Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १५ सप्टेंबर, २०२२
पत्रकारांची राज्यस्तरावरील एक दिवसीय खुली कार्यशाळा संत नगरी शेगाव..!
प्रतिनिधी: शेगाव येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ र.नं. एफ ५५९५, कार्यक्षेत्र ऑल इंडिया या संघटनेला २५ वर्ष पूर्ण होत असल्याने रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांची एक दिवसीय राज्यस्तरीय खुली कार्यशाळा रविवार 18 सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते सायं ५ वाजेपर्यंत श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय शेगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
कार्यक्रमाचे उद् घाटक दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाशभाऊ पोहरे राहतील,कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहरराव सुने संस्थापक तथा केंद्रीय अध्यक्ष अ.भा.ग्रा.प.सघं इंडिया तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड असिम सरोदे संविधान तज्ञ, मानवी हक्क विश्लेषक उच्च न्यायालय मुंबई हे विषय कोर्ट क्राईम व निगेटिव्ह बातम्या या विषयावर पत्रकारांना मार्गदर्शन करणार आहेत, ज्येष्ठ पत्रकार नानकजी आहुजा संपादक दैनिक प्रतिदिन अखबार अमरावती ,प्रगती बाणखेले महाराष्ट्र टाइम्स मुंबई हे विषय माध्यमामधील महिलांविषयी चित्रण : सद्यस्थिती आणि अपेक्षा या विषयावर पत्रकारांना मार्गदर्शन करणार आहेत. मान्यवर मंडळींचे पत्रकारांना मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे.
तर प्रमुख पाहुणे म्हणून गजानन कोटुरवार जिल्हा माहिती अधिकारी बुलढाणा, किरण जी अग्रवाल कार्यकारी संपादक लोकमत अकोला, दिलीप जी एडतकर संपादक दैनिक विदर्भ मतदार अमरावती, सुरेशराव सवळे केंद्रीय महासचिव अ.भा. ग्रा. पत्रकार संघ,राजेंद्रजी भुरे केंद्रीय उपाध्यक्ष अ.भा.ग्रा.पत्रकार संघ, कैलास बापू देशमुख केंद्रीय संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अ.भा.ग्रा.पत्रकार संघ,या मान्यवर मंडळींची प्रमुख पाहुणे म्हणून पहिल्या सत्रामध्ये उपस्थिती राहणार आहे.
तर विशेष उपस्थितीमध्ये पत्रकार संजय सोनोने,अनिल उंबरकार,देवानंद उमाळे,राजेश चौधरी,नंदु कुळकर्णी, सतीश अग्रवाल, विजय मिश्रा, गजानन कलोरे, दिनेश महाजन,अरुण भटकर, धनराज ससाने, अमर बोरसे, नाना पाटील,संजय त्रिवेदी ,भावेश शर्मा,विरसिंग राजपूत ,अविनाश दळवी, दीपक सुरोसे, महेंद्र व्यास, राजकुमार व्यास,मुरलीधर काळे,दिनेश घाटोळ, महेंद्र मिश्रा, समीर देशमुख, विजय इंगळे, ज्ञानेश्वर कुकडे, संजय ठाकूर, फहीम देशमुख,मंगेश ढोले, राजवर्धन शेगावकर, बद्री प्रसाद अवस्थीआदी , संजय पाठक,सागर कापसे,आकाश पालीवाल,सुनील धुडै,गणेश भड, अनिल भगत,सागर समदुर वृत्तपत्रांचे संपादक प्रतिनिधी यांची उपस्थिती राहील.समारोपीय सत्र कार्यक्रमाचे अध्यक्ष युसुफ खान केंद्रीय कार्याध्यक्ष अ.भा.ग्रा.पत्रकार संघ,प्रमुख मार्गदर्शक श्रीपाद अपराजित संपादक महाराष्ट्र टाइम्स नागपूर हे विषय बदलता समाज व बदलती पत्रकारिता या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत , ज्येष्ठ पत्रकार राही भिडे स्तंभ लेखिका, मुंबई हे विषय सामाजिक पत्रकारिता पत्रकारापुढील आव्हाने या विषयावर पत्रकारांना मार्गदर्शन करणार आहेत , विलासराव मराठे कार्यकारी सदस्य आय.एन.एस.समिती, संपादक दैनिक हिंदुस्थान अमरावती.तर प्रमुख उपस्थितीमध्ये रमेश कुळकर्णी संपादक पुण्यनगरी नागपूर ,संदीपजी भारंबे कार्यकारी संपादक सकाळ नागपूर, राजेशजी राजोरे आवृत्ती संपादक दैनिक देशोन्नती बुलढाणा, अभिमन्यू भगत ज्येष्ठ पत्रकार.तर दुसऱ्या सत्रात विशेष उपस्थितीमध्ये राजेंद्र काळे दैनिक देशोन्नती बुलढाणा,अरुण जैन दैनिक सकाळ बुलढाणा,नितीन सिरसाट दैनिक तरुण भारत बुलढाणा, सचिन लहाने उपसंपादक दैनिक पुण्यनगरी बुलढाणा, सुनील तिजारे दैनिक भास्कर बुलढाणा, सिद्धार्थ आराख दैनिक अजिंक्य भारत बुलढाणा,लक्ष्मीकांत बगाडे संपादक दैनिक दिव्य मराठी बुलढाणा, चंद्रकांत बर्दे दैनिक विश्वविजेता बुलढाणा, अनिल भगत ,विजय कुळकर्णी दैनिक तरुण भारत खामगाव, आदी मान्यवर कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक रवींद्रजी मेंढे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्ती ताई काळमेघ, अरविद्र राठोड हे करणार आहेत.
कार्यशाळेचे आयोजन उमेश सिरसाट महाराष्ट्र प्रदेश सहसचिव अ.भा. ग्रा . पत्रकार संघ,श्रीकृष्ण काकडे बुलढाणा जिल्हाध्यक्ष अ.भा. ग्रा. पत्रकार संघ, नितेश मानकर बुलढाणा जिल्हाध्यक्ष, सचिन कडू कार जिल्हा उपाध्यक्ष अ.भा.ग्रा.पत्रकार संघ,प्रशांत खत्री जिल्हा संघटक, देवचंद्र समदूर शेगांव तालुका अध्यक्ष, श्रीकांत कलोरे शेगांव शहर अध्यक्ष,व कार्यकारणी अर्जुन कराळे, उमेश राजगुरे, कमलेश शर्मा, सागर सिरसाट, दादा बाराहाते, दिनेश घाटोळ, संजय ठाकूर,अंकुश ठाकूर सर्व जिल्हाध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ शेगाव यांनी केले आहे.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक
ॲड असिम सरोदे संविधान तज्ञ, मानवी हक्क विश्लेषक उच्च न्यायालय मुंबई हे विषय कोर्ट क्राईम व निगेटिव्ह बातम्या या विषयावर पत्रकारांना मार्गदर्शन करणार.प्रगती बाणखेले महाराष्ट्र टाइम्स मुंबई हे विषय माध्यमामधील महिलांविषयी चित्रण : सद्यस्थिती आणि अपेक्षा या विषयावर पत्रकारांना मार्गदर्शन करणार .
श्रीपाद अपराजित संपादक महाराष्ट्र टाइम्स नागपूर हे विषय बदलता समाज व बदलती पत्रकारिता या विषयावर मार्गदर्शन करणार
राही भिडे स्तंभ लेखिका, मुंबई हे विषय सामाजिक पत्रकारिता पत्रकारापुढील आव्हाने या विषयावर पत्रकारांना मार्गदर्शन करणार
करिता राज्यातील समस्त पत्रकारांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना शेगाव तालुका व शहरच्या वतीने करण्यात येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील एकाच कुटुंबातील काका ,पुतण्या चुलत भाऊ, बहीण असे चार जण राज्य सेवा स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय...
-
अमळनेर : तालुक्यातील ग्रामीण भागात एका रुग्णाला चिकुन गुनिया झाल्याचे उघडकीस आले असून नागरीकांनी आता डासांपासून सावध राहण्याची गरज आहे....
-
खरा भूमिपुत्र कोण 2009 ला अनिल दादा विधानसभेला पराभूत झाले, परंतु पराभव विसरून अनिल दादा परत सक्रिय झाले. 2014 ला विधानसभेला परत एकदा पराभव ...
-
भूमिपुत्र व विकास पुरुष म्हणून संपुर्ण शहरात अनिल दादांनाच पसंती- गोपी कासार व नरेंद्र चौधरी अमळनेर- शहरातील सर्वच प्रभागात महायुतीचे उमेदवा...
-
साक्री दि.१५ : रब्बी हंगामाच्या सुरवातीलाच बाजारातून डीएपी आणि १०:२६ ही दोन्ही खते गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.त्यासोब...
-
अमळनेर : अमळनेर हि संत आणि महंतांची भूमी आहे. या अमळनेरनगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप हा जंत करीत आहे. तेही केवळ राजकीय फायद्यासाठी, हे...
-
अमळनेर: तालुक्यातील तासखेडा येथे घराच्या सामाईक भिंतीच्या बांधकामावरून दोन कुटुंबात वाद होऊन चौघांना मारहाण केल्याची घटना ९ रोजी घडली आहे...
-
अमळनेरकरांच्या भावनांशी खेळणारे चौधरी बंधूंनो, भर चौकात द्या उत्तर मंत्री अनिल पाटील यांनी गौप्यस्फोट करीत दिले आव्हान *अमळनेर* (प्रतिनिधी) ...
-
शिरीष चौधरींच्या प्रचारात सुज्ञ व जेष्ठ नागरिक दाखवा आणि लाख रुपये मिळवा- विनोद लांबोळे अमळनेर- माजी आमदार शिरीष चौधरी यांचा या निवडणुकीत ना...
-
साक्री श्रमिक,शेतकरी, कष्टकऱ्यांचे लढावू नेते, शेतमजूर,कामगार व आदिवासी जनतेचे पाठीराखे,लाल निशाण पक्षाचे राज्य अध्यक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा