Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२

पिंपळनेर फटाका विक्रेतांना सुरक्षित ठिकाणी स्टॉल लावण्याचे आदेश द्यावेत अखिल भारतीय मानवाधिकार संघ पिंपळनेर ची मागणी अप्पर तहसीलदार यांचाकडे मागणी *काही दुर्घटना घडल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल--



स्फोटक पदार्थ कायदा 2008 व 1908 नुसार परवानाधारक फटाका विक्रेत्यांना सुरक्षित ठिकाणी स्टॉल लावण्याचे आदेश देणे बाबत पिंपळनेर ग्रामपंचायतीचे सरपंच, अपर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले. पिंपळनेर परिसरातील परवानाधारक फटाका विक्रेते आपला स्टॉल बाजारात वर्दळीच्या ठिकाणी लावतात, त्यामुळे दुर्दैवाने काही दुर्घटना घडल्यास वित्तहानी व जीवितहानी होऊ शकते. त्याबाबत सुरक्षिततेच्या दृष्टीने फटाका विक्रेतांना स्फोटक पदार्थ कायदा 2008 व 1908 च्या नियम, अटी व शर्तींच्या अधीन राहून स्टाल धारकांसाठी ग्रामपंचायतने प्रस्तावित केलेल्या, ना हरकत दाखल्यात दिलेल्या मोकळ्या जागी एकाच ठिकाणी स्टॉल लावण्याचे आदेश द्यावेत व आपण दिलेल्या आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते किंवा नाही ते देखील पाहावे. तसेच परवानाधारक फटाका स्टॉल धारकांना अग्निशमन यंत्र सोबत ठेवण्याची सक्ती करावी व विना परवानाधारक फटाका स्टॉल धारकांवर कायदेशीर कारवाई करावी .याबाबत लेखी निवेदन देण्यात आले. स्फोटक पदार्थ कायद्यानुसार फटाका विक्रेतांनी सुरक्षित ठिकाणी स्टॉल न लावल्यास व दुर्दैवाने काही दुर्घटना घडवून वित्तहानी व जिवीतहानी झाल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. असा इशारा अखिल भारतीय मानवाधिकार संघाकडून पिंपळनेर ग्रामपंचायतचे सरपंच व अपर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार यांना प्रत्यक्ष निवेदनाद्वारे देण्यात आले. याप्रसंगी अखिल भारतीय मानवाधिकार संघाचे अध्यक्ष प्रवीण थोरात, दिनेश भालेराव, रावसाहेब शिंदे व भरत बागुल हे उपस्थित होते .तसेच पिंपळनेर पोलीस स्टेशन ,जिल्हाधिकारी धुळे, विभागीय आयुक्त नाशिक, प्रांत धुळे, यांना सदर निवेदन रजिस्टर टपालाने पाठवण्यात आले आहे.


तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध