Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२

धुळे येथील आम आदमी पार्टी (शेतकरी) मेळावा शेतकऱ्यांच्या प्रचंड जन समुदायत संपन्न झाला !



आम आदमी शेतकरी संघटनेच्या वतीने दी.13/09/2022 रोजी धुळे येथे केशरानंद मंगल कर्यालयात पहिला शेतकरी मेळावा शेतकऱ्यांच्या प्रचंड प्रतिसादात संपन्न झाला.

यावेळी आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी महादेव नाईक, आपचे राज्य संयोजक रंगा राचूरे व आपचे राज्य सचिव धनंजय शिंदे , प्रसिद्ध आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते . शेतकरी मेळाव्याचे निमंत्रक व आपचे राज्य संघटक विजय कुंभार आणि आम आदमी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष बिपिन पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

 भास्कर  पेरे पाटील यांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर त्याला पैशाची मदत केली जाते त्यापेक्षा तो जगावा म्हणून त्याला आर्थिक मदत द्या, अशी मागणी केली ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस प्रवास राज्य शासनाच्या योजनेवर टीका करताना त्यांनी  ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास करण्यापेक्षा विद्यार्थ्यांना बस प्रवास मोफत करा. असे वक्तव्य केले.      

 सुदर्शन जगदाळे यांनी शेतकरी व माहिती तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले.
शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष बिपिन पाटील यांनी आपल्या मनोगतात शेतकऱ्याच्या  हक्कासाठी ,न्याय्य मागण्यासाठी आम आदमी शेतकरी संघटना कार्य करणार असल्याचे सांगितले.आम आदमी शेतकरी संघटनेचे राज्य सल्लागार श्रीकांत आचार्य यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून शेतकऱ्यावर अन्याय कसा होतो याचे विश्लेषण केले.
आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी महादेव नाईक यांनी सांगितले की  खोटे जुमाले करणाऱ्या पंतप्रधानांनी जनतेला सपशेल फसवल आहे.महागाई आणि बेरोजगारीने सामान्य जनता हैराण आहे. व देशासमोर एकमेव पर्याय म्हणजे आम आदमी पक्ष व केजरीवाल हेच आहे. यापुढील महाराष्ट्रातील सर्व निवडणुका आप लढवणार आहे.  काँग्रेस भाजप शिवसेना  राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व पक्षांना संधी मिळाली पण त्यांनी देशाचं वाटोळं केलं मात्र  यावेळी केंद्रात आणि राज्यात आपला संधी  द्या असे त्यांनी आवाहन केले.

आम आदमी शेतकरी संघटनेचे वाशिम जिल्हा अध्यक्ष मनीष मोडक यांनी शेतमालाचे ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग या विषयावर मार्गदर्शन केले.

नंदुरबारच्या  माजी डेप्युटी कमिशनर अरविंद वळवी, नवापूर चे माजी जिल्हा परिषद सदस्य सोनू गावित, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष अंकुश शिंदे ,तसेच दीपक पाटील , गोविंद देसले , कांतीलाल गावित आदी कार्यकत्यांनी  यावेळी आम आदमी पक्षात प्रवेश केला. त्यांचे   राज्य निवडणूक प्रभारी महादेव नाईक व राज्य संघटक विजय कुंभार यांनी आप मध्ये   सर्वांचे स्वागत केले.आम आदमी पक्षाचे महाराष्ट्रराज्य अध्यक्ष रंगा राचुरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आजपर्यंत शेतकऱ्याची घोर फसवणूक झाली आहे व जोपर्यंत शेतकऱ्यांची सत्ता आल्या शिवाय शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही.
 ईश्वर अशोक पाटील यांनी आभार प्रदर्शन केले व हा भव्य दिव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला.

या मेळाव्याच्या यशस्वितेसाठी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ईश्वर अशोक पाटील ,जिल्हा कार्याध्यक्ष कैलास भदाणे,सचिव योगेश पवार ,मीडिया प्रभारी सुयोग पाटील ,शिंदखेडा ता. अध्यक्ष अधिकार पाटील, साक्री तालुका अध्यक्ष चंद्रशेखर अहिरराव उप अध्यक्ष प्रवीण काकूंस्ते,मोहन बोरसे,संदीप पवार,मोहन मनोरे,लीलाधर पाटील व तसेच पूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालणं डॉ. विपीन पवार यांनी केले सोबतच आम आदमी शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  परिश्रम घेतले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध