Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२

शिंदखेडा शहरातील गायत्री नगरात महेंद्र सैदाणे च्या दोन मोटारसायकली जळाल्या - जाळल्या का जळाल्या संशयास्पद पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल



शिंदखेडा यादवराव सावंत प्रतिनिधी --
शहरातील स्टेशन रोडवरील गायत्री नगरातील रहिवासी महेंद्र सुभाष सैदाणे रा.अक्कडसे यांच्या प्लांट नंबर- १३ येथे घरासमोर उभ्या असलेल्या दोन मोटारसायकली रात्री एक वाजेच्या सुमारास जळाल्या असल्याचे समजले. अचानक वरच्या मजल्यावर झोपलेले घर मालक महेंद्र सैदाणे यांस धुराळा उडाला असे लक्षात आले. 

त्यानंतर खाली ओरडाओरळ केल्याचे सदर घटना लक्षात आली त्यात बुलेट मोटारसायकल क्रं एम.एच.-१८ ए.एल -९४४३ तर दुसरी होन्डा लिओ मोटारसायकल क्रं. एम.एच -१८ ए व्ही -२९२१ ह्या दोन मोटारसायकली जळाल्या आहेत. सदर मोटारसायकली अंदाजे ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सदरील घटनेची पोलीस स्टेशन शिंदखेडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तरी फिर्याद महेंद्र सुभाष सैदाणे यांनी दिली आहे. 

सदर घटनेचा जागेवर पंचनामा करत असतांना प्रेट्रोल ची बिसलेरी बाटली सापडल्याने अधिकच संशय बळावला आहे. म्हणून मोटारसायकली जळाल्या की जाळल्या गेल्या म्हणुन पुर्व वैमनस्य असलेले मिलिंद सोनवणे यांच्या वर संशय असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. 

कलम ४३५ नुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास पो.का.पठाण यांच्या कडे सोपविण्यात आला आहे. शहरातुन अशा प्रकारे घटना घडत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध