Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२

शिरपूर शहरातील गल्ली बोळात मोकाट जनावरांचे कळप वाहतुकीस कोंडी..! अपघाताची शक्यता...!



शिरपूर शहरात सध्या गल्लीबोळात मोकाट जनावरांच्या कळपांमुळे स्थानिक रहिवासी त्रस्त झालेली आहेत.शहरात मोकाट फिरणारी गायी व कुत्रे यांमुळे शहराच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून वाहनचालकांचे जीव धोक्यात आले आहे.मोकाट जनावरांना पडकण्याची मोहीम नगरपालिकेने सुरू करून त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा असेच नागरिकांचे म्हणणे आहे.

ही मोकाट जनावरे अगदी रस्त्याच्या मधोमध बसून राहतात तर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर अचानक पाठीमागून होणारे कुत्रे यांची देखील संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. आश्या जनावरांच्या कळपांमुळे शहराच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून वाहनचालकांचे जीव धोक्यात आले आहे.मोकाट जनावरांना पडकण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली तरच रस्त्यांवर फिरणाऱ्या जनावरांची संख्या कमी झालेली दिसेल.रस्त्यांवरील मोकाट जनावरांमुळे सामान्य माणूस मात्र त्रस्त आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पाळीव मोकाट जनावरांचा शहरात त्रास वाढला असताना नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी याकडे लक्ष देऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.जनावरांचे मालक सकाळच्यावेळी त्यांना मोकळे सोडून देतात.त्यांना पकडण्यासाठी मात्र नगरपालिकेचे पथक पोहचत नाही.  

शहरातील विविध भागात जनावरांचा कळप नेहमीच रस्त्यांवर उभे किंवा बसलेले असतात.‘ट्रॅक्टर’ घेऊन नगरपालिकेच्या कोंडवाडा विभागाचे कर्मचारी केव्हा बाहेर निघतील? असा नागरिकांचा प्रश्न आहे.अगदी किरकोळ वाटणाऱ्या पण गंभीर समस्येपासून सुटका काही होणार का?  या मोकाट जनावरांची कोंडवाडय़ामध्ये रवानगी करावी..ज्या मालकांची जनावरे वारंवार रस्त्यावर पकडली जात असतील अशा जनावरांच्या मालकांकडून दुप्पट दंड वसूल  करावा.जेणेकरून नगरपालिकेचा देखील वसूल मिळेल व उत्पन्नात भर पडेल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध