Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १४ सप्टेंबर, २०२२

शिरपूर धुळे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल..! शिरपूर बस डेपोची खूप दयनीय अवस्था..!



शिरपूर प्रतिनिधी:शिरपूर धुळे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल.शिरपूर बस डेपोची खूप दयनीय अवस्था आहे.गाड्या सर्व कामावर आलेल्या आहेत रस्त्यात कुठेही बंद पडतात,तसेच शिरपूर वरून धुळे साठी गाड्यांचे नियोजन नाही सकाळी विनावाहक AC गाडी लावली जाते तिचे भाडे ११५ रू आहे तसेच सादी गाडीचे दर ८० रू आहे,आणि AC गाडी गेल्या शिवाय दुसरी गाडी लावली जात नाही यामुळे ऑफिस, शाळा, कॉलेजला दररोज जाणाऱ्यासाठी सकाळी ८ ते ९ मध्ये फक्त दोन गाड्या आहेत व धुळे वरून सायंकाळी पण तीच गत आहेे.

विनावाहक सादा दरात कोणतीच गाडी नाही.आधी संप होता तेव्हा गाड्या बंद नंतर पंढरपूर साठी गाड्या गेल्या तेव्हा गाड्या कमी केल्या,आता गणपतीमुळे मुंबई गेल्या गाड्या कमी,पुढे सांगतील नवरात्रीमुळे गडावर असे सांगण्यात येईल परंतु प्रश्न असा आहे की सर्व गाड्या शिरपूर धुळे जाणाऱ्या तिकडे पाठवता का प्रवाशांचे खूप हाल होत आहेत त्याच प्रमाणे शिरपूर वरून धुळे कडे जाणाऱ्या गाड्या खर्दे उंटावद मार्गे टोल वाचविणे साठी काढल्या जातात ST विभागाचे फायदा साठी लोकांचा १५ ते २० मिनिट वेळ वाया घालतात तसेच खड्यांच्या रस्त्यावर गाडी चालवून त्याच विभागाचा तोटा होत नाही का?सरळ शिरपूर फाटा कडून गाड्या का काढल्या जात नाहीत असा प्रश्न नागरिकांना उपस्थित होतो.

धुळे कडून शिरपूर कडे येणाऱ्या गाड्या डिझेल भरण्यासाठी नगाव येथे खाजगी पेट्रोल पंपावर थांबतात तेथे शिरपूर शिंदखेडा दोंडाइचा,नंदुरबार, इ मार्गावरील गाड्या एकच पंपावर उभ्या असतात त्यामुळे तेथे गाड्यांची लाईन लावते व तेथे १० ते १५ मिनट वेळ वाया घालतात.शिरपूर धुळे अंतर ६० की मी असून एक तासाचा रस्ता दीड ते दोन तास लागतात.असे विविध अडचणी प्रवाशांना आहेत याकडे शिरपूर डेपो व प्रशासनाचे चे दुर्लक्ष होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध