Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १२ सप्टेंबर, २०२२

साक्री तालुक्यातील दहीवेल परिसरात खरडबारी गावात वादळी वाऱ्यासह अनेक घराचे नुकसांन होऊन काही महिला व बालके जखमी झाले आहेत यावेळी आम आदमी पार्टीचा पदअधिकारी भेट घेऊन सांत्वन केले व सरकार दरबारी पाठपुरावा करून मदत करू असे आश्वासन दिले



साक्री तालुक्यातील दहीवेल परिसरातील खरडबारी गावात काल मध्यरात्री अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने व पावसाने गावातील 50 ते 60 घराची पडझड होऊन त्यांचा संसार उपयोगी वस्तूचे देखील नुकसान झालेले आहे व काही लहान मूले व स्त्रिया हे जखमी झाले आहेत सदर जखमींना जिल्हा रुग्णालयात धुळे येथे हलविण्यात आले आहे तरी जखमींची परिस्थिती चांगली असून कुठलीही जीवित हानी झाली नसून प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे तालुक्याचे आमदार व खासदार यांनी ही या गावात भेट दिली व कुठलीही मदत पुनर्वसन कमी पडू दिले जाणार नाही पंतप्रधान घरकूल योजने अंतर्गत नुकसान ग्रस्त लाभार्थीना या योजनेत समाविष्ट करू नवीन घरे देऊ असे आश्वासनही यावेळी जिल्याचा लोकप्रतिनिधीनि दिले यावेळी आम आदमी पार्टीचे उ.महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बिपीन पाटील उप जिल्हा अध्यक्ष संजय बहिरम कार्याध्यक्ष कैलास भदाणे,साक्री तालुका अध्यक्ष चंद्रशेखर अहिरराव,सचिव बाळू साळुंके, तसेच पक्षाचे पदअधिकारी उपस्थित होते तसेच खराडबारी ग्रामपंचायत चे सरपंच सौ.ज्यातीबाई गवळी व सदस्य सह ग्रामसेवक व्ही.पी.भदाणे व तलाठी एम.एस.कोकणी पो.पाटील सौ.वानुबाई देशमुख आदी उपस्थित होते
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध