Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
पांझरा कांन साखर कारखान्याचे खरे मारेकरी कोण ? साक्री तालुक्याचा आमदारांनी मिळवला पांझरा कांन बंद पाडण्याचा बहुमान
पांझरा कांन साखर कारखान्याचे खरे मारेकरी कोण ? साक्री तालुक्याचा आमदारांनी मिळवला पांझरा कांन बंद पाडण्याचा बहुमान
पांझरा कान सहकारी साखर कारखाना (साक्री) या विषयावर जर भविष्यात इतिहासाची पाने चाळली गेली तर त्यात भर पडून एक नवं नाव प्रकर्षाने घ्यावे लागेल ते म्हणजे साक्री तालुक्याच्या विद्यमान आमदार मंजुळा गावित व त्यांचे पती डॉ.तुळशीराम गावित यांचे पांझरा कांनचे खरे मारेकरी कोण ? हा जर प्रश्न विचारला गेला तर तसे त्यात अनेक जणांची नावे येथील परंतु दुर्दैवाने ते या जगात नाहीत म्हणून जे आहेत त्यांच्या पैकी एक मुख्य चेहरा म्हणजे डॉ.तुळशीराम गावित यांची साक्री तालुक्याचा इतिहासात नोंद नक्कीच होईल.गेल्या सहा महिन्यापासून एक मराठा युवा उद्योजक पांझरा कान सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालू करण्यासाठी अथक शर्तीचे प्रयत्न करीत आहे.
मात्र नेहमी प्रमाणे या तालुक्याने पुन्हा एकदा सिद्ध करून दिले की हा तालुका औद्योगिकरणसाठी नेहमीच विरोधात असतो.म्हणून या तालुक्यात नवीन उद्योजक सरसावत नाहीत.असे लेबल या तालुक्याने स्वतःला लावून घेतले आहे.एक मराठा युवा उद्योजक हा पांझरा कांन साखर कारखाना चालू करतो आहे याचेच मूळ दुःख आमदारांना जास्त आहे.हे प्रकर्षाने जाणवते आहे माननीय आमदार महोदयांनी लक्षात ठेवावे की वेळ ही प्रत्येकाची येत असते.संधी प्रत्येकाला मिळत असते.आज युवा उद्योजक पवन मोरे हे जात्यात आहेत,आणि तुम्ही सुपात आहेत.परंतु येणाऱ्या विधानसभा 2024 च्या निवडणुकीत उद्योजक हे सुपात असतील आणि तुम्ही राजकारणाचा जात्यात असाल.हे लक्षात असू द्या.आज जे काही तुम्ही कारखान्यात संदर्भात मंत्रालय स्तरावर विष कालवण्याचे पाप करीत आहात या पापाची फळे साक्री तालुक्यातील जनता येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत तुम्हाला चाखायला नक्कीच मिळतील हे लक्षात ठेवा. पाझरा कान सहकारी साखर कारखाना या साक्री तालुक्याचे वैभव आहे आणि साक्री तालुक्यातील जनतेशी कारखान्याशी नाळ जुळलेली आहे.
तुम्ही कारखाना भाडेतत्त्वावर घेणाऱ्या युवा उद्योजकाला जो नाहक त्रास देत आहेत की तो बाहेरचा माणूस आहे,आपल्या तालुक्यातील येऊन आपल्याला शिकवतो,तो काय चालू करणार नाही,तो भागारवाला आहे, परंतु दुर्दैवाने तुम्ही देखील बाहेरचेच आहेत.त्यामुळे तुम्हाला देखील कारखान्यावर बोलण्याचा अधिकार मुळातच नाही.महत्त्वाचे म्हणजे साक्री तालुक्यातील 70 % जनता ही शेतीवर अवलंबून आहे त्यातच महाराष्ट्रातील भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा तालुका म्हणून साक्री तालुक्याची राज्यात ओळख आहे.म्हणूनच युवकांचे शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.
याची अनेक कारणे आहेत.कांद्याच्या भावात होणारी घसरण,वाढती महागाई, खते,औषधे,मजुरांचा प्रश्न या सर्वांवर होणारा खर्च पाहता शेती ही परवडत नसल्याने नव युवकांचे शेतीकडे पाठ फिरवली आहे. या सर्व अवघड परिस्थितीत शेतकऱ्यांना संजीवनी ठरणारे एकमेव पीक म्हणजे *ऊस* हे पिक परवडणारे आहे.परंतु तालुक्यातील साखर कारखाना प्रकल्प बंद असल्याने वेळेवर ऊस तोडीचा ही मोठा प्रश्न निर्माण होतो,आणि कालांतराने ऊस पिकावर ही गदा येत आहे.म्हणून प्रचंड नैराश्य असलेल्या साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांनी आता कारखाना विरोधी भूमिका घेणाऱ्यांना जाब विचारण्याची वेळ आली आहे. या तालुक्यातील प्रस्थापित राजकारण्यांनी आजवर स्वतःचे राजकीय व आर्थिक स्वार्थासाठी साक्री साखर कारखान्याचा निवल्ल वापर केलेला आहे.मुख्य दुःख हे आहे की साखर कारखाना सुरू झाला तर आपली राजकीय पोळी आपल्याला भासता येणार नाही. व तालुक्यावर आपला कंट्रोल राहणार नाही या भीतीपोटी या प्रकल्पाला राजकीय ताकद लावून बंद पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
50 फुके मिळालेत की काय म्हणून आमदार महोदय नवीन टेंडर काढायला सर्व अधिकाऱ्यां समोर अट्टाहास करीत आहेत.आणि डॉ.तुळशीराम गावित यांच्या अशा अपेक्षा आहेत की जर का पांझरा कान साखर कारखाना चालू करायचा असेल तर तो आम्हाला विश्वासात घेऊन का केला जात नाही याची मोठी सल त्यांच्या मनात आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पवन मोरे यांनी 12 कोटी रुपयाला कारखाना भंगार मध्ये विकला असे खोटे आणि बिनबुडाचे आरोप जिल्हाधिकारी धुळे साखर आयुक्त आणि बँक अधिकाऱ्यांसमोर व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे आमदारांनी केले आहेत.अस का केलं जातं आहे. ते नेहमीच बोलून दाखवतात की पांझरा कान चालू व्हावा अशी आमची ही माफक अपेक्षा आहे. परंतु तो आमच्या अधिपत्याखाली व्हावा अशी महत्वकांक्षा बाळगणारे डॉ.गावित यांचा पुरता भ्रमनिरास या उद्योजकाने केला आहे.मुळात कारखान्याच्या विक्रीची किंमत 17 कोटी आणि काही लाख रुपये आहे आणि प्लांट व मशिनरीच्या मूल्यांकनाचा रिपोर्ट हा 16.50 कोटी रुपये इतका आहे तर मग बारा कोटी रुपये येतील कसे आणि कोणी देईल कसे हेही आमदार महोदयांनी प्रथमतः अभ्यासले पाहिजे. अशा काही व्यवहारांची चुकीची कागदपत्रे अभ्यासून संबंधित अधिकारी व एम. एस.सी बँक यांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा बालिश आणि निरर्थक खटाटोप आमदार व त्यांचे प्रतिनिधींनी चालवला आहे.
म्हणून ही सर्व खदखद व खटाटोप डॉ.तुळशीराम गावित हे करीत आहेत.त्यांच्या भाषणातून ते नेहमीच म्हणतात की कारखाना चालू होण्यास आमचा विरोध नाही. मग मंत्रालय स्तरावर बंद करण्यासाठी हालचाली,
प्रयत्न किंवा पत्रव्यवहार का केले जातात.याची उत्तर आमदार महोदय यांनी द्यावे.खरे पहिले तर पांझरा कान साखर कारखाना चालू करण्याचे श्रेय तुळशीराम गावित यांना हवे आहे.
म्हणजे असे झाले तर आपली पुढची आमदारकी ची टर्म ला धोका पोहोचणार नाही असा त्यांचा राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून ते हे सर्व कृत्य करीत आहेत.असे निदर्शनास येत आहे.दोन दिवसांपूर्वी चे उदाहरण आहे पुणे येथे साखर आयुक्तांकडे करार रद्द करण्यासाठी गावितां कडून तगादा लावला जात आहे.पवन मोरे या उद्योजकाने जर प्लांट बारा कोटी रुपयाला भंगार मध्ये विकला आहे तर त्याचे काही पुरावे आमदार महोदयांनी अधिकाऱ्याकडे सादर करावे म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांसमोर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल आणि तालुक्यातील भोळ्या भावड्या जनतेचा मनातील काही शंका कुशंका असतील त्याही दूर होऊन जातील सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या तालुक्यातील काही प्रस्थापित राजकारण्यांना हा प्रकल्प चालू झाला तर आपली राजकीय दाळ शिजणार नाही असे वाटते म्हणून त्यांनी यासाठी सर्वपक्षीय संघर्ष समितीची देखील स्थापना केली आहे.आजवर कारखाना चालू करण्यासाठी अनेक पार्ट्या येऊन गेल्यात उद्योजकांची लिस्ट ही मोठी आहे.पाहिले द्वारकाधीश (सावंत) त्या नंतर सिस्टम इंडिया लिमिटेड (भामरे) परत उद्योजक राजेश पिंगळे (नाशिक) आणि आता स्पर्श शुगर मिल (मोरे) अजून किती अंत पाहणार आहोत आपण
या प्रकल्पाचा साक्री तालुका तील जनता जनार्दनाने यावर विचार करायला हवा.या साक्री तालुक्याचे विध्यमान आमदार मंजुळा गावित व त्यांचे पती डॉ.तुळशीराम गावित हे वेळोवेळी साखर आयुक्तांकडे धाव घेऊन निवेदने व पत्रके देत आहेत एक मराठा युवा उद्योजकाला जेरीस आणण्याच काम तुम्ही करीत आहेत.
मागील विधानसभा निवडणुकीत तुम्ही मराठा मतांवर च्या जोरावर निवडून आले आहेत.हेही लक्षात असू द्या आणि येणाऱ्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत हेच मराठा मतदार तुमच्या पराभवाची कारण ठरू शकतात तेव्हा तुम्हाला मराठा मतांची किंमत कळेल हेही आपण लक्षात ठेवावें साक्री तालुक्यात ऊस उत्पादक शेती करणारे हे मुख्यत्वे शाहू लोक आहेत आणि त्यांचा कळवळला करणाऱ्या आमदार महोदयांना माझे शेतकरी उद्योजकाच्या वतीने सांगणे आहे की यावर्षी जर साक्री तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर तुटला नाही.आणि उसाचे काही क्षेत्र शिल्लक राहिले तर ते शेतकऱ्यांनी व्यक्तिगत तोडून आमदारांच्या दारापुढे टाकावे आणि त्यांच्याकडून त्याचा मोबदला घ्यावा.तेव्हाच त्यांना ऊस उत्पादकांच्या व्यथा कळतील आणि पांझरा कांन खरे मारेकरी कोण हेही तालुक्याला कळेल
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील एकाच कुटुंबातील काका ,पुतण्या चुलत भाऊ, बहीण असे चार जण राज्य सेवा स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय...
-
अमळनेर : तालुक्यातील ग्रामीण भागात एका रुग्णाला चिकुन गुनिया झाल्याचे उघडकीस आले असून नागरीकांनी आता डासांपासून सावध राहण्याची गरज आहे....
-
खरा भूमिपुत्र कोण 2009 ला अनिल दादा विधानसभेला पराभूत झाले, परंतु पराभव विसरून अनिल दादा परत सक्रिय झाले. 2014 ला विधानसभेला परत एकदा पराभव ...
-
भूमिपुत्र व विकास पुरुष म्हणून संपुर्ण शहरात अनिल दादांनाच पसंती- गोपी कासार व नरेंद्र चौधरी अमळनेर- शहरातील सर्वच प्रभागात महायुतीचे उमेदवा...
-
साक्री दि.१५ : रब्बी हंगामाच्या सुरवातीलाच बाजारातून डीएपी आणि १०:२६ ही दोन्ही खते गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.त्यासोब...
-
अमळनेर: तालुक्यातील तासखेडा येथे घराच्या सामाईक भिंतीच्या बांधकामावरून दोन कुटुंबात वाद होऊन चौघांना मारहाण केल्याची घटना ९ रोजी घडली आहे...
-
अमळनेर : अमळनेर हि संत आणि महंतांची भूमी आहे. या अमळनेरनगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप हा जंत करीत आहे. तेही केवळ राजकीय फायद्यासाठी, हे...
-
अमळनेरकरांच्या भावनांशी खेळणारे चौधरी बंधूंनो, भर चौकात द्या उत्तर मंत्री अनिल पाटील यांनी गौप्यस्फोट करीत दिले आव्हान *अमळनेर* (प्रतिनिधी) ...
-
शिरीष चौधरींच्या प्रचारात सुज्ञ व जेष्ठ नागरिक दाखवा आणि लाख रुपये मिळवा- विनोद लांबोळे अमळनेर- माजी आमदार शिरीष चौधरी यांचा या निवडणुकीत ना...
-
साक्री श्रमिक,शेतकरी, कष्टकऱ्यांचे लढावू नेते, शेतमजूर,कामगार व आदिवासी जनतेचे पाठीराखे,लाल निशाण पक्षाचे राज्य अध्यक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा