Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
रविवार, १८ सप्टेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पाचे खरे मारेकरी कोण,दोन लाख कोटींचा प्रकल्प महाराष्ट्राने ठरविले तर गुजरात मधून परत येवू शकतो !
वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पाचे खरे मारेकरी कोण,दोन लाख कोटींचा प्रकल्प महाराष्ट्राने ठरविले तर गुजरात मधून परत येवू शकतो !
धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात सतत मागणी होत असते, की या भागात मोठा औद्योगिक प्रकल्प यावा. जेणेकरून त्या प्रकल्पाला लागुन विविध लहान लहान प्रकल्प येतील व परिसराचा विकास होईल. धुळे शहरात नव्वदच्या दशकात टेलीकॉम फॅक्टरी मंजुर झाली होती. सर्व तयारी झाली होती. तेव्हा चव्हाण परिवार सत्तेत ताकदवान होता. त्यांनी ऐनवेळी ही टेलिकॉम फॅक्टरी नांदेडला नेली म्हणून तेव्हा खूप ओरड झाली होती. त्यानंतर बर्याच प्रकल्पांच्या धुळ्यात आगमनाच्या व कुणीतरी पळविल्याच्या चर्चा वर्षानुवर्षे होतच राहिल्या. सध्या हीच परिस्थिती महाराष्ट्र अनुभवत आहे. महाराष्ट्रात पुण्याजवळ तळेगाव येथे जागा देखील फायनल झालेला वेदांता व तैवानच्या फॉक्स कॉन कंपनीचा सेमी कंडक्टर निर्मितीचा प्रकल्प गुजरातला गेल्याची बातमी आली व एकच हलकल्लोळ माजला. तैवानची ही कंपनी सेमी कंडक्टर उत्पादनात जगात एक नंबर कंपनी आहे. जगातल्या सेमी कंडक्टर उत्पादनात यांचा वाटा जवळपास पन्नास टक्के आहे. कार - आयफोन ते सर्वच इलेक्ट्रॉनिक उपकरणात या सेमीकंडक्टरचा उपयोग होतो. चीन - तैवान तणावानंतर तैवान बाहेर सेमी कंडक्टर उत्पादनाची अधिकच गरज भासू लागली आहे. त्या पार्श्वभुमीवर या प्रकल्पाचे महत्व आहे. गेल्या दोन वर्षापासून त्याची तयारी सुरु होती. दक्षिण भारतातील तीन राज्यांना मागे टाकत महाराष्ट्राच्या तळेगावची यासाठी निवड नक्की झाली होती. या सेमीकंडक्टर उद्योगास लागणारे भरपूर पाणी येथे उपलब्ध आहे. शिवाय तळेगाव हे मुंबई - पुणे - हैद्राबाद - बंगलोर या हायटेक सिटीच्या जवळ आहे. या प्रकल्पासाठी लागणारे हायटेक - कुशल मनुष्यबळ देखील याच परिसरात एकत्रित झाले आहे. सुमारे पावणे दोन लाख कोटीचा हा प्रकल्प आहे. एक लाखापेक्षा अधिक रोजगार निर्मिती क्षमता या प्रकल्पात आहे. राज्य शासनास या मुळे दरवर्षी हजारो कोटींचा जीएसटी वाटा मिळू शकला असता. शिवाय सेमी कंडक्टरचा सर्वात मोठा प्रकल्प तळेगावला आल्यावर याच प्रकारचे पुढचे सर्वच प्रकल्प तळेगावला येवून हा परीसर सेमी कंडक्टर उत्पादन हब बनु शकला असता. पण गडबड झाली. गुजरात मध्ये अहमदाबादच्या पुढे ढोलेरा नावाची एक प्रचंड मोठी औद्योगिक वसाहत विकसित केली जात आहे. उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी त्याची खूप जाहिरातही केली जाते. तळेगावला ज्या आवश्यकतांची पूर्ती होवू शकली असती तेवढ्या ढोलेरात होणार नाहित, ही बाबही तेवढीच सत्य आहे. तरी हा प्रकल्प महाराष्ट्राचा निर्णय बदलून गुजरातला गेला. याचा अर्थ तेवढीच ताकदवान फिल्डिंग यासाठी लावली गेली असणार यात शंकांच नाही. महाराष्ट्रात सत्तांतराचे नाट्य घडत होते. तेव्हा तिकडे या हालचाली सुरु होत्या. त्यामुळे त्याची भनक आधीचे व आताचे सत्ताधारी यांना लागली नसावी. असे मानण्यास जागा आहे. आता या प्रकल्पाचे नाव घेवून शिवसेना - शिंदे सेना - भाजपा एकमेकावर निशाणा साधत आहेत. यातही राजकीय पोळी भाजली जात आहे. ही दुःखद बाब आहे. यात अजित दादा पवारांचे स्टेटमेंट आले आहे. " दिल्लीला जा व हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणा ! " दादांची भुमिका योग्य आहे, पण जेष्ठ नेते शरद पवारांना आता ते शक्य वाटत नाही. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे पंतप्रधानांशी बोलले. पंतप्रधानांनी ' यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देवू ' असे त्यांना म्हटले. पण त्यावर विश्वास ठेवून आता गप्प बसण्यात अर्थ नाही. या प्रकल्पासाठीच प्रयत्नशील राहिले पाहिजे. मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीत ठाण मांडले पाहिजे. आता गुजरात निवडणूका असल्या तरी महत्वाची मुंबई मनपा निवडणूक देखील आहे. याची जाणीव दिल्लीश्वरांना करून दिली पाहिजे. वेदांता व फॉक्स कॉन यांना ढोलेरा पेक्षा तळेगावची साईट निश्चितच आवडणारी आहे. गुजरात सरकार व वेदांता फॉक्स कॉन दोघांची सहमती असेल तर झालेला एमओयु रद्द करणे फारशी मोठी अवघड गोष्ट नाही. असे अनेक एम ओ यु होवून बासनात पडल्याची खूप उदाहरणे आहेत. ज्या शक्तींनी हा प्रकल्प इकडून तिकडे नेला त्याच शक्ती हा प्रकल्प पुन्हा तिकडून इकडे पाठवू शकतात. त्यासाठी ज्यांनी जोर लावणे आवश्यक आहे त्यांनी हा जोर लावला पाहिजे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरकरांच्या भावनांशी खेळणारे चौधरी बंधूंनो, भर चौकात द्या उत्तर मंत्री अनिल पाटील यांनी गौप्यस्फोट करीत दिले आव्हान *अमळनेर* (प्रतिनिधी) ...
-
शिरीष चौधरींच्या प्रचारात सुज्ञ व जेष्ठ नागरिक दाखवा आणि लाख रुपये मिळवा- विनोद लांबोळे अमळनेर- माजी आमदार शिरीष चौधरी यांचा या निवडणुकीत ना...
-
साक्री श्रमिक,शेतकरी, कष्टकऱ्यांचे लढावू नेते, शेतमजूर,कामगार व आदिवासी जनतेचे पाठीराखे,लाल निशाण पक्षाचे राज्य अध्यक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट...
-
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील एकाच कुटुंबातील काका ,पुतण्या चुलत भाऊ, बहीण असे चार जण राज्य सेवा स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय...
-
अमळनेर : तालुक्यातील ग्रामीण भागात एका रुग्णाला चिकुन गुनिया झाल्याचे उघडकीस आले असून नागरीकांनी आता डासांपासून सावध राहण्याची गरज आहे....
-
खरा भूमिपुत्र कोण 2009 ला अनिल दादा विधानसभेला पराभूत झाले, परंतु पराभव विसरून अनिल दादा परत सक्रिय झाले. 2014 ला विधानसभेला परत एकदा पराभव ...
-
भूमिपुत्र व विकास पुरुष म्हणून संपुर्ण शहरात अनिल दादांनाच पसंती- गोपी कासार व नरेंद्र चौधरी अमळनेर- शहरातील सर्वच प्रभागात महायुतीचे उमेदवा...
-
पारोळा येथील सभेत डॉ. शिंदे यांना विजयी करण्याचे केले आवाहन, अमळनेर:- काल ११ रोजी पारोळा येथे महाविकास आघाडीच्या सतीश पाटील व डॉ. अनिल शिंदे...
-
अमळनेर : अमळनेर हि संत आणि महंतांची भूमी आहे. या अमळनेरनगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप हा जंत करीत आहे. तेही केवळ राजकीय फायद्यासाठी, हे...
-
अमळनेर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांचा शहरी भागात प्रचार दौरा सुरू असून त्यांना प्रचारा दरम्यान भरघोस प्रतिसाद मिळत आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा