Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२

अपना काम बनता तो.......जनता ,अनाधिकृत टू - व्हिलर विक्रेत्यांचा गोरख धंदा जळगाव , धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील परिवहन विभागाचे अधिकारी सुस्त आणि मस्त !



तरुण गर्जना वृत्तसेवा शिरपूर प्रतिनिधीं शिरपूर : आमच्या तरुण गर्जना वृत्तपत्रातून अनाधिकृत टू व्हीलर शोरूम व विक्रेते याबाबत वृत्त प्रकाशित केलेले आहे.त्यामुळे धुळेनंदुरबार जिल्हया बरोबरच जळगाव जिल्ह्यातील देखील अनाधिकृत टू व्हीलर शोरूम धारक विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.जळगाव जिल्ह्यात साधारण दोन महिन्यापूर्वी एका संघटनेने मोठ्या प्रमाणावर आंदोलन केल्याने जळगाव जिल्ह्यातील परिवहन अधिकाऱ्यांनी काही अनाधिकृत वाहन विक्रेत्यांवर देखाव्यापूर्ती कारवाई केल्याचे दिसून येत आहे.

कारण ज्या शोरूम मध्ये रोज वीस ते पंचविस वाहने विक्रीसाठी उभे केलेले असतात अश्या शोरूम मध्ये कारवाई करतांना केवळ दोन ते चार वाहने कशीकाय आढळलीत ? जप्त केलेल्या वाहनांचे काय करण्यात आले ? या अनाधिकृत विक्रेत्यांनी आजपावेतो कीती वाहने विक्री केलीत ? हे शोरुम कधीपासून सुरू होते ? किती ग्राहकांची फसवणूक व लूट केली ? शासनाचा किती कर बुडविला ? व जिल्ह्यात अजून असे अनाधिकृत किती शोरुम विक्रेते आहेत ? या सर्व बाबींची कसून चौकशी होवून त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
 
मात्र काहीका असेना जळगाव जिल्ह्यातील परिवहन विभागातील अधिकाऱ्यांना कुठेतरी आपल्या कर्तव्याचे भान येवून कारवाई करण्यास सुरवात केलेली आहे.व जिल्ह्यातील ग्राहकांना असे वाटते की,आता जिल्ह्यातील सर्वच अनाधिकृत शोरुम विक्रेत्यांवर जळगाव परिवहन अधिकारी कारवाई करतील अशी मोठी अपेक्षा ग्राहकांनी व्यक्त केली आहे. 

मात्र धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील परिवहन विभागाचे अधिकारी अत्यंत सुस्त आणि मस्त झोपलेले आहेत . केवळ आपला खिसा गरम होतो म्हणून कोणतीही कारवाई नको.यालाच म्हणतात अपना काम बनता तो.....जनता अश्या प्रकारे धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील परिवहन विभागाचे अधिकारी बिनधास्तपणे काम करीत आहेत.केवळ चेकपोस्टवर ड्युटी कशी लागेल यासाठी हे अधिकारी एकमेकांवर रस्सीखेच करून चेकपोस्टची ड्युटी लावून घेतात.असे आम्हाला याच विभागाशी संबंधीत काम करणाऱ्या व्यक्तींनी आम्हास अवगत केले.जळगाव जिल्ह्यातील पाचोरा जामनेर ,भडगाव ,अमळनेर , चोपडा ,यावल ,रावेर ,फैजपूर , मुक्ताईनगर इत्यादी ठिकाणी अनाधिकृत शोरुम विक्रेते असून नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार , शहादा , तळोदा , नवापूर , अक्कलकुवा , धडगाव , सारंगखेडा इत्यादी अनाधिकृत विक्रेते आहेत.तर धुळे जिल्ह्यातील सोनगीर शिरपूर , दोंडाईचा , साक्री , नेर , होळनांथे , नरडाना , दहिवेल , पिंपळनेर , कुसूंबा , इत्यादी ठिकाणी मोठमोठे अनाधिकृत शोरूम विक्रेते आहेत.या विक्रेत्यांनी फेस्टीवल पॉईंट नावाने आपला गोरख धंदा सुरू केलेला आहे. 

अधिकृत शोरुम धारकांच्या कमिशनच्या मोहमायामुळे अनाधिकृतपणे अनेक प्रकारची वाहने हे विक्रेते आपल्या ताब्यात ठेवतात व अशी वाहने विना नोंदणी करता रस्त्यावर निर्धास्तपणे सोडली जातात. इतक्यावरच न थांबता डिस्काऊंच्या नावाने ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर लूट केली जाते.अश्या अनाधिकृत टू व्हिलर विक्रेत्यांकडून ग्राहकांना योग्य सर्व्हिस देखील दिली जात नाही.ग्राहकांना कधी काही समस्या उदभवल्यास मुख्य डिलरच्या नावाकडे बोट दाखवून हे बेशरमपणे आपला हात वर करतात. आणि म्हणून असे अनाधिकृत विक्रेते कधीही ग्राहकांचा पैसा घेवून पळून जावू शकतात.या अनाधिकृत शोरुमला मदत करणारे अधिकृत शोरुम धारकांवर देखील कारवाई करून यांचे परवाने रद्द करावेत अशी ग्राहक राजाची मागणी आहे. 

( वाचा सविस्तर पुढील अंकात )



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध