Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२
शिरपूर शहरातील अतिक्रमणधारक व्यापाऱ्यांवर कारवाई.
शिरपूर प्रतिनिधी:अफाट वाढलेल्या शिरपूर शहरात काही धन दांडगे व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून शहरातील रहदारीचे रस्ते बंद करण्याच्या मार्गावर आणले. अगदी अंत्ययात्रेलाही पुढे सरकू न देणाऱ्या वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरलेल्या अतिक्रमणां विरोधात शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे २१ सप्टेंबरला धडक कारवाई केली.पार्किंग क्षेत्र सोडून मन मानेल तेथे आडव्या-तिडव्या उभ्या केलेल्या मोटारसायकलीवर कारवाई करून त्या जप्त करण्यात आल्या दुकानांचा मुख्य रस्त्याकडील बाजूस विस्तार करून, केलेले अतिक्रमण बुलडोझर लावून जमीनदोस्त करण्यात आले.शिरपूर वासियांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.
शिरपूर शहरातील मेनरोड व त्यालगतच्या रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिकांकडून नगर परिषदेकडे वारंवार तक्रारी केल्या जात होत्या.सराफ बाजार,आंबा बाजार येथून अंत्ययात्रा नेण्याचा पारंपारिक मार्ग असतांना तेथील दुतर्फा अतिकमणांमुळे चालण्यास जागा मिळत नाही.शिरपूर नगरपालिकेने सातत्यपूर्ण अतिक्रमण निर्मूलनासाठी मोहीम राबवावी अशी अपेक्षा शिरपूर वासियांनी व्यक्त केली जात आहे.मेन रोडकडे येणाऱ्या सर्वच रस्त्यांवर अतिकमणांचा सुळसुळाट झाल्यामुळे पायी चालणेही कठीण झाले आहे.
दिवसात अनेकदा ट्रफिक जाम होते. नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन नगर परिषदेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी प्रमोद भामरे यांनी प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले. २१ सप्टेंबरला सकाळी दहापासून पोलिस संरक्षणात कारवाईला सुरवात झाली.कारवाईची कुणभूण मिळताच हातगाडी धारकांनी आपल्या हातगाड्या लगेचच पिवळ्या पट्ट्याच्या आत घेतल्या.त्यानंतर पोलिसांचे लक्ष बेशिस्तपणे उभ्या केलेल्या मोटारसायकलीकडे गेले त्यांनी मोटारसायकली जप्त करण्यास सुरवात केली.जप्त केलेल्या मोटारसायकल ट्रॅक्टरमध्ये ठेवण्यात आल्या.यानंतर दुकानांची जाहिरात करण्यासाठी रस्त्यावर उभे केलेले डिस्प्लेही देखील जप्त करण्यात आले.ही त्यातच अतिक्रमण निर्मूलन पथकाचे लक्ष काही दुकानदारांनी नियमबाह्य पद्धतीने लोखंडी अँगल लावून वाढवलेल्या दुकानांकडे गेले.त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली.नागरिकांनी या कारवाईमुळे सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.
मात्र हे काम एका.दिवसापुरता दाखवू नये,सातत्याने कारवाई करून शहरातील मुख्य रस्ते मोकळे करावेत. अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली.नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुषार नेरकर,प्रशासकीय अधिकारी संजय हासवानी,नगर अभियंता माधवराव पाटील अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख किरण चव्हाण यांच्यासह कर्मचान्यांनी ही कारवाई केली.
यावेळी पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मांडळ रस्त्यावर तुलसी मोबाईल या वरच्या मजल्यावरील दुकानाचा लोखंडी जिना नियमबाह्य असल्याच्या कारणावरून तोडण्यात आला महाराजा कॉम्प्लेक्सबाहेरच्या काही दुकानांचे अँगल्सही तोडले सरदार वल्लभभाई पटेल मार्केट,मेन रोडवरील शर्मा सिझने स्टोअर्स नियमबाह्य लोखंडी रँकही बुलडोझरने तोडले , दुपारी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.मेनरोडवर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.याच गर्दीतून काही नागरिकांचा मते केवळ देखाव्या पुरताच आणि ठराविक व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.मात्र वरदस्त असलेल्या धन-दाडग्या व्यापाऱ्यांना या कारवाईतून अभय देण्यात आले असा सूर होता.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील एकाच कुटुंबातील काका ,पुतण्या चुलत भाऊ, बहीण असे चार जण राज्य सेवा स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय...
-
अमळनेर : तालुक्यातील ग्रामीण भागात एका रुग्णाला चिकुन गुनिया झाल्याचे उघडकीस आले असून नागरीकांनी आता डासांपासून सावध राहण्याची गरज आहे....
-
खरा भूमिपुत्र कोण 2009 ला अनिल दादा विधानसभेला पराभूत झाले, परंतु पराभव विसरून अनिल दादा परत सक्रिय झाले. 2014 ला विधानसभेला परत एकदा पराभव ...
-
भूमिपुत्र व विकास पुरुष म्हणून संपुर्ण शहरात अनिल दादांनाच पसंती- गोपी कासार व नरेंद्र चौधरी अमळनेर- शहरातील सर्वच प्रभागात महायुतीचे उमेदवा...
-
साक्री दि.१५ : रब्बी हंगामाच्या सुरवातीलाच बाजारातून डीएपी आणि १०:२६ ही दोन्ही खते गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.त्यासोब...
-
अमळनेर: तालुक्यातील तासखेडा येथे घराच्या सामाईक भिंतीच्या बांधकामावरून दोन कुटुंबात वाद होऊन चौघांना मारहाण केल्याची घटना ९ रोजी घडली आहे...
-
अमळनेर : अमळनेर हि संत आणि महंतांची भूमी आहे. या अमळनेरनगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप हा जंत करीत आहे. तेही केवळ राजकीय फायद्यासाठी, हे...
-
मतदारांच्या मनातील भीती दूर होण्यासाठी इंडोतिबेट व स्थानिक पोलिस पथकाने रूट मार्च काढला अमळनेर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभ...
-
अमळनेरकरांच्या भावनांशी खेळणारे चौधरी बंधूंनो, भर चौकात द्या उत्तर मंत्री अनिल पाटील यांनी गौप्यस्फोट करीत दिले आव्हान *अमळनेर* (प्रतिनिधी) ...
-
साक्री श्रमिक,शेतकरी, कष्टकऱ्यांचे लढावू नेते, शेतमजूर,कामगार व आदिवासी जनतेचे पाठीराखे,लाल निशाण पक्षाचे राज्य अध्यक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा