीण भागात एका रुग्णाला चिकुन गुनिया झाल्याचे उघडकीस आले असून नागरीकांनी आता डासांपासून सावध राहण्याची गरज आहे....
-
खरा भूमिपुत्र कोण 2009 ला अनिल दादा विधानसभेला पराभूत झाले, परंतु पराभव विसरून अनिल दादा परत सक्रिय झाले. 2014 ला विधानसभेला परत एकदा पराभव ...
-
भूमिपुत्र व विकास पुरुष म्हणून संपुर्ण शहरात अनिल दादांनाच पसंती- गोपी कासार व नरेंद्र चौधरी अमळनेर- शहरातील सर्वच प्रभागात महायुतीचे उमेदवा...
-
पारोळा येथील सभेत डॉ. शिंदे यांना विजयी करण्याचे केले आवाहन, अमळनेर:- काल ११ रोजी पारोळा येथे महाविकास आघाडीच्या सतीश पाटील व डॉ. अनिल शिंदे...
-
अमळनेर : अमळनेर हि संत आणि महंतांची भूमी आहे. या अमळनेरनगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप हा जंत करीत आहे. तेही केवळ राजकीय फायद्यासाठी, हे...
-
अमळनेर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांचा शहरी भागात प्रचार दौरा सुरू असून त्यांना प्रचारा दरम्यान भरघोस प्रतिसाद मिळत आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा