Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना..!

     
  
दि.२० सप्टेंबर २०२२ रोजी मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना जळगावहून मुक्ताईनगरकडे जात असतांना साकेगाव ता.भुसावळ येथे धावती भेट दिली.
     

सदर भेटी दरम्यान संघटनेच्या भुसावळ तालुका अध्यक्षा श्रीमती चेतना गवळी यांनी संघटनेच्या अध्यक्षा मायाताई परमेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री महोदयांची भेट घेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भरीव स्वरूपाची मानधन वाढ करा, सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन लागू करा,पोषण ट्रॅकरची भाषा मराठी करावी,अंगणवाडी केंद्राच्या कामासाठी नवीन अद्यावत मोबाईल द्यावेत, थकीत एकरकमी सेवा समाप्ती लाभ तात्काळ मिळावा यासह अन्य प्रलंबित मागण्यांबाबत निवेदन देत चर्चा केली.
      
सदर चर्चेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या तातडीने सोडविण्यासाठी शासन सकारात्मक विचार करीत असल्याचे मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासन दिले असल्याचे संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी कळविले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध