Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १३ सप्टेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
आगामी निवडणक डोळ्यासमोर ठेवून कामाला लागावे - प्रदेशाध्यक्ष बावनकुळे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा बावनकुळे यांच्या उपस्थितीत संपन्न...!
आगामी निवडणक डोळ्यासमोर ठेवून कामाला लागावे - प्रदेशाध्यक्ष बावनकुळे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा बावनकुळे यांच्या उपस्थितीत संपन्न...!
धुळे प्रतिनिधी :धुळे गटबाजीमुळे काँग्रेस पक्ष संपला. ते लक्षात घेऊन भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गटबाजीला थारा देऊ नये. महापालिकेच्या गेल्या निवडणुकीवेळी पक्षाने ५० प्लसचा नारा दिला होता.आगामी निवडणुकीसाठी ६५ प्लसचे टार्गेट डोळ्यासमोर ठेऊन कामाला लागावे,असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.
भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा श्री. बावनकुळे यांच्या उपस्थितीत झाला.यावेळी महापौर प्रदीप कर्पे, खासदार डॉ.सुभाष भामरे, आमदार अमरिशभाई पटेल,आमदार जयकुमार रावल,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे,जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे,आमदार काशिराम पावरा उपस्थित होते.
श्री.बावनकुळे म्हणाले,महापालिकेत आगामी निवडणुकीतून ६५ जागा निवडून आणण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी करावा.बूथ प्रमुखांशी नेते समन्वय राखतील.धुळ्यातील भाजपचे कार्यकर्ते क्रियाशील आहेत. कार्यकर्ता कसा असावा,हे त्यांनी राज्याला दाखवून दिले आहे.कोरोनाच्या संकटकाळात इतर पक्षांपेक्षा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेले कार्य प्रशंसनीय आहे.भाजपच्या अनेक नेत्यांनी धुळे जिल्ह्यात अत्यंत वाईट स्थितीत काम केले आहे.त्यांच्यामुळेच भाजपला आज चांगले दिवस आहेत.
आता संपलेल्या काँग्रेसमधील नेते नको,तर कार्यकर्ते भाजपमध्ये आणावे.त्यासाठी भाजपच्या येथील प्रत्येक कार्यकर्त्याने किमान २५ जणांचा प्रवेश भाजपत करून घेतला पाहिजे.‘एक कार्यकर्ता,वीस घर’,अशी भाजपची योजना आहे.निवडणुकांचा काळ लक्षात घेता एका कार्यकर्त्याने वीस घरे सांभाळायची आहेत. त्यांना शासकीय योजनांबाबत अवगत करायचे आहे.त्यांच्या सुख दुःखात धावून जायचे आहे.
आगामी काळ हा निवडणुकांचा आहे.जिल्हा परिषद,नगरपालिका, ग्रामपंचायत आणि नंतर वर्षभराने लोकसभा, विधानसभा निवडणुका आहेत.कार्यकर्त्यांकडे केवळ दोनशे दिवस शिल्लक आहेत.ते लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.पुढील काळात काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांना कार्यकर्तेच मिळू नये, अशी स्थिती भाजपला निर्माण करायची आहे.
गरीब कल्याण योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्यातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे पत्र लिहून घ्यायचे आहेत.अशी लाखो पत्रे मला हवी आहेत.मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पूर्वीच्या महाआघाडी सरकारने अडीच वर्षे वेळ घालवला.आरक्षण घालविण्याचे पाप त्यांनी केले,असा आरोप श्री. बावनकुळे यांनी केला.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते,ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील,शहर-जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल,माजी महापौर चंद्रकांत सोनार,कामराज निकम,नगसेवक हिरामण गवळी,डॉ.माधुरी बाफना,
शिरपूरचे माजी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, प्रकाश चव्हाण, यशवंत येवलेकर,सुरेश पाटील,जिल्हा परिषद सभापती धरती देवरे, सदस्य राम भदाणे,प्रवक्ते संजय शर्मा,अरुण धोबी, बबन थोरात,महिला आघाडीच्या शहराध्यक्षा मायादेवी परदेशी,माजी महापौर जयश्री अहिरराव आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील एकाच कुटुंबातील काका ,पुतण्या चुलत भाऊ, बहीण असे चार जण राज्य सेवा स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय...
-
अमळनेर : तालुक्यातील ग्रामीण भागात एका रुग्णाला चिकुन गुनिया झाल्याचे उघडकीस आले असून नागरीकांनी आता डासांपासून सावध राहण्याची गरज आहे....
-
खरा भूमिपुत्र कोण 2009 ला अनिल दादा विधानसभेला पराभूत झाले, परंतु पराभव विसरून अनिल दादा परत सक्रिय झाले. 2014 ला विधानसभेला परत एकदा पराभव ...
-
भूमिपुत्र व विकास पुरुष म्हणून संपुर्ण शहरात अनिल दादांनाच पसंती- गोपी कासार व नरेंद्र चौधरी अमळनेर- शहरातील सर्वच प्रभागात महायुतीचे उमेदवा...
-
साक्री दि.१५ : रब्बी हंगामाच्या सुरवातीलाच बाजारातून डीएपी आणि १०:२६ ही दोन्ही खते गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.त्यासोब...
-
अमळनेर: तालुक्यातील तासखेडा येथे घराच्या सामाईक भिंतीच्या बांधकामावरून दोन कुटुंबात वाद होऊन चौघांना मारहाण केल्याची घटना ९ रोजी घडली आहे...
-
अमळनेर : अमळनेर हि संत आणि महंतांची भूमी आहे. या अमळनेरनगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप हा जंत करीत आहे. तेही केवळ राजकीय फायद्यासाठी, हे...
-
मतदारांच्या मनातील भीती दूर होण्यासाठी इंडोतिबेट व स्थानिक पोलिस पथकाने रूट मार्च काढला अमळनेर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभ...
-
अमळनेरकरांच्या भावनांशी खेळणारे चौधरी बंधूंनो, भर चौकात द्या उत्तर मंत्री अनिल पाटील यांनी गौप्यस्फोट करीत दिले आव्हान *अमळनेर* (प्रतिनिधी) ...
-
साक्री श्रमिक,शेतकरी, कष्टकऱ्यांचे लढावू नेते, शेतमजूर,कामगार व आदिवासी जनतेचे पाठीराखे,लाल निशाण पक्षाचे राज्य अध्यक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा