Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २० सप्टेंबर, २०२२

शासकीय आदेशाची पायमल्ली; महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ध्वजारोहणास दाखवली पाठ


उस्मानाबाद (राहूल शिंदे) दि.२० शनिवार दि.१७ रोजी ७४ वा  मराठवाडा मुक्ती संग्राम दिन संपूर्ण मराठवाड्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. परंतु याला अपवाद मौजे समुद्रवाणी ता.उस्मानाबाद येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक या कार्यालयामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम साजरा केला गेला नाही. एवढेच नाही तर महाराष्ट्र ग्रामीण बँक या कार्यालयामध्ये कोणत्याही महापुरुषांच्या जयंती,पुण्यतिथी साजऱ्या केल्या जात नाहीत. कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता कर्मचारी स्पष्ट भाषेत सांगतात की आमच्या हेड ऑफिस कडून आम्हाला कोणत्याही प्रकारचे पत्र किंवा अशा प्रकारचे आदेश नाहीत. त्यामुळे आम्ही कोणतेही कार्यक्रम साजरे करत नाहीत.अशी जिल्ह्यात किती कार्यालये आहेत की जेथे असे शासकीय कार्यक्रम साजरे होत नाहीत? 
महाराष्ट्र ग्रामीण बँक जयंती, पुण्यतिथी महोत्सव व इतर कार्यक्रमानिमित्त  ज्या सुट्या  असतात  याचा मात्र पूर्णपणे लाभ घेतात. अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर योग्य ती कडक कायदेशीर  कारवाई करण्यात यावी.अशी मागणी आधुनिक लहुजी सेनेचे धाराशिव जिल्हा सचिव संतोष हणमंते यांनी निवेदनाद्वारे  जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
संबंधीत निवेदनावर जिल्हाध्यक्ष कचरू सगट,सुभाष गव्हाळे, विजय कांबळे,संतोष गायकवाड, पुरुषोत्तम गव्हाळे,शंकर कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध